
Chandrapur News: 'सीसीआय'च्या कापूस विक्रीत अडचण; ओपन टोकन प्रणाली लागू करण्याची शेतकरी संघटनेची मागणी
Winter Session : ‘पॅकेज’च्या जादुई शब्दाखाली शेतकऱ्यांची दिशाभूल नको; आमदार रोहित पाटलांचा इशारा
सीसीआयने कापूस खरेदीसाठी ऑनलाइन स्लॉट बुकिंग प्रणाली लागू केली. यामुळे शेतकऱ्यांना वेळेत कापूस विक्री करणे कठीण झाले आहे. सदर प्रणाली सुरू झाल्यापासून शेतकरी ऑनलाइन स्लॉट बुक करण्यात मोठ्या अडचणींना सामोरे जात आहेत. सकाळी स्लॉट सुरू होताच ते भरून जातात. यामुळे अनेक शेतकऱ्यांना संधीच मिळत नाही. वयोवृद्ध शेतकरी, अशिक्षित व्यक्ती तसेच ग्रामीण भागातील नेटवर्क नसलेल्या शेतकऱ्यांसाठी सदर प्रणाली डोकेदुखी ठरली आहे. स्लॉट बूक झाल्यानंतरही शेतकऱ्यांच्या समस्या संपत नाहीत. (फोटो सौजन्य – Pinterest)
सीसीआयने अनेक ठिकाणी जिनिंग युनिट आठवड्यात केवळ २ ते ३ दिवस सुरू ठेवण्याचा आदेश दिले आहे. इतक्या कमी दिवसांमध्ये हजारो शेतकऱ्यांचा कापूस हाताळणे शक्य नाही. यामुळे स्लॉटची उपलब्धता अत्यल्प होऊन बुकिंगचा दबाव वाढतो. एकूणच कापूस उत्पादनाच्या तुलनेत स्लॉटची संख्या अपुरी आहे. यामुळे शेतकऱ्यांची गर्दी आणि ताण वाढतो. या अडचणींमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. स्लॉट न मिळाल्यामुळे कापूस दीर्घकाळ शेतात किंवा घरात राहतो. यामुळे ओलावा वाढून क्वॉलिटी कमी होत आहे. दिवसेंदिवस प्रयत्न करूनही स्लॉट न मिळाल्याने शेतकरी निराश होत आहे.
बूक केलेल्या दिवशी वाहन (ट्रॅक्टर, बैलगाडी किंवा इतर वाहतूक साधन) मिळत नाही. यामुळे स्लॉट वाया जातो आणि शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि पैसा उधळला जातो. काही वेळा शेतकरी वाहनाची व्यवस्था करून जिनिंगकडे निघतात. पण, जिनिंगमध्ये पोहोचेपर्यंत स्लॉट भरलेले असतात. अशा स्थितीत त्यांना कापूस घेऊन घरी परतावे लागते. यामुळे दिवसभराचा वेळ आणि वाहनाचे भाडे वाया जात आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या जवळच्या जिनिंग किंवा प्रेसिंग युनिटमध्ये स्लॉट मिळत नाही. यामुळे दूरच्या ठिकाणी कापूस विक्रीसाठी न्यावे लागते. यामुळे अधिकचा खर्च सहन करावा लागत आहे. जिवती तालुक्यात एकही जिनिंग नसल्यामुळे तेथील शेतकऱ्यांना अतिशय त्रास होत आहे.