Happy Birthday Sharad Pawar: राष्ट्रवादी राजकारणाचा शिल्पकार! अशी आहे त्यांच्या नेतृत्वाची यशस्वी कहाणी
12 डिसेंबर, 1940 रोजी शरद पवार यांचा जन्म झाला. विशेष गोष्ट म्हणजे शरद पवार यांच्या आईचा वाढदिवस देखील 12 डिसेंबर रोजी असतो. शरद पवार यांच्या वडीलांचे नाव गोविंद राव आहे. ते नीरा कॅनाल कोऑपरेटिव सोसाइटी (बारामती) मध्ये एक वरिष्ठ अधिकारी होते. तर शरद पवार यांची आई शारदा बाई, डाव्या विचारसरणीच्या त्या एक ज्वलंत राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या, पुणे लोकल बोर्डावर निवडून येणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. (फोटो सौजन्य – Pinterest)
शरद पवारांनी वयाच्या 27 व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला. 1958 मध्ये शरद पवार पुण्यातील काँग्रेस भवनात गेले आणि पक्षाचे सक्रिय सदस्यत्व स्वीकारले. 1967 हे वर्ष शरद पवार यांच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचे ठरले. कारण 1967 साली शरद पवार पहिल्यांदा बारामती मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर 1977 मधील आणीबाणीनंतर काँग्रेसचे दोन गट पडले. यावेळी शरद पवारांनी यशवंतराव चव्हाण यांची साथ दिली. यावेळी वसंतदादा पाटील, शरद पवार यशवंतराव चव्हाण यांच्यासह ‘रेड्डी कॉंग्रेस’मध्ये गेले. 1978 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकदा एकत्र आले. त्यावेळी वसंतदादा पाटील मुख्यमंत्री बनले. पण यामुळे शरद पवार काहीसे नाराज झाले होते. याच नाराजीसह शरद पवार त्यांच्या 40 समर्थकांसह पक्षातून बाहेर पडले.
जुलै 1978 मध्ये ‘पुरोगामी लोकशाही दलाचे’ नेते म्हणून शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. वयाच्या 38 व्या वर्षी शरद पवारांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर संपूर्ण सत्ता राजीव गांधी यांच्या क्राँग्रेसकडे गेली. त्यावेळी राजीव गांधींनी शरद पवारांनी क्राँग्रेसमध्ये येऊन कामं करावं, अशी इच्छा व्यक्त केली होती. 1984 मध्ये पवार बारामती मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. त्यानंतर शरद पवार तातडीने दिल्लीला गेले आणि त्यांनी क्राँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1988 मध्ये पवार दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले. 1990 च्या निवडणुकीनंतर शरद पवार तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद प्रकरणानंतर मुंबईत मोठ्या प्रमाणात हानी झाली. त्यामुळे शरद पवार पुन्हा महाराष्ट्रात आले आणि हीच त्यांच्यासाठी सुवर्णसंधी ठरली. म्हणजेच शरद पवार चौथ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
2023 साली शरद पावरांनी अध्यक्षपदावरून दूर होण्याचा निर्णय घेतला होता. पवारांनी केलेल्य़ा या घोषणेमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर शरद पवारांनी आपला निर्णय मागे घेतला. मात्र त्यानंतर काही महिन्यांतच अजित पवारांनी बंड पुकारले. अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली. त्यानंतर राष्ट्रवादी विरोधी राष्ट्रवादी अशी परिस्थिती निर्माण झाली होती.






