
Chandrapur News: २६ नोव्हेंबरला होणार बोधचिन्हाचे वाटप! या दिवशी जाहीर होणार उमेदवारांची अंतीम यादी
बल्लारपूर नगर परिषदेत अध्यक्षासाठी १० तर सदस्यासाठी १९२ असे एकूण २०२ एवढे उमेदवार रिंगणात आहेत. भद्रावतीत नगर परिषदेत अध्यक्षासाठी ६ तर सदस्यासाठी १४६ असे एकूण ११५२ उमेदवार रिंगणात आहेत. वरोरा नगर परिषदेत अध्यक्षासाठी ५ तर सदस्यासाठी १५० असे एकूण १५५ एवढे उमेदवार रिंगणात आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
ब्रह्मपुरी नगर परिषदेत अध्यक्षासाठी ४ तर सदस्यासाठी ९५ असे एकूण ९९ उमेदवार रिंगणात आहेत. मूल नगर परिषदेत अध्यक्षासाठी ६ तर सदस्यासाठी ९२ असे एकूण ९८ उमेदवार रिंगणात आहेत. राजुरा नगर परिषदेत अध्यक्षासाठी ८ तर सदस्यासाठी ८४ असे एकूण ९२ उमेदवार रिंगणात आहेत. घुग्घुस नगर परिषदेत अध्यक्षपदासाठी ६ तर सदस्यासाठी १२२ एकूण १२८ उमेदवार रिंगणात आहेत. गडचांदूर नगर परिषदेत अध्यक्षासाठी ९ तर सदस्यासाठी १२२ असे एकूण १३१ उमेदवार रिंगणात आहेत. नागभीड नगर परिषदेत अध्यक्षपदासाठी १० तर सदस्यासाठी ८४ असे एकूण ९४ उमेदवार रिंगणात आहेत. चिमूरमध्ये नगर परिषदेत अध्यक्षासाठी ८ तर सदस्यासाठी १३६ असे एकूण १४४ उमेदवार रिंगणात आहेत. तर भिसी नगरपंचायतीमध्ये अध्यक्षासाठी ६ तर सदस्यासाठी ५२ असे एकूण ५८ उमेदवार रिंगणात आहेत.
काळ आला पण वेळ नाही; उड्डाणपुलाचा भाग कोसळला अन्… मुंबई–अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक विस्कळीत
२६ नोव्हेंबरला बोधचिन्हाचे वाटप होणार आहे. बोधचिन्हाचे वाटप झाल्यानंतर उमेदवारांकडे केवळ ४ दिवसांचा कालावधी राहणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांचीही प्रचारासाठी चांगलीच दमछाक होणार आहे. दरम्यान उमेदवारांकडून प्रचारासाठी समाजमाध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाणार हे निश्चित. समाजमाध्यमे हे कमी कालावधीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा उपयुक्त व कमी खर्चीक असल्याने उमेदवारांसाठी योग्य पर्याय ठरणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकीची पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रतीक्षा होती. अखेर जिल्ह्यातील १० नगर परिषद व १ नगर पंचायतसाठी २ डिसेंबरला मतदान होणार आहे. उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली असून प्रचाराच्या कामाला लागले आहे. राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी पक्षाच्या चिन्हाच्या आधारे प्रचार सुरू केला असला तरी अपक्ष उमेदवारांना अद्यापही बोधचिन्हाची प्रतीक्षा करावी लागत आहे. बोधचिन्ह मिळाल्याशिवाय प्रचार करायला अडचण निर्माण होत असल्यामुळे अपक्ष उमेदवारांचे बोधचिन्ह वाटपाकडे लक्ष लागलेले आहे.