पालघर, मनोर : मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मनोर येथे मस्तानाका परिसरात असलेल्या पुलाच्या माती भरावाचा एक भाग रविवारी पहाटे अचानक कोसळला.या घटनेमुळे महामार्गावरील एक बाजूची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक माहितीवरून स्पष्ट झाले आहे.आधीच वाहतूक कोंडी आणि त्यात आता भरीला भर म्हणजे रस्त्यांची असेलेली दुरावस्था. रस्त्यांवर पडलेले खड्डे असो किंवा मग आता उड्डाण पुलांची झालेली भीषण अवस्था. प्रवाशांनी आणखी किती जीव मुठीत घेऊन प्रवास करायाचा असा सवाल प्रशासनाला केला जात आहे.
मस्ताननाका परिसर हा पालघर तालुक्यातील अत्यंत वर्दळीचा भाग आहे. मुंबईहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी हा मार्ग मुख्य वाहतूकद्वार मानला जातो. रविवारी पहाटे सुमारास पुलाच्या बाजूस अचानक तडा गेल्याचा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक बाहेर पडले. काही क्षणातच भरावातील काँक्रीटचा मोठा भाग खाली कोसळला. दरम्यान वाहतूक पोलिसांनी तात्काल घटना घटनास्थळी दाखल होऊन एक दिशा मार्ग बंद केला आहे.घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) चे अभियंते घटनास्थळी दाखल झाले.
महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अभियंता सुहास चिटणीस यांनी सांगितले की पुलाचा एक भाग अचानक कोसळल्याची माहिती मिळताच आमची विशेष तांत्रिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. प्राथमिक तपासात काँक्रीटमधील संरचनात्मक दोष आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या पाण्याच्या झिरपणामुळे हा अपघात झाल्याची शक्यता आहे. पूर्ण तपास झाल्यानंतरच वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. सुरक्षितता आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य आहे.तज्ज्ञांच्या मते, उड्डाणपुलांच्या देखभालीकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. सततच्या वाहनतळ आणि अवकाळी पावसामुळे काँक्रीटमध्ये सूक्ष्म तडे निर्माण होतात आणि दीर्घकाळात ते गंभीर स्वरूप धारण करतात. मस्तानाका घटनेने पुन्हा एकदा अशा संरचनांच्या तपासणी आणि देखभालीची गरज अधोरेखित केली आहे.
काळ आला पण वेळ आली नव्हती , सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या गंभीर घटनेकडे प्रशासनाचं होणारं दुर्लक्ष नागरिकांच्या जीवावर बेतू शकतं. या घटनेमुळे मुंबई–अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक प्रणालीवर मोठा परिणाम झाला असून, दररोज या मार्गावरून जाणाऱ्या हजारो वाहनचालकांसाठी ही घटना त्रासदायक ठरली आहे. स्थानिक व्यापारी आणि उद्योगिक क्षेत्रालाही याचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Ans: मस्तानाका परिसरात असलेल्या पुलाच्या माती भरावाचा एक भाग रविवारी पहाटे अचानक कोसळला.या घटनेमुळे महामार्गावरील एक बाजूची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.
Ans: प्राथमिक तपासात काँक्रीटमधील संरचनात्मक दोष आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या पाण्याच्या झिरपणामुळे हा अपघात झाल्याची शक्यता आहे.
Ans: रस्त्यांवर पडलेले खड्डे असो किंवा मग आता उड्डाण पुलांची दुरावस्था. प्रवाशांनी आणखी किती जीव मुठीत घेऊन प्रवास करायाचा असा सवाल प्रशासनाला केला जात आहे.






