Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: पतंग उडवताना सावधान! नायलॉन मांजा वापरल्यास २५ हजारांचा दंड; चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

चंद्रपूर जिल्ह्यात न्यायालयाच्या निर्देशानुसार नायलॉन मांजाच्या वापरासह विक्री व साठवणुकीवर कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याबाबत सार्वजनिक सूचना देखील जारी करण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 14, 2026 | 02:16 PM
Chandrapur News: पतंग उडवताना सावधान! नायलॉन मांजा वापरल्यास २५ हजारांचा दंड; चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

Chandrapur News: पतंग उडवताना सावधान! नायलॉन मांजा वापरल्यास २५ हजारांचा दंड; चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

Follow Us
Follow Us:
  • न्यायालयाच्या निर्देशानुसार नायलॉन मांजाचा वापर करताना आढळल्यास २५ हजार रुपये दंड
  • विक्री किंवा साठा करताना आढळल्यास प्रत्येक गुन्ह्यासाठी २ लाख ५० हजार रुपयांचा दंड
  • जिल्ह्यात नायलॉन मांजाच्या वापरासह विक्री व साठवणुकीवर कठोर निर्बंध लागू करण्यात आले
चंद्रपूर: मानवी जीवितासह पशु-पक्ष्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या नायलॉन व सिंथेटिक मांजाच्या वापरावर, विक्रीवर आणि साठवणुकीवर चंद्रपूर जिल्ह्यात पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार नायलॉन मांजाचा वापर करताना आढळल्यास २५ हजार रुपये, तर विक्री किंवा साठा करताना आढळल्यास प्रत्येक गुन्ह्यासाठी २ लाख ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वसुमना पंत यांनी सार्वजनिक सूचना जारी केली आहे.

ST Bank: एसटी बँकेच्या अपघाती विमा पॉलिसीत गैरव्यवहाराचा संशय; ५.९६ कोटींच्या व्यवहाराची चौकशी करण्याची श्रीरंग बरगे यांची मागणी!

नायलॉन व सिंथेटिक मांजामुळे नागरिकांना गंभीर दुखापती होण्यासह जीवितहानीचा धोका निर्माण होतो. तसेच पक्षी व प्राण्यांनाही या मांजामुळे इजा होण्याच्या घटना घडतात. या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात नायलॉन मांजाच्या वापरासह विक्री व साठवणुकीवर कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोणतीही सज्ञान व्यक्ती नायलॉन मांजाने पतंग उडवताना आढळल्यास संबंधित व्यक्तीस २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल. तसेच अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडवताना आढळल्यास २५ हजार रुपयांचा दंड संबंधित मुलाच्या किंवा मुलीच्या पालकांकडून वसूल करण्यात येणार आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

कोणत्याही दुकानात, ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अथवा व्यक्तीकडे नायलॉन किंवा सिंथेटिक मांजाचा साठा आढळल्यास किंवा त्याची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित विक्रेत्यावर २ लाख ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल. हा दंड प्रत्येक गुन्ह्यासाठी स्वतंत्रपणे लागू राहणार आहे. दंडाची रक्कम घटनास्थळी जमा न केल्यास संबंधित व्यक्तीला १५ दिवसांच्या आत दंड भरणे बंधनकारक राहिल, निर्धारित मुदतीत दंडाची रक्कम जमा न केल्यास संबंधित महसूल अधिकाऱ्यांमार्फत कायदेशीर प्रक्रिया राबवून जमीन महसुलाप्रमाणे दंडाची वसुली करण्यात येणार आहे.

नागरिकांनी तक्रार नोंदवावी

जिल्ह्यात नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक किंवा ऑनलाईन माध्यमातून अवैध व्यवहार होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ पोलीस विभागाच्या सायबर सेल अथवा संबंधित क्रमांकावर तक्रार नोंदवावी. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे. सदर सार्वजनिक सूचनेची माहिती नसल्याचे कारण पुढे करून दंडात्मक कारवाईबाबत कोणालाही आक्षेप घेता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Devendra Fadnavis: मुंबई विमानतळावरील उड्डाणे नवी मुंबईत हलणार नाहीत! फडणवीसांचा टर्मिनल-१ साठी नवा प्लॅन, प्रस्तावाचा उद्देश काय?

नागरिकांनी नायलॉन व सिंथेटिक मांजाचा वापर पूर्णपणे टाळावा. पतंग उडविण्यासाठी केवळ सुरक्षित व पारंपरिक सुती (कापसाच्या) मांजाचा वापर करावा, मानवी जीविताचे तसेच पशु-पक्ष्यांचे संरक्षण करण्यासाठी सर्व नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करून पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरा करावा.- वसुमना पंत, जिल्हाधिकारी चंद्रपूर

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Nylon manja ban in chandrapur 25000 rupees fine for use and 2 lakh 50 thousand rupees penalty for sale and storage hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2026 | 02:16 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Kolhapur Sindhudurg Fort: कोल्हापुरात दिवाळीनिमित्त साकारला ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला; हुबेहूब प्रतिकृती पाहून व्हाल थक्क!
1

Kolhapur Sindhudurg Fort: कोल्हापुरात दिवाळीनिमित्त साकारला ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला; हुबेहूब प्रतिकृती पाहून व्हाल थक्क!

Raigad News: दुष्काळावर मात करण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार; पेणच्या पाबळ खोऱ्यात उभारले ६० ते ७० फुटांचे बंधारे
2

Raigad News: दुष्काळावर मात करण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार; पेणच्या पाबळ खोऱ्यात उभारले ६० ते ७० फुटांचे बंधारे

Children’s Day: बालदिनानिमित्त पुन्हा द्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा! AI Prompts वापरून तयार करा खास फोटो
3

Children’s Day: बालदिनानिमित्त पुन्हा द्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा! AI Prompts वापरून तयार करा खास फोटो

Congo Ebola Outbreak : काँगोमध्ये इबोलाचा कहर; ५,४०० हून अधिक मृत्यू, आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांमुळे नियंत्रण मोहिमेला खीळ
4

Congo Ebola Outbreak : काँगोमध्ये इबोलाचा कहर; ५,४०० हून अधिक मृत्यू, आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांमुळे नियंत्रण मोहिमेला खीळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.