Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: सावलीच्या दहीहंडीला राजकीय रंग! धानोरकरांच्या एका निर्णयाने चर्चांना उधाण; नेमकं काय घडलं?

भाजप समर्थित युवा नेते रोहित बोम्मावार यांच्या 'साथ फाऊंडेशन'तर्फे सोमवारी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र खा. प्रतिभा धानोरकर काँग्रेस समर्थित दहीहंडीला उपस्थित न राहता भाजप समर्थित दहीहंडीला उपस्थित राहणार असल्याने सावलीचे राजकारण चांगलेच तापले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 07, 2026 | 02:55 PM
Chandrapur News: सावलीच्या दहीहंडीला राजकीय रंग! धानोरकरांच्या एका निर्णयाने चर्चांना उधाण; नेमकं काय घडलं?

Chandrapur News: सावलीच्या दहीहंडीला राजकीय रंग! धानोरकरांच्या एका निर्णयाने चर्चांना उधाण; नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:
  • सावलीत दोन दहीहंड्यांचे आयोजन; विजय वडेट्टीवार समर्थित मित्र परिवाराची दहीहंडी रविवारी, तर रोहित बोम्मावार यांच्या साथ फाऊंडेशनची दहीहंडी सोमवारी होत आहे.
  • खा. प्रतिभा धानोरकर काँग्रेस समर्थित दहीहंडीला न जाता भाजप समर्थित कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची चर्चा असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
  • सावलीतील कुणबी मतदारांवर डोळा असल्याची चर्चा; बोम्मावारांच्या वाढत्या राजकीय प्रभावाच्या पार्श्वभूमीवर धानोरकरांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चंद्रपूर: सावली शहरात यंदा दहीहंडीच्या उत्सवाला राजकीय रंग चढला असून, रविवारी झालेल्या व सोमवारी होणाऱ्या दोन वेगवेगळ्या दहीहंडींकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. एकीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आ. विजय वडेट्टीवार समर्थित मित्र परिवाराची दहीहंडी रविवारी झाली. तर दुसरीकडे भाजप समर्थित युवा नेते रोहित बोम्मावार यांच्या ‘साथ फाऊंडेशन’तर्फे सोमवारी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र खा. प्रतिभा धानोरकर काँग्रेस समर्थित दहीहंडीला उपस्थित न राहता भाजप समर्थित दहीहंडीला उपस्थित राहणार असल्याने सावलीचे राजकारण चांगलेच तापले आहे.

DSP Cricket : मान्सून लीगमध्ये साई सत्यम आणि मायटी स्टार्सचा डंका; प्रतिस्पर्ध्यांचा उडवला धुव्वा

बोम्मावार यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केल्यानंतर मागील वर्षभरात सावली तालुक्यात विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आपला राजकीय जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला आहे. ‘साथ फाऊंडेशन’च्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या दहीहंडीचे हे दुसरे वर्ष असून, त्यांच्या नेतृत्वाला मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षवेधी ठरत आहे. विशेष म्हणजे, बोम्मावारांचे वाढते राजकीय प्रस्थ लक्षात घेऊन यंदा आ. वडेट्टीवार समर्थित मित्र परिवाराने सावलीत प्रथमच दहीहंडीचे आयोजन केल्याची चर्चा आहे. त्यामुळे दोन्ही कार्यक्रमांकडे राजकीय शक्तिप्रदर्शन म्हणून पाहिले जात आहे. या संपूर्ण राजकीय घडामोडीत सर्वाधिक चर्चा होत आहे ती काँग्रेसच्या खा. धानोरकर यांच्या भूमिकेची.  (फोटो सौजन्य – AI Created) 

वडेट्टीवार समर्थित दहीहंडीला उपस्थित न राहता खा. धानोरकर या बोम्मावार यांच्या भाजप समर्थित दहीहंडीला उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. यामुळे सावली तालुक्यातील राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चाना उधाण आले आहे. ही केवळ सामाजिक कार्यक्रमातील उपस्थिती आहे की त्यामागे भविष्यातील राजकीय समीकरणांची चाहूल आहे? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. खा. धानोरकर आणि आ. वडेट्टीवार यांच्यातील राजकीय मतभेद जिल्ह्याला नवीन नाहीत. मात्र, वडेट्टीवार समर्थित कार्यक्रमापासून दूर राहून भाजप समर्थित दहीहंडीला खासदारांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरत आहे.

कुणबी मतदारांवर डोळा?

सावली तालुक्यात कुणबी समाजाची मोठी लोकसंख्या असून, या समाजातील मोठा वर्ग खा. धानोरकर यांच्या समर्थकांमध्ये असल्याची स्थानिक राजकीय चर्चा आहे. हीच मतदारांची ताकद आपल्या राजकीय पाठीशी उभी करण्यासाठी बोम्मावार प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे धानोरकरांची भाजप समर्थित दहीहंडीतील उपस्थिती ही केवळ उत्सवापुरती मर्यादित राहणार की त्यातून काँग्रेसच्या मतदारांमध्ये राजकीय संदेश जाणार? याबाबत नागरिकांमध्ये तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.

Maratha Reservation: ‘मराठा आंदोलनातील मृतांच्या…’, मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

दहीहंडीच्या थरांमध्ये राजकारणाचेही थर!

दोन्ही दहीहंडी यशस्वी करण्यासाठी काँग्रेस आणि भाजपचे स्थानिक नेते व कार्यकर्ते जोरदार तयारी करीत आहेत. दोन्ही कार्यक्रम सावलीतील राजकीय वातावरणाची दिशा स्पष्ट करणारे ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दहीहंडीच्या थरावर थर रचले जात असताना सावलीच्या राजकारणातही नव्या समीकरणांचे थर रचले जात आहेत का? खा. धानोरकरांच्या उपस्थितीचा नेमका राजकीय अर्थ काय? याचे उत्तर येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे. मात्र, सध्या तरी सावलीच्या राजकीय चौकात ‘धानोरकर कुणाच्या दहीहंडीला आणि का?’ हा प्रश्नच चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Savli dahihandi politics pratibha dhanorkars presence at bjp backed event sparks political buzz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Raigad News: तुकडेबंदीच्या कचाट्यात अडकलेल्या जमीनधारकांना मोठा दिलासा! जुन्या व्यवहारांना आता मिळणार कायदेशीर मान्यता
1

Raigad News: तुकडेबंदीच्या कचाट्यात अडकलेल्या जमीनधारकांना मोठा दिलासा! जुन्या व्यवहारांना आता मिळणार कायदेशीर मान्यता

Karjat News: कर्जतमध्ये रस्त्यांच्या खड्ड्यांविरोधात पोलीस मित्र संघटनेचे अनोखे आंदोलन
2

Karjat News: कर्जतमध्ये रस्त्यांच्या खड्ड्यांविरोधात पोलीस मित्र संघटनेचे अनोखे आंदोलन

Viral Video: उद्यापासून नक्की जिमला जाईन असे बोलणाऱ्यांनी ‘हा’ व्हिडिओ नक्की पाहा!!! तुम्हीही थक्क व्हाल
3

Viral Video: उद्यापासून नक्की जिमला जाईन असे बोलणाऱ्यांनी ‘हा’ व्हिडिओ नक्की पाहा!!! तुम्हीही थक्क व्हाल

Fight Video Goes Viral: कानशिलात, लाथा-बुक्क्या अन् पट्टा… थिएटरमध्ये चाहत्यांचा संताप अनावर, VIDEO व्हायरल
4

Fight Video Goes Viral: कानशिलात, लाथा-बुक्क्या अन् पट्टा… थिएटरमध्ये चाहत्यांचा संताप अनावर, VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.