डीएसपी क्रिकेट लीग (फोटो- सोशल मिडिया/istockphoto)
अभिजीत तिवारीने आक्रमक फलंदाजी करत
७८ धावांचीमहत्त्वपूर्ण खेळी साकारली आणि संघाच्या विजयाचा पाया रचला. अभिजीतच्या दमदार फलंदाजीमुळे साई सत्यम क्रिकेट क्लबने सामन्यात प्रतिस्पर्ध्यांसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. त्यानंतर गोलंदाजांनीही प्रभावी कामगिरी करत रोहन आर्यन्स लीथर संघाला रोखले आणि साई सत्यम क्रिकेट क्लबला मोठ्या फरकाने विजय मिळवून दिला. पराभूत संघाकडून ध्रुवांग कन्साराने प्रभावी गोलंदाजी करत२३ धावांत ७ गडी बादकेले. मात्र, त्याची ही शानदार कामगिरी संघाला विजय मिळवून देण्यासाठी अपुरी ठरली.
DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी
दुसऱ्या सामन्यात रोहित मोरेच्या उपयुक्त ३० धावांच्या खेळीच्या जोरावर मायटी स्टार्स संघाने प्रोफेशनल टायटन्स सीजी संघाचा ५ गडी राखून पराभव केला. रोहित मोरेने संयमी आणि उपयुक्त फलंदाजी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या खेळीला सहकाऱ्यांनी योग्य साथ दिल्यामुळे मायटी स्टार्सने प्रतिस्पर्ध्याने दिलेले आव्हान यशस्वीपणे पार करत सामना आपल्या नावे केला.या विजयामुळे साई सत्यम क्रिकेट क्लब आणि मायटी स्टार्स संघांनी साखळी फेरीत आपली विजयी मोहीम कायम ठेवत स्पर्धेतील पुढील लढतींसाठी दावेदारी मजबूत केली.
DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका!
डीएसपी स्पोर्ट्स अँड इव्हेंटस यांच्या वतीने आयोजित तिसऱ्या डीएसपी करंडक १२ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत चंद्रोस क्रिकेट अकादमी, मिडास क्रिकेट अकादमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून आगेकूच केली. वाघोली येथील पुणे क्रिकेट क्लब मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या लढतीत तरण अय्यंगर (२३ धावा व ३-६) यांनी केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर चंद्रोस क्रिकेट अकादमी संघाने सार्क क्रिकेट अकादमी संघाचा १११ धावांनी पराभव केला. दुसऱ्या सामन्यात आर्यन कुमार (२० धावा व १-३) यांनी केलेल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर मिडास क्रिकेट अकादमी संघाने पीकेज विस्डम क्रिकेट अकादमी संघाचा १९ धावांनी पराभव केला.
DSP करंडक U-14: पुणे क्रिकेट क्लब आणि पूना क्लबची तुफानी घोडदौड; तब्बल ४२१ धावांनी दणदणीत विजय






