Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अवैध खनिज उत्खननावर कडक कारवाई; तीन महिन्यांत सर्वेक्षण करुन दोषींवर कारवाई करणार – चंद्रशेखर बावनकुळे

पुढील तीन महिन्यांत मागील पाच वर्षांतील परवानग्यांची चौकशी करून अनियमितता आढळल्यास संबंधितांवर दंड, व्याज आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 23, 2026 | 06:43 PM
अवैध खनिज उत्खननावर कडक कारवाई; तीन महिन्यांत सर्वेक्षण करुन दोषींवर कारवाई करणार - चंद्रशेखर बावनकुळे

अवैध खनिज उत्खननावर कडक कारवाई; तीन महिन्यांत सर्वेक्षण करुन दोषींवर कारवाई करणार - चंद्रशेखर बावनकुळे

Follow Us
Close
Follow Us:

अवैध खनिज उत्खननावर कडक कारवाई

तीन महिन्यांत सर्वेक्षण करुन दोषींवर कारवाई करणार

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

मुंबई: भिवंडी परिसरासह रायगड, पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या बेकायदा खनिज उत्खनन व तस्करीविरोधात कडक कारवाई करण्यात येत आहे. पुढील तीन महिन्यांत मागील पाच वर्षांतील परवानग्यांची चौकशी करून अनियमितता आढळल्यास संबंधितांवर दंड, व्याज आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. तसेच संबंधित अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली.

भिवंडी व परिसरात तसेच रायगड, पालघर जिल्ह्यात बेकायदा खनिज उत्खनन व तस्करीमुळे शासनाच्या महसूलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबत तत्काळ चौकशी व कारवाईच्या मागणीबाबत विधासभेत सदस्य सुनील प्रभू यांनी लक्षवेधी सूचना मांडली. या चर्चेत सदस्य दिलीप लांडे, राजू खरे, नाना पटोले यांनी सहभाग घेतला.

लातूर जिल्ह्यात अवैध वाहतुकीचा विळखा कायम, प्रशासनाचे दुर्लक्ष उघड; परिवहन मंत्र्यांच्या आदेशानंतरही कारवाईचा अभाव

महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले की, बेकायदा खाणकाम व स्टोन क्रशर प्रकल्पांवर तत्काळ बंदीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. संबंधित ठिकाणी गुन्हे नोंदविणे, दंड वसुली आणि अवैध साठा जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खननासाठी आवश्यक असलेले खाणपट्टा, पर्यावरण परवाना, स्फोटक वापर परवाना, ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला आदी नियम अनेक ठिकाणी पाळले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जीपीएस व मॅपिंगद्वारे अचूक माहिती संकलित करून अवैध उत्खननाचा संपूर्ण आढावा घेण्यात येणार आहे.

ज्या ठिकाणी परवानगी नसताना खाणकाम व स्टोन क्रशर सुरू आहेत, ती तत्काळ बंद करण्यात येतील. जिल्हाधिकाऱ्यांना थेट जबाबदारी देण्यात आली असून, अवैध साठेही जप्त केले जातील. आवश्यक परवानग्या, पर्यावरण मंजुरी, मायनिंग प्लॅन, स्फोटक परवाना, ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला न घेतलेल्या प्रकल्पांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही मंत्री बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील खनिज उत्खननाचे अचूक चित्र मिळवण्यासाठी जीपीएस व गूगल मॅपिंगच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जाईल. मागील पाच वर्षांत परवानग्या देताना झालेल्या अनियमिततांची चौकशीही करण्यात येणार आहे. परवानग्या असलेल्या प्रकल्पांना बाधा न आणता अवैध उत्खनन पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. संबंधित प्रकरणांत अधिकारी सहभागी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Palghar News : बोईसर-तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायू गळती ; दुर्घटनेत 15 ते 18 कामगार बाधित

Web Title: Chandrashekhar bawankule on strict action on illegal mining action will be taken against the offenders after surveying within three months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 06:43 PM

Topics:  

  • chandrashekhar bawankule
  • maharashtra

संबंधित बातम्या

Pune : पुण्यात संग्रहालयांविषयी वाढतेय जागरूकता; वारसा जपण्याकडे नव्या पिढीचा कल
1

Pune : पुण्यात संग्रहालयांविषयी वाढतेय जागरूकता; वारसा जपण्याकडे नव्या पिढीचा कल

Farmers Protest: ‘गिरीष महाजन हटाव’, सुपीक जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा
2

Farmers Protest: ‘गिरीष महाजन हटाव’, सुपीक जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा

पशुखाद्यात अनुदानित युरियाची भेसळ, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी
3

पशुखाद्यात अनुदानित युरियाची भेसळ, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी

RTE admission : पुणे जिल्ह्यात ‘आरटीई’च्या ३ हजाराहून अधिक जागा रिक्त; प्रवेशासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदत
4

RTE admission : पुणे जिल्ह्यात ‘आरटीई’च्या ३ हजाराहून अधिक जागा रिक्त; प्रवेशासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.