Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सगेसोयरे आरक्षण कोर्टात एक मिनिटही टिकणार नाही; भूजबळांनी जरांगेंना डिवचलं

ओबीसीमध्ये मराठा समाजाला घ्यायच की नाही घ्यायचं हे विचारण्यासाठी मी पवारांची भेट घेतली. शरद पवार असोत वा उद्धव ठाकरे  असोत वा  काँग्रेस असो. त्यांनीही सांगावं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायंच का. ओबीसीत साडेतीनशेहून अधिक जाती असताना आता मराठा समाजालाही त्यात सामील करून घ्यायचं की नाही हे त्यांनीही सांगायला हवे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 06, 2024 | 04:20 PM
सगेसोयरे आरक्षण कोर्टात एक मिनिटही टिकणार नाही; भूजबळांनी जरांगेंना डिवचलं
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आरक्षण मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी भूमिका मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते वारंवार छगन भूजबळ यांच्यावर निशाणा साधत आहेत.  दोघांमध्येही आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, अशातच मनोज जरांगे यांच्या बदल्या भूमिकांचा समाचार घेत छगन भूजबळ यांनी मनोज जरांगेंवर टीका केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी  राज्य सरकारला अल्टिमेट दिला आहे. मराठा आरक्षणातील महत्त्वाचा मुद्दा असलेल्या   सगेसोयऱ्याविषयी  भूजबळांनी रोखठोक भूमिका मांडत यावर भाष्य केलं आहे.

मी कुणाकडे काहीही मागितले नाही. तर पलिकडचे लोक काय म्हणत आहेत की, ओबीसीतून आरक्षण द्या. पण मी म्हणतो की आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका. ओबीसीत 384 जाती आहेत. तुम्हीही आलात तर कुणालाच काही मिळणार नाही.  पवारांशीही यासंदर्भात चर्चा झाली.  मंडल आयोग आल्यावर आम्ही पवारांकडे  आरक्षणाची मागणी केली होती. त्यांनी एक दीड महिन्यात आरक्षणाची अंमलबजावणी केली. त्यांना तेच सांगायला गेलो होतो. आरक्षणावर कोणीतरही घाला घालण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही ज्येष्ठ नेते आहोते. तुम्ही सांगितले तर फायदा होईल.

हेदेखील वाचा: Ganesh Chaturthi Recipe: बाप्पाला करा खुश! नैवेद्यासाठी बनवा कुरकुरीत तळणीचे मोदक

ओबीसीमध्ये मराठा समाजाला घ्यायच की नाही घ्यायचं हे विचारण्यासाठी मी पवारांची भेट घेतली. शरद पवार असोत वा उद्धव ठाकरे  असोत वा  काँग्रेस असो. त्यांनीही सांगावं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायंच का. ओबीसीत साडेतीनशेहून अधिक जाती असताना आता मराठा समाजालाही त्यात सामील करून घ्यायचं की नाही हे त्यांनीही सांगायला हवे.  आरक्षणाच्या मुद्द्यावरूनच मी शिवसेना सोडली. आमचा बॅकलॉग भरलेला नाही. पण मराठा समाजाला १० टक्के टिकणारं आरक्षण दिलं. त्यात फक्त मराठा समाज आहे. पण ओबीसीत साडेतीनशे जाती आहेत.

सगेसोयऱ्यांबाबत  बोलताना भूजबळ  म्हणाले,  सगेसोयऱ्यांचा अध्यादेश अजून काढलेला नाही. अधिसुचनाही काढलेले नाही, असे करण्यासाठी लोकांच्या हरकती, ना हरकती मागवण्यात आल्या आहेत.  आतापर्यंत साडेआठ लाख हरकती आल्या आहेत. पण त्यात असे करू नये असे सुचवण्यात आल्याचे भूजबळांनी म्हटले आहे.

हेदेखील वाचा: भाजपवर टीका करणारे रामदास कदम  नरमले: काय आहे कारण?

मी रिबेरो, अणे साहेब, कुंभकोणी यांनाही आरक्षणाबद्दल विचारलं. तर त्यांनीही असे करू नये, असे झाले तर कोणीही कोणाच्याही आरक्षणात जाऊल, दलित, मुस्लिम, ब्राम्हण समाजही येतील, पण मला वाटतं सगेसोगरे काही होणार नाही. झालं तरी ते कोर्टाच एक मिनिटही टिकणार नाही. असेही भूजबळांनी म्हटले आहे.

 

Web Title: Chhagan bhujbal taunts manoj jarange over maratha reservation says this will not get passed in court nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2024 | 04:20 PM

Topics:  

  • Chhagan Bhujbal
  • Manoj Jarange
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

Manoj Jarange Dasara Melava live : हातात सलाईन तरी घेतला दसरा मेळावा; मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला दिला मोलाचा सल्ला
1

Manoj Jarange Dasara Melava live : हातात सलाईन तरी घेतला दसरा मेळावा; मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला दिला मोलाचा सल्ला

Maratha Reservation : ‘मराठा आरक्षणाचा लढा आणखी तीव्र होणार’; खासदार शाहू महाराज यांचा इशारा
2

Maratha Reservation : ‘मराठा आरक्षणाचा लढा आणखी तीव्र होणार’; खासदार शाहू महाराज यांचा इशारा

Nashik Rainfall News: अतिवृष्टीने नाशिकमध्ये हाहा:कार; भुजबळ दौरा सोडून नाशिककडे रवाना
3

Nashik Rainfall News: अतिवृष्टीने नाशिकमध्ये हाहा:कार; भुजबळ दौरा सोडून नाशिककडे रवाना

‘आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही’; छगन भुजबळांची टीका
4

‘आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही’; छगन भुजबळांची टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.