Photo Credit- Social Media
मुंबई: विधानसभा निवडणुकांना अवघे काही दिवस शिल्लक राहिले असतानाच महायुतीतील मतभेदही समोर येऊ लागले आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी भाजपवर टीका करतान दिसत आहे. रामदास कदम यांच्या या आक्रमक भूमिकेने शिवसेना- भाजपमधील नेत्यांमध्येही चांगलीच जुंपली होती. पण आता अचानकच रामदास कदम यांनी नरमाईची भूमिका घेतली असून विधानसभा निवडणूका एकत्र लढणार असल्याचेही म्हटले आहे. पण त्यांनी अचानक नरमाईची भूमिका का घेतली, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
रामदास कदम म्हणाले, “ आम्हाला महायुती टिकवायची आहे. विधानसभा निवडणुकीत आम्हाला सर्वांना सोबत जायचं आहे. जो चुकेल त्यालाही सोबत घेऊन जायचं आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विकासाचे जे स्वप्न होते, तेच आमचे ध्येय आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामदास कदमचे स्वप्न पुर्ण केले, त्यासाठी त्यांना खूप धन्यवाद,” असे रामदास कदम यांनी म्हटले आहे.
हेदेखील वाचा:कल्याणकरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले वचन, मिळणार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल
“उध्दव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी गद्दारी केली. अडीच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे गुवाहाटीला गेल्यावर उद्धव ठाकरेंनी मला फोन केला होता. त्यावेळी मी त्यांना समजावले आणि ‘तुम्ही काँग्रेस सोडत असल्याची पत्रकार परिषद घ्या, मी गुवाहाटीला जाऊन सर्व आमदारांना दोन तासांत परत घेऊन येतो, असे म्हणालो होते. पण उद्धव ठाकरेंनी शरद पवारांचेच ऐकले,” असा दावा केला आहे.
“मी शपथ घेऊन सांगतो, ५० खोक्यांचा विषय येतोच कुठे? गद्दारी कोणी केली? गद्दारीची व्याख्या काय आहे,” असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला आहे. तसेच, मी शिवसेना का सोडली, या विषयावरही पुस्तक लिहीणार असल्याचे कदम यांनी म्हटले आहे. पण त्यांच्या या दाव्यांमुळे आता पुन्हा, रामदास कदम आणि उज्धव ठछाकरेंच्या शिवसेनेत खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
हेदेखील वाचा:आधी ड्रग्ज द्यायचा अन् नंतर…, 72 जणांकडून 10 वर्ष पत्नीनेवर करायला लावले आळीपाळीने लैंगिक