Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर शहर विकास आराखड्याचे (DP Plan) 'ईपी' नकाशे मनपाकडे प्राप्त! ४५० फेरबदलांसह नकाशे आजपासून ऑनलाईन उपलब्ध.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 11, 2026 | 02:44 PM
Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले!

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले!

Follow Us
Follow Us:
  • संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले!
  • ईपीचे नकाशे ऑनलाईन
  • डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल
Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगर शहर विकास आराखड्‌यातील ईपी (एक्सक्लुडेड पोर्शन अर्थात वगळलेला भाग) ला शासनाची मंजुरी मिळून गॅझेटमध्ये प्रसिद्ध होऊन जवळपास अडीच महिने उलटल्यानंतर अखेर ईपीचे नकाशे उपलब्ध झाले आहेत. सोमवारी शासनाकडून हे नकाशे महापालिकेच्या नगररचना विभागाकडे प्राप्त झाले. सोमवारी रात्री नकाशे स्कॅन करून महापालिकेच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येणार असून, मंगळवारी दुपारनंतर नागरिकांना ते ऑनलाइन पाहता आणि डाऊनलोड करता येणार आहेत. तसेच नगररचना विभागाच्या कार्यालयातही नागरिकांना नकाशे पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती नगररचना विभागाचे उपसंचालक मनोज गर्जे यांनी दिली.

गॅझेटमधील तरतुदींनुसार नकाशे तयार होणार

शहर विकास आराखड्याला शासनाने १५ एप्रिल २०२५ रोजी मंजुरी दिली होती. मात्र, आराखड्यातील काही भागांमध्ये बदल व सुधारणा सुचविण्यात आल्याने ईपीची प्रक्रिया स्वतंत्रपणे सुरू होती. अखेर १४ मे २०२६ रोजी ईपीला शासनाने मंजुरी दिली आणि १५ मे रोजी त्याची गॅझेटमध्ये प्रसिद्धी करण्यात आली. गॅझेटमधील तरतुदीनुसार नकाशे तयार करण्याचे आदेश नगररचना विभागाला देण्यात आले होते. विभागाव्या सहसंचालक व सहाय्यक संचालकांनी नकाशे तयार करून ते शासनाच्या मंजुरीसाठी सादर केले होते. नकाशे तयार करण्याचे काम महिनाभरात पूर्ण झाल्याचा दावा नगररचना विभागाकडून करण्यात येत होता. मात्र, प्रत्यक्ष नकाशे नागरिकांना उपलब्ध होण्यासाठी अडीच महिन्यांचा कालावधी लागला.

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती

नकाशे पाहण्यासाठी होणार आता चांगलीच गर्दी

ईपीमध्ये शहरातील रस्त्यांची रुंदी, रस्त्यांची अलाइनमेंट, मोकळ्या जागा आणि विविध भूखंडांवरील आरक्षणांमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आपल्या परिसरात नेमका कोणता बदल झाला, घर किंवा दुकान रस्त्याच्या नव्या आखणीमध्ये येते का, ग्रीन झोनचे यलो झोनमध्ये रूपांतर झाले आहे का, रस्त्याची रुंदी वाढली की कमी झाली, नवीन रस्ता कोणत्या दिशेने गेला, याची उत्सुकता नागरिकांना आहे. विशेषतः अस्तित्वात असलेली घरे आणि बांधकामे वाचविण्यासाठी काही ठिकाणी रस्त्यांची जुनी अलाइनमेंट बदलून नव्याने रस्ते आखण्यात आले आहेत. त्यामुळे नकाशे उपलब्ध झाल्यानंतर संबंधित भागातील नागरिकांकडून नगररचना कार्यालयात आणि संकेतस्थळावर नकाशे पाहण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

घरे वाचविण्याचा प्रयत्न

ईपीमध्ये शहरातील विविध भागांमध्ये सुमारे ४५० बदल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. काही ठिकाणी रस्त्यांची रुंदी कमी करण्यात आली असून, काही प्रस्तावित रस्ते रद्द करून संबंधित जमीन रहिवासी क्षेत्रात समाविष्ट करण्यात आली आहे. १२ मीटर रुंदीचे काही रस्ते ९ मीटर करण्यात आले आहेत. तसेच जुन्या रस्त्यांची अलाइनमेंट बदलून नव्या मार्गाने रस्ते प्रस्तावित करण्यात आले असून, त्यामध्ये अस्तित्वातील घरे वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

या भागांतील बदलांकडे लक्ष

पडेगाव, मिटमिटा, रावरसपुरा, जयसिंगपुरा, भावसिंगपुरा, बायजीपुरा, हसूल, जाधववाडी, चिकलठाणा, मुकुंदवाडी, नारळीबाग, पहाडसिंगपुरा, मोंढा नाका, गुलमंडी, जसवंतपुरा, हर्षनगर यासह शहरातील विविध भागांमध्ये ईपीनुसार बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे लक्ष आता नव्या नकाशांकडे लागले आहे.

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!

Web Title: Chhatrapati sambhajinagar dp plan ep new maps available online marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 02:44 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
1

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र
2

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर
3

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.