
Sambhajinagar Municipal Corporation News ( संभाजीनगर महानगरपालिका बातमी )
महापालिकेच्या गुंठेवारी नियमितीकरण योजनेने महसुलाच्या बाबतीत मोठी मजल मारली असून, या माध्यमातून आतापर्यंत तब्बल १४० कोटी रुपयांचा महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. योजनेला मालमत्ताधारकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत १२ हजार ९९२ अर्ज दाखल झाले आहेत.
त्यापैकी ६ हजार ८८५ अर्जांना मंजुरीची मोहोर उमटली आहे. दरम्यान, ३१ ऑक्टोबरला योजनेची निर्धारित मुदत संपुष्टात आल्याने आता आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ मिळणार का, याबाबत मालमत्ताधारकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
या योजनेअंतर्गत आतापर्यंत १२ हजार ९९२ अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी ६ हजार ८८५ अजांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे गुंठेवारी नियमितीकरणाच्या प्रक्रियेला वेगआल्याचे चित्र आहे.
शहरातील अनधिकृतपणे विकसित झालेल्या मालमत्तांना नियमानुसार अधिकृत करण्यासाठी महापालिकेने गुंठेवारी नियमितीकरणाची योजना राबविली. सुरुवातीला नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने अर्ज प्रक्रिया आणि मुदतीबाबत प्रशासनाकडून वेळोवेळी आवाहन करण्यात आले. त्यानंतर मोठ्या संख्येने मालमत्ताधारकांनी अर्ज दाखल केले. ३१ ऑक्टोबरपर्यंत या योजनेची मुदत होती.
अकोला महापालिकेसमोर 262 कोटींच्या करवसुलीचे आव्हान; करावर वाढतोय व्याजाचा बोजा
गुंठेवारी नियमितीकरण योजनेची मुदत संपल्यानतरही हजारो मालमत्ताधारक – नियमितीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांनी योजनेला आणखी दोन महिन्याची मुदतवाढ देण्याची मागणी केली होती, काही मालमत्ता वक्फ – बोर्डाच्या जमिनीवर, आरक्षित भूखंडांवर तसेच वर्ग दोनच्या जमिनीवर असल्याने त्यांच्या नियमितीकरणाबाबतही सभागृहात प्रश्न उपस्थित करण्यात आले.
अकोल्यात भीषण पाणीटंचाई; टँकर लॉबी सक्रिय, घरगुती वापरापासून ते बांधकामापर्यंत मनमानी दर