Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sambhajinagar Water Supply : जायकवाडी जॅकवेल बंद असताना पाणीटंचाई टाळण्यासाठी पर्यायी जलवाहिनी

Sambhajinagar Water Supply : संभाजीनगरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेतील जायकवाडी धरणावरील मुख्य उद्भव विहीर (जॅकवेल) अॅप्रोच चॅनलच्या कामासाठी सुमारे दोन महिने बंद राहणार. पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ नये, यासाठी महापालिकेने पर्यायी जलवाहिनी जोडणीचा निर्णय आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 06, 2026 | 04:08 PM
Jayakwadi Dam Water Project

Jayakwadi Dam Water Project

Follow Us
Follow Us:
  •  शहराला वाढीव १०० दललि पाणी उपलब्ध  
  • कॉफर डॅम तोडण्याचे काम हाती घेतले जाणार  
  • शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता 
 

Sambhajinagar Water Supply : छत्रपती संभाजीनगर शहरातील जायकवाडी धरणातील नवीन पाणीपुरवठा योजनेच्या उद्भव विहिरीत (जॅकवेल) गाळ जाण्याचा धोका असल्याने अॅप्रोच चॅनलच्या कामादरम्यान ही विहीर सुमारे दोन महिने बंद ठेवावी लागणार आहे. या काळात शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ नये, यासाठी महापालिकेने पर्यायी जलवाहिनी जोडणीचे नियोजन केले आहे.

 शहराला वाढीव १०० दललि पाणी उपलब्ध

पैठण रोडवरील संत एकनाथ साखर कारखान्याजवळ २,५०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला ९०० मिमीची, तर ९०० मिमीच्या जलवाहिनीला ७०० मिमीची जलवाहिनी जोडण्यात येणार आहे. या कामासाठी १ कोटी २८ लाख ४४ हजार ३३९ रुपयांच्या अंदाजपत्रकाला सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली.

नवीन पाणीपुरवठा योजनेतून शहराला वाढीव १०० दललि (दशलक्ष लिटर ) पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. मात्र, जायकवाडी धरणातील मुख्य उद्भव विहिरीपर्यंत पाणी आणण्यासाठी अॅप्रोच चॅनल तयार करणे आवश्यक आहे.

Akola News : विजेचा शून्य वापर, तरीही 850 रुपयांचे आले बिल; बिलाच्या आकारणीवर प्रश्नचिन्ह

कॉफर डॅम तोडण्याचे काम हाती घेतले जाणार

यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून कॉफर डॅम तोडण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. हे काम सुरू झाल्यानंतर धरणातील गाळ थेट जॅकवेलमध्ये जाण्याची शक्यता मजीप्राच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे विहिरीतील गाळ काढणे आणि ती पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी किमान दोन महिने लागू शकतात. दरम्यान, ही परिस्थिती लक्षात घेऊन संत एकनाथ साखर कारखान्याजवळ ९०० मिमी डीआय जलवाहिनी २,५०० मिमी एमएस जलवाहिनीला, तसेच ७०० मिमी सीआय जलवाहिनी ९०० मिमी डीआय जलवाहिनीला जोडण्यात येणार आहे.

जायकवाडी येथील ५६ दललि योजनेच्या पंपहाऊसवर मॅनिफोल्ड पाइप जोडणीसह अन्य कामेही केली जाणार आहेत. महापौर समीर राजूरकर आणि आयुक्त अमोल येडगे यांनी प्रस्तावाला मंजुरी देण्याची विनंती केल्यानंतर सभागृहाने एकमताने अंदाजपत्रक मंजूर केले.

शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता

१० जून रोजी जायकवाडी येथील मुख्य उद्भव विहिरीवर मनपा आणि मजीप्राच्या अभियंत्यांची संयुक्त आढावा बैठक झाली होती. त्यात तांत्रिक अडचणींवर उपाय म्हणून कॉफर डॅम तोडून अॅप्रोच चॅनलचे काम सुरू करण्याबाबत चर्चा झाली. मात्र, या कामामुळे जॅकवेल बंद ठेवावी लागल्यास नवीन योजनेतून वाढीव पाणी सलग घेणे शक्य होणार नाही, त्याचा शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Amravati News: अमरावतीत जलसंवर्धनाचा ‘मास्टर प्लॅन’! पुनर्भरणासाठी अडीच कोटींचा आराखडा; अमृत योजनेतून ५० लाख निधी मंजूर

💡

Frequently Asked Questions

  • Que: धरणातील जॅकवेल किती दिवस बंद राहण्याची शक्यता आहे?

    Ans: जॅकवेल सुमारे दोन महिने बंद ठेवावी लागणार.

  • Que: जॅकवेल बंद ठेवण्याचे कारण काय आहे?

    Ans: धरणातील गाळ जॅकवेलमध्ये जाण्याचा धोका आहे.

  • Que: पाणीपुरवठ्यासाठी महापालिकेने काय नियोजन केले आहे?

    Ans: संत एकनाथ साखर कारखान्याजवळ पर्यायी जलवाहिन्यांची जोडणी करण्याचे नियोजन केले.

Web Title: Chhatrapati sambhajinagar water supply alternative pipeline jayakwadi dam sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 03:52 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation
  • Dam Water Level
  • sambhaji nagar news

संबंधित बातम्या

FDA Raids in Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये FDA ची धडक कारवाई ! २५ लाखांचे तेल आणि तूप जप्त, परवाना निलंबित
1

FDA Raids in Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये FDA ची धडक कारवाई ! २५ लाखांचे तेल आणि तूप जप्त, परवाना निलंबित

Sambhajinagar News : जिल्ह्यातील ४ हजार ३३ शाळांचे मूल्यांकन; ८ शाळांना राज्यस्तरीय स्पर्धेची संधी
2

Sambhajinagar News : जिल्ह्यातील ४ हजार ३३ शाळांचे मूल्यांकन; ८ शाळांना राज्यस्तरीय स्पर्धेची संधी

Sambhajinagar News : रात्री १२ वाजेपर्यंत फाईल स्वीकारण्याची प्रक्रिया तिजोरीत १०८ कोटींचा महसूल, गुंठेवारीसाठी नागरिकांची झुंबड
3

Sambhajinagar News : रात्री १२ वाजेपर्यंत फाईल स्वीकारण्याची प्रक्रिया तिजोरीत १०८ कोटींचा महसूल, गुंठेवारीसाठी नागरिकांची झुंबड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.