Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: वा रे वा! शहरात पाण्यासाठी वणवण, अन मनपा पदाधिकाऱ्यांसाठी २५ लाखांच्या आलिशान ‘ईव्ही’ गाड्यांची खरेदी

छत्रपती संभाजीनगर शहरात १० दिवसांआड पाणी मिळत असताना मनपा प्रशासनाकडून २५ लाखांच्या नवीन ईव्ही गाड्यांच्या खरेदीची तयारी सुरू आहे. या उधळपट्टीमुळे शहरवासीयांमध्ये संतापाची लाट आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 15, 2026 | 03:50 PM
Chhatrapati Sambhajinagar: वा रे वा! शहरात पाण्यासाठी वणवण, अन मनपा पदाधिकाऱ्यांसाठी २५ लाखांच्या आलिशान ‘ईव्ही’ गाड्यांची खरेदी
Follow Us
Follow Us:

 

  • वा रे वा!
  • शहरात पाण्यासाठी वणवण
  • अन् मनपा पदाधिकाऱ्यांसाठी २५ लाखांच्या आलिशान ‘ईव्ही’ गाड्यांची खरेदी
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): शहरात भीषण पाणीटंचाईने नागरिक हैराण झाले असताना महानगरपालिकेकडून पदाधिकाऱ्यांसाठी आलिशान ईलेक्ट्रक वाहन खरेदीची तयारी सुरू झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेक भागांत १० ते १२ दिवसांआड पाणीपुरवठा होत असून नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. उन्हाचा पारा ४३ अंशांवर गेल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे.

अशा पार्श्वभूमीवर महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती यांच्यासाठी प्रत्येकी सुमारे २५ लाख रुपये किमतीच्या ईव्ही गाड्या खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बुधवारी मनपा मुख्यालयात ईव्ही कारचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यावेळी महापौरांनी स्वतः वाहन चालवून ट्रायल घेतली. तर दुसरीकडे शहरातील अनेक भागांत नियमित पाणीपुरवठा कोलमडला असून नागरिकांना १० ते १२ दिवसांआड पाणी मिळत आहे. त्यामुळे टँकरवर अवलंबित्व वाढले आहे. महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना पाण्यासाठी लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याची मागणी अधिक वाढली असून नागरिकांची अक्षरशः होरपळ होत आहे. मनपा ईव्ही गाड्या खरेदीत दंग असल्याचे दिसत आहे.

जर्मनी अभ्यास दौरा रद्द

दरम्यान, मनपातील चार अधिकाऱ्यांचा जर्मनी अभ्यास दौरा राज्य शासनाच्या आदेशानुसार रद्द करण्यात आला आहे. १५ ते २३ मेदरम्यान हा दौरा नियोजित होता. नगररचना विभागातील अधिकारी या दौऱ्यात सहभागी होणार होते, अशी माहिती आयुक्तांनी दिली.

छत्रपती संभाजीनगरचा ‘वनवास’ संपला! ३३ वर्षांनंतर विकास आराखड्याला अंतिम मंजुरी; ४८७ ‘वगळलेले’ भागही समाविष्ट

महानगरपालिकेच्या ईव्ही खरेदीवरून प्रश्नचिन्ह

पंतप्रधानांनी इंधन बचतीसाठी ईव्ही वापर वाढविण्याचे आवाहन केले असले तरी सध्याच्या परिस्थितीत अशा महागड्या वाहन खरेदीला प्राधान्य देणे योग्य का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मूलभूत प्रश्न प्रलंबित असताना प्रशासनाचा हा निर्णय वादग्रस्त ठरत आहे.

आधीच सहा गाड्या, पुन्हा खरेदीची चर्चा

मागील वर्षी स्मार्ट सिटी योजनेतर्गत मनपाने सहा ईव्ही गाड्या खरेदी केल्या आहेत. या गाड्या सध्या चांगल्या स्थितीत असून त्यांचा वापर मर्यादित आहे. तरीदेखील नव्या गाड्यांची खरेदी करण्याचा प्रस्ताव पुढे आणण्यात येत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या ३ अनधिकृत मालमत्तांवर महापालिकेचा ‘बुलडोझर’; पहाटे मोठी कारवाई

Web Title: Chhatrapati sambhajinagar municipal corporation ev car purchase amidst water crisis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 03:50 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
1

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र
2

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर
3

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.