Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हायड्रोलिक चाचणीवरून पेटला नवा वाद, मनपा आयुक्त येडगे चाचणीच्या बाजूने; महापौरांनी गरजेवरच उपस्थित केले प्रश्न

छत्रपती संभाजीनगरमधील २७४० कोटींच्या अमृत पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीच्या हायड्रोलिक चाचणीवरून मनपा आयुक्त अमोल येडगे आणि महापौर समीर राजूरकर यांच्यात मतभेद समोर आले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 24, 2026 | 03:09 PM
हायड्रोलिक चाचणीवरून पेटला नवा वाद

हायड्रोलिक चाचणीवरून पेटला नवा वाद

Follow Us
Follow Us:
  • हायड्रोलिक चाचणीवरून पेटला नवा वाद
  • मनपा आयुक्त येडगे चाचणीच्या बाजूने
  • महापौरांनी गरजेवरच उपस्थित केले प्रश्न
छत्रपती संभाजीनगर, शहर प्रतिनिधी: अमृत योजनेअंतर्गत उभारण्यात येत असलेल्या नव्या पाणीपुरवठा प्रकल्पातील जलवाहिन्यांच्या सुरक्षितता कार्यक्षमतेच्या मुद्द्यावरून प्रशासनात नव्याने मतभेद समोर आले आहेत. जायकवाडी धरण ते नक्षत्रवाडीदरम्यान टाकण्यात आलेल्या २५०० मि.मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीची हायड्रोलिक चाचणी न करताच तिच्यातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याची चर्चा सुरू असतानाच, आता नक्षत्रवाडी ते शहर या टप्प्यातील १५०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीच्या हायड्रोलिक चाचणीबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी चाचणी आवश्यक असल्याचे स्पष्ट केले असताना, महापौर समीर राजूरकर यांनी तिच्या उपयुक्ततेवरच प्रश्न उपस्थित केल्याने हा मुद्दा चर्चेत आला आहे.

शहराच्या वाढत्या पाण्याच्या गरजा लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून सुमारे २७४० कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा प्रकल्प राबविला जात आहे. धरणापासून नक्षत्रवाडीपर्यंत सुमारे ३८ किलोमीटर अंतरावर २५०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. गेल्या मुख्य या आठवड्यापासून जलवाहिनीतून पाणीपुरवठ्याची सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, निविदेतील अटींनुसार संपूर्ण जलवाहिनीची हायड्रोलिक चाचणी करूनच ती कार्यान्वित करणे अपेक्षित होते, असा दावा तज्ज्ञांकडून केला जात आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जलवाहिनीच्या सांध्यांची व वेल्डिंगची गुणवत्ता तपासण्यासाठी रेडिओग्राफिक टेस्ट (आरटी) आणि अल्ट्रासोनिक टेस्ट (युटी) केल्याची माहिती आहे. मात्र, या चाचण्या बांधकामाच्या गुणवत्तेची पडताळणी करतात; प्रत्यक्ष दाब सहन करण्याची क्षमता तपासण्यासाठी हायड्रोलिक चाचणी आवश्यक मानली जाते. मोठ्या व्यासाच्या जलवाहिन्यांसाठी निविदेत हायड्रोलिक चाचणीची अट असते. चाचणी यशस्वी झाल्यानंतरच जलवाहिनी अंतिम स्वरूपात स्वीकारली जाते. यासाठी कंत्राटदाराची काही रक्कम राखून ठेवण्याचीही पद्धत आहे.

‘अल निनो’मुळे संभाजीनगरवर पाणीटंचाईचं संकट! गावात दवंडी देण्याचे आदेश; जिल्हा प्रशासनाचा मोठा प्लॅन सज्ज

पाचही पंप सुरू झाल्यास मोठा दाब

सध्या दोन पंपांच्या सहाय्याने पाणीपुरवठा सुरू आहे. भविष्यात प्रत्येकी ३७५० अश्वशक्ती क्षमतेचे पाचही पंप पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास जलवाहिनीवर मोठा दाब निर्माण होणार आहे.
अशा वेळी गळती, तडे किंवा फुटण्याचा धोका टाळण्यासाठी पूर्वचाचणी महत्त्वाची असल्याचे जलवाहिनीनंतर आता नक्षत्रवाडी ते अभियंते सांगतात. मुख्य शहर या मार्गावरील १५०० मि.मी.
व्यासाच्या नव्या जलवाहिनीची हायड्रोलिक चाचणी घेण्यात येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आयुक्तांनी काही दिवसांपूर्वी ही चाचणी घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, महापौरांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही चाचणी शहराच्या दृष्टीने अत्यावश्यक नसल्याचे मत व्यक्त केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे प्रशासनातील भूमिकांमध्ये विसंगती असल्याचे चित्र दिसत आहे.

दर्जा चांगला असला तरी चाचणी का महत्त्वाची ?

तज्ज्ञांच्या मते, दर्जेदार साहित्य वापरणे आणि प्रत्यक्ष कार्यक्षमतेची चाचणी घेणे या वेगळ्या बाबी आहेत. जलवाहिनी किती दाबापर्यंत सुरक्षितपणे पाणी वाहून नेऊ शकते, याचा अंतिम पुरावा हायड्रोलिक चाचणीतूनच मिळतो. त्यामुळे ही प्रक्रिया टाळल्यास भविष्यातील कार्यक्षमतेबाबत प्रश्न कायम राहू शकतात.

संभाजीनगर मनपाची शहरभर धडक कारवाई! ७३ मालमत्तांची झाडाझडती, १७ सील; एकाच दिवसात ९२.७० लाखांची कर वसुली

Web Title: Dispute between commissioner amol yedge and mayor samir rajurkar over amrut water scheme hydraulic test

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 03:09 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Water supply

संबंधित बातम्या

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
1

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.