Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

Water Pollution: गढूळ आणि दूषित पाणीपुरवठ्याच्या समस्येवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे शिवसेना आक्रमक झाली आहे. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पाणीपुरवठ्याची समस्या तातडीने दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने वेळीच उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशारा देत....

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 24, 2026 | 03:42 PM
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम (फोटो सौजन्य-ChatGPT)

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम (फोटो सौजन्य-ChatGPT)

Follow Us
Follow Us:
  • दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न पेटला
  • राष्ट्रवादी-शिंदे शिवसेना आक्रमक
  • नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
  • गढूळ पाण्याविरोधात प्रशासनाला इशारा
 

कर्जत: कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत मधील प्रशासक राजवटीमधील कारभार जनतेच्या आरोग्याच्या मुळावर उठले आहे.गेली काही दिवस नळाद्वारे मिळत असलेले गढूळ आणि दूषित पाण्यामुळे नेरळ ग्रामस्थ संतप्त झाले आहे.दरम्यान या गढूळ आणि दूषित पाण्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्याकडून आवाज उठवण्यात आला आहे.

ऐन गणेशोत्सव काळात नेरळ गावात नळाला येणारे पाणी दूषित असल्याचे आढळून आले आहे.गेल्या आठवड्यापासून नळाद्वारे थेट चिखलमय आणि दूषित पाणीपुरवठा केला जात आहे.या भोंगळ कारभाराविरोधात संतप्त ग्रामस्थांनी हातात दूषित पाणी घेऊन “हे पाणी प्रशासकांनी स्वतः पिऊन दाखवावे,” असे आव्हान देत प्रशासनाचा तीव्र निषेध केला.सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस नेरळ मधील पदाधिकारी यांनी प्रशासक सुजित धनगर यांची भेट घेऊन निवेदन दिले.राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या महिला तालुका अध्यक्ष ॲड रंजना धुळे तसेच शहर अध्यक्ष चव्हाण यांनी निवेदन देत चार दिवसात कारभार सुधारला नाही आणि तर मोठे आंदोलन उभे केले जाईल असा इशारा दिला आहे.

KARJAT : रमेश कदम यांच्या आंदोलनाला यश; कर्जतच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू

दूषित आणि गढूळ पाण्यामुळे त्रस्त असलेल्या जनतेच्या समस्या मांडण्यासाठी शिवसेना शिंदे गटाने नेरळ ग्रामपंचायत मध्ये धडक दिली. पाणी शुद्ध करण्यासाठी आवश्यक असलेले टीसीएल आणि पाणी शुद्धीकरण करण्यासाठी खरेदी केलेले साहित्य यांच्या खरेदीसाठी लाखो रुपये खर्च दाखवूनही प्रत्यक्ष पाणी गढूळ मिळत असल्याने नाराजी व्यक्त केली.अशुद्ध पाण्यामुळे लहान मुले व वृद्ध आजारी पडत आहेत.दुसरीकडे नियमित कर भरूनही नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी प्रशासनाला धारेवर धरले.यावेळी ग्रामपंचायत अधिकारी अरुण कार्ले आणि प्रशासक सुजित धनगर यांनी उद्यापासून स्वच्छ पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले.यावेळी विशाल साळुंके, सुरेश राणे, वेदिका साळुंके तसेच शिवसेना ठाकरे गटाचे संदीप उतेकर आणि संदेश लाड यांनी देखील गढूळ आणि अशुद्ध पाण्याबद्दल जाब विचारला.

Karjat News: कर्जतमध्ये रस्त्यांच्या खड्ड्यांविरोधात पोलीस मित्र संघटनेचे अनोखे आंदोलन

Web Title: Ncp and shinde shiv sena issue ultimatum over muddy contaminated water supply

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • shivsena
  • Water supply

संबंधित बातम्या

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद
1

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन
2

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंना कोर्टाचा दिलासा; Vasant Davkhare मानहानी प्रकरणाचा निकाल, 2009 च्या CD प्रकरणात चौघांची निर्दोष मुक्तता
3

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंना कोर्टाचा दिलासा; Vasant Davkhare मानहानी प्रकरणाचा निकाल, 2009 च्या CD प्रकरणात चौघांची निर्दोष मुक्तता

Drought Inspection: दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री मैदानात! फडणवीस मराठवाड्यात तर शिंदे विदर्भात
4

Drought Inspection: दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री मैदानात! फडणवीस मराठवाड्यात तर शिंदे विदर्भात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.