राज्याचे मुख्य सचिव व संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी यांनीदेखील याबाबत जनतेला आवाहन केले आहे. राज्यात सध्या अल निनो प्रभावामुळे मान्सूनला विलंब होत आहे. त्यामुळे गावांमध्ये संभाव्य गंभीर पाणी टंचाईची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. त्यासाठी जिल्हयातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा अपव्यय रोखणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याअनुषंगाने जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतीनी राज्य व जिल्हा स्तरावरून प्राप्त मार्गदर्शक सूचनांची अत्यंत काटेकोरपणे व तात्काळ अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. याबाबत सीईओ मिन्नु यानी, यंत्रणेला आवश्यक सूचना केल्या आहेत.
गावात पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घ्यावी व जनजागृती मोहीम राबवावी, ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध जलस्रोत, साठा व पाणी पुरवठा स्थितीचे नियमित शुद्धीकरण करावे, पाणी पुरवठा योजना, विहिरी, बोअरवेल व इतर जलसोत कार्यान्वित स्थितीत ठेवण्यासाठी आवश्यक दुरुस्ती तात्काळ करावी, गावातील शासकीय कार्यालये, शाळा, अंगणवाडी, महाविद्यालये व इतर सार्वजनिक संस्थांमध्ये पाणी बचतीबाबत विशेष सूचना देऊन त्यांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्याबाबतही सीईओ यांनी सूचित केले आहे. टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असल्यास त्याच्या नियमित नोंदी ठेवाव्यात, अशा सूचना सीईओ यांनी दिल्या आहेत.
पिण्याच्या पाण्याचा वापर वाहन धुणे, बागांना पाणी देणे इत्यादी गैर-प्राधान्य कामांसाठी टाळण्याबाबत सूचना द्याव्यात, पाणी पुरवठा योजनांची गळती. अनधिकृत नळजोडणी व पाण्याची चोरी रोखण्यासाठी मोहीम राबवावी, पाणी योजनांच्या वीज बिलांची पूर्तता वेळेत करून योजना अखंडित सुरू राहतील याची दक्षता घ्यावी, असे आवाहन सीईओंनी केले आहे.
टंचाईची शक्यता असलेल्या गावांमध्ये पर्यायी विहिरी, बोअरवेल, अधिग्रहण आदी जलस्रोत उपलब्धतेची पूर्वतयारी करावी, जलसंधारण, पावसाचे पाणी साठवणूक क भूजल पुनर्भरणाबाबत ग्रामस्तरावर जनजागृती करण्यात यावी, पाणी गुणवत्तेची नियमिता तपासणी करून नागरिकांना सुरक्षित व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, पाणी टंचाईसंदर्भातील आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करून समन्वय ठेवण्यात यावा, पिण्याच्या पाण्याच्या सोतांमधील उपलब्ध साठा ३० दिवसांपेक्षा कमी असल्यास त्याबाबतचा अहवाल सादर करण्यात यावा, अशी सूचना दिली आहे.
गणपतीपुळे समुद्रात पर्यटनासाठी आलेले संभाजीनगरचे 5 जण बुडाले, पर्यटनाचा आनंद क्षणात विरला






