Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sambhaji Nagar News : वेरूळ लेणी परिसरात स्वच्छता मोहीम, १५ हजार रुपयांचा दंड वसूल,अस्वच्छता करणाऱ्या दुकानांवर दंडात्मक कारवाई

Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर येथील जागतिक वारसास्थळ असलेल्या वेरूळ लेणी परिसरात सेवा संकल्प अभियानांतर्गत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांच्या उपस्थितीत परिसरातील अस्वच्छता करणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करून १५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 10, 2026 | 08:36 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • परिसरातील अस्वच्छता आणि अतिक्रमणांची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई 
  • जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू यांचा सहभाग 
  • नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष 
Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत जागतिक वारसास्थळ असलेल्या वेरूळ लेणी परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत परिसरात अस्वच्छता करणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करून १५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच परिसरातील अतिक्रमणे हटवून संबंधित जागेवर वृक्षारोपण करण्यात आले.

परिसरातील अस्वच्छता आणि अतिक्रमणांची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक वासुदेव सोळंके यांनी ७ ऑक्टोबर रोजी वेरूळ लेणी परिसराची पाहणी केली. यावेळी परिसरातील अस्वच्छता आणि अतिक्रमणांची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू होती.

Ahilyanagar Accident: एकाच दिवशी ३ जिल्ह्यांसाठी काळा दिवस; तीन अपघातांत २१ जणांचा बळी

जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू यांचा सहभाग

परिसरात नियमित स्वच्छता राखावी, अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देश ग्रामपंचायत प्रशासनाला देण्यात आले. तसेच भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या कार्यालयालाही परिसराची नियमित स्वच्छता राखण्याबाबत सूचित करण्यात आले. गुरुवार, ८ ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजता वेरूळ लेणी परिसर व महावीर स्तंभचौक येथे विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत पंचायत समितीचे अधिकारी-कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, महिला बचत गटांच्या सदस्य, आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविकांनी सहभाग नोंदवून परिसराची स्वच्छता केली.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष

या मोहिमेस मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्न् पी. एम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार वासुदेव सोळंके, उपविभागीय दंडाधिकारी संतोष गोराड, तहसीलदार संतोष गुट्टे, गटविकास अधिकारी गिरीश सोनार, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, पंचायत विस्तार अधिकारी दीपक बागुल, ग्रामपंचायत अधिकारी ए. बी बनसोड, गंगाधर गायकवाड, प्रशांत वाघमारे व्यंकटेश आदमवाड, सचिन बनसोड, सी. टी इंगोले, गट समन्वयक मकरंद सुनीता, उमेदव व्यवस्थापक सुनील बारबले, सुप्रिया साळुंके देविदास चौधरी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते पर्यटनस्थळाची स्वच्छता कायम राखण्यासाठी नियमित स्वच्छता मोहिमा राबविण्यासह नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

Akola News: जीआरपीच्या हद्दीत गुन्हेगारी वाढली! अकोल्यात ३२६ गुन्हे दाखल; प्रभावी गुन्हे नियंत्रणासमोर मोठे आव्हान

 

Web Title: Ellora caves cleanliness drive rs 15000 fine sambhajinagar news sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 08:36 PM

Topics:  

  • Sambhaji nagar
  • sambhaji nagar news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.