Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महापालिका निवडणुकीपूर्वीच ‘हा’ नेता करणार भाजपमध्ये प्रवेश; ठाकरे गटाला बसणार धक्का

रावसाहेब दानवे यांचा त्यांच्यावर पहिल्यापासून वरदहस्त असल्याने सावे व बोराळकर यांचा विरोध असला तरी त्यांना पक्षात परत घेतले जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 21, 2025 | 08:00 AM
भाजपाला नवा अध्यक्ष २१ जुलैपर्यंत

भाजपाला नवा अध्यक्ष २१ जुलैपर्यंत

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : ऐन विधानसभा निवडणुकीवेळी भाजपातून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करून शिवबंधन बांधणारे माजी उपमहापौर राजू पुन्हा घरवापसी करणे निश्चित झाले आहे. मात्र, त्यांच्या परतीस भाजपातील काही पदाधिकाऱ्यांचा विरोध असल्याने हा प्रवेश लांबला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे गत आठवड्यात शहरात आले होते. तेव्हा शिंदे व बावनकुळे यांच्यात माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मध्यस्ती घडवून आणत त्यांच्या परतीचे दार खुले केल्याचे सूत्रांनी सांगितले.

राजू शिंदे यांचा जनसंपर्क व मतांवर असलेली पकड लक्षात घेता लवकरच हा प्रवेश सोहळा होणार आहे, असे काहीसे सांगण्यात येत आहे. शिंदे यांनी विद्यमान आमदार व मंत्री संजय शिरसाट यांच्या विरूद्ध औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात दोन वेळा निवडणूक लढविली आहे. अर्थात यात त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांना एक लाखापेक्षा जास्त मतदान झाले होते.

शिंदे यांना नगरसेवक, उपमहापौर अशी संधी

शिंदे यांना पक्षाने नगरसेवक, उपमहापौर अशी संधी दिलेली आहे. महानगरपालिकेत अनेक पदांवर संधी दिली. मात्र, त्यांनी दोनवेळा पक्षाच्या विरोधात जाऊन विधानसभा निवडणुका लढवल्या. तसेच लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी लॉबिंग केल्याचा आरोप शिंदे यांच्यावर झाला होता. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश केला. या निवडणुकीत त्यांनी एक लाखापेक्षा अधिक मते घेतली. परंतु त्यांचा पराभव झाला.

मनपा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून होणार निर्णय

रावसाहेब दानवे यांचा त्यांच्यावर पहिल्यापासून वरदहस्त असल्याने सावे व बोराळकर यांचा विरोध असला तरी त्यांना पक्षात परत घेतले जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. उमेदवारासाठी त्यांनी परिश्रम घेतल्याचे मनपा निवडणुकीमुळे समोर आले होते.

एक गट करतोय वरिष्ठांकडे पाठपुरावा

कोणत्याही परिस्थिती पक्षाचाच महापौर करणे भाजपचे ध्येय असून, त्यादृष्टीने शिंदे यांना परत पक्षात घेतले जाण्याचीच अधिक शक्यता आहे. यासाठी एक गट वरिष्ठांकडे पाठपुरावा करत आहे. दरम्यान, शिरीष बोराळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पक्षाचे वरिष्ठ नेतेच याबाबत निर्णय घेतील. शहरातील नेतेमंडळी, प्रदेशाध्यक्ष हे काय ते ठरवतील, अशी प्रतिक्रिया दिली.

Web Title: Ex mayor raju shinde will join bjp soon nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Politics
  • political news

संबंधित बातम्या

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा
1

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?
2

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
3

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

‘वंदे मातरम’ बद्दल भाजपाने काँग्रेसला शिकवू नये, भाजपाने सुरु केलेला अपप्रचार थांबवावा- हर्षवर्धन सपकाळ
4

‘वंदे मातरम’ बद्दल भाजपाने काँग्रेसला शिकवू नये, भाजपाने सुरु केलेला अपप्रचार थांबवावा- हर्षवर्धन सपकाळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.