Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FDA Raid: नॉन-फूड ग्रेड तेलाचा वापर करून तूप-पनीर निर्मिती? अमोल दूध डेअरीवर छापा, छत्रपती संभाजीनगरमधून ठा साठा जप्त

FDA Raid: त्रपती संभाजीनगरातील एमआयडीसी चिकलठाणा येथील अमोल दूध डेअरीवर टाकलेल्या छाप्यात नॉन-फूड ग्रेड सोयाबीन तेल, भेसळयुक्त गाईचे तूप, अॅनालॉग पनीर आणि क्रीमसह एकूण ₹3.12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 04, 2026 | 06:52 PM
नॉन-फूड ग्रेड तेलाचा वापर करून तूप-पनीर निर्मिती? अमोल दूध डेअरीवर छापा, छत्रपती संभाजीनगरमधून ठा साठा जप्त

नॉन-फूड ग्रेड तेलाचा वापर करून तूप-पनीर निर्मिती? अमोल दूध डेअरीवर छापा, छत्रपती संभाजीनगरमधून ठा साठा जप्त

Follow Us
Follow Us:
  • छत्रपती संभाजीनगरात मोठी कारवाई!
  • डेअरीवर छापा; भेसळयुक्त तूप, पनीर आणि खाद्यतेल जप्त
  • ₹3.12 लाखांचा मुद्देमाल जप्त
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये अन्न व औषध प्रशासनाने (FDA) भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. एमआयडीसी चिकलठाणा परिसरातील मेसर्स अमोल दूध डेअरी (M/s. Amol Doodh Dairy) वर अन्न सुरक्षा विभागाने छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईदरम्यान नॉन-फूड ग्रेड सोयाबीन तेलाचा वापर करून अॅनालॉग पनीर आणि भेसळयुक्त गाईचे तूप तयार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

या कारवाईत तूप, पनीर, साय (क्रीम) आणि रिफाइंड सोयाबीन तेलासह एकूण ८८० किलो अन्नपदार्थ, अंदाजे ₹३,१२,८८० किमतीचा साठा जप्त करण्यात आला. त्यानंतर संबंधित किरकोळ विक्री केंद्रांवरूनही ४१ किलो गायीचे तूप (₹२९,३००) जप्त करण्यात आले. अशाप्रकारे एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ₹३,४२,१८० इतकी झाली.

एकीकडे कामाचा वणवा, दुसरीकडे तुकाराम मुंडेंना हायकोर्टाचा मोठा दणका! FDA समोर दुहेरी संकट; काय आहे प्रकरण?

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डेअरीचे मालक दामोदर केदार यांच्या युनिटमध्ये तपासणी केली असता १० ते १२ नॉन-फूड ग्रेड सोयाबीन तेलाचे बॅरल आढळून आले. हे तेल अॅनालॉग पनीर आणि तथाकथित शुद्ध गाईचे तूप तयार करण्यासाठी वापरले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

या कारवाईत अधिकाऱ्यांनी भेसळयुक्त गाईचे तूप, तूप तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी क्रीम, पनीरचा साठा तसेच नॉन-फूड ग्रेड सोयाबीन तेल जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या दुग्धजन्य पदार्थ आणि खाद्यतेलाची एकूण किंमत ₹3,12,380 इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी संबंधित उत्पादनांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून, अहवालानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. अन्नभेसळ रोखण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

जप्त करण्यात आलेल्या अन्नपदार्थांचा तपशील

सुट्टे तूप (Ghee) – २२९ कि.ग्रॅ. (किंमत ₹१,६७,४४०)

सुट्टी साय / क्रीम (Cream) – १९९ कि.ग्रॅ. (किंमत ₹५५,७२०)

पनीर (Paneer) – १७४ कि.ग्रॅ. (किंमत ₹४५,२४०)

रिफाइंड सोयाबीन तेल – २७८ कि.ग्रॅ. (किंमत ₹४४,४८०)

एकूण ८८० कि.ग्रॅ. अन्नपदार्थ, किंमत ₹३,१२,८८० जप्त करण्यात आली.

लक्ष्मी दूध डेअरीच्या विक्री केंद्रांवरही कारवाई

तपासादरम्यान अमोल दूध डेअरीमधून शहरातील लक्ष्मी दूध डेअरीच्या तीन विक्री केंद्रांना पनीर आणि तुपाचा पुरवठा होत असल्याचे उघड झाले. त्यानुसार पुढील ठिकाणी तपासणी करण्यात आली:

टी.व्ही. सेंटर परिसर

कामगार चौक परिसर

श्रीराम चौक, दर्गा रोड परिसर

या तिन्ही विक्री केंद्रांवरून ४१ कि.ग्रॅ. गायीचे तूप, किंमत ₹२९,३००, जप्त करण्यात आले.

नमुने प्रयोगशाळेत; परवाना तात्काळ निलंबित

जप्त करण्यात आलेल्या सर्व अन्नपदार्थांचे नमुने मान्यताप्राप्त अन्न प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्यामुळे मे. अमोल दूध डेअरीचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ (Forthwith) निलंबित करण्यात आला असून उत्पादन युनिटही बंद करण्यात आले आहे.

मुलांच्या ताटात आता फक्त पौष्टिक आहार! राज्यातील सर्व शाळांसाठी तुकाराम मुंढे यांची नवी नियमावली, विनापरवाना खाद्यविक्रीवर थेट…

FDAचा इशारा

अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न उपलब्ध करून देण्यासाठी राज्यभर अन्न आस्थापनांची नियमित तपासणी सुरू राहणार आहे. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अन्न व्यवसायिकांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई केली जाईल.

Web Title: Fake ghee and analogue paneer seized at amol doodh dairy in chhatrapati sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 06:52 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • FDA
  • maharashtra

संबंधित बातम्या

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर
1

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
2

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज
3

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले
4

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.