Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sambhajinagar Crime : आम्हाला वेळ नाही. तुम्ही उरकून घ्या… बापाच्या अत्यंसंस्काराला मुलाचे शहारे आणणारे शब्द, नेमकं प्रकरण काय?

Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये ८० वर्षीय वृद्धाला अर्धांगवायूच्या त्रासामुळे रुग्णालयात उपचारानंतर वृद्धाश्रमात ठेवण्यात आले. वृद्धाश्रम संचालिकांच्या प्रयत्नांनंतर त्यांचा मुलगा आणि सून सापडले; मात्र घरात लग्न असल्याचे कारण देत मुलाने वडिलांना घरी नेण्यास नकार दिला.

  • By Sanman Jadhav
Updated On: Sep 22, 2026 | 05:26 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • वडीलांना घरी नेण्यास नकार
  • मृत्यूची बातमी कळवताच वेळ नाही म्हणाला मुलगा
  • पोलिसांच्या तंबीनंतर मुलगा वृद्धाश्रमात हजर
Sambhajinagar Crime :  ‘इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते’ या कवी सुरेश भट यांच्या गझलेतील ओळींमध्ये आयुष्यातील दुःख, वेदना आणि शेवटी मृत्यूमुळे मिळालेल्या सुटकेचे अतीव व मर्मभेदी दर्शन घडवले आहे. माणसाला जगताना ज्या वेदना व संघर्ष सहन करावे लागतात, त्याचे वास्तव अगदी टोकाला जाऊन येथे मांडले आहे. या कवितेच्या ओळी तंतोतंत खऱ्या ठरल्याच्या छत्रपती संभाजीनगर शहरात दिसून आल्या.

कुटुंबीयांचा शोध लागला, मुलगा भेटला; मात्र वडिलांना घरी नेण्यासाठी वेळ मिळाला नाही. अखेर ८० वर्षीय वृद्धाचा वृद्धाश्रमात झाल्यानंतर मृत्यू अंत्यसंस्कारासाठीही मुलाने सुरुवातीला नकार दिला. आम्हाला वेळ नाही, तुम्हीच अंत्यसंस्कार करून घ्या, असे उत्तर मिळाल्यानंतर वृद्धाश्रम संचालिकांनी पोलिसांत तक्रार करण्याची तंबी दिली. त्यानंतर मुलगा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आला.

 

काही दिवसांपूर्वी हा वृद्ध रेल्वे स्टेशन परिसरात अर्धांगवायूच्या आजाराने त्रस्त अवस्थेत आढळून आला होता, त्यांना घाटीत दाखल करण्यात आले. उपचारानंतर वृद्धाची रवानगी वृद्धाश्रमात करण्यात आली. संचालिका उमा तुपे यांनी त्यांच्या कुटुंबीयांचा शोध सुरू केला. प्रयत्नांनंतर मुलगा आणि सून यांचा ठावठिकाणा मिळाला.

वडीलांना घरी नेण्यास नकार

कुटुंबीय सापडल्यानंतर वडिलांना घरी नेण्याबाबत मुलाशी संपर्क करण्यात आला. मात्र, घरात लग्न असल्याने जागा कमी पडेल, असे कारण त्याने सांगितले. लग्न होऊ द्या, त्यानंतर बघू, असे सांगत वृद्धाला वृद्धाश्रमातच ठेवण्यात आले. दरम्यान, अर्धांगवायूचा आजार बळावत गेल्याने रविवारी सकाळी ७ वाजता वृद्धाचा मृत्यू झाला.

छत्रपती संभाजीनगरचा ‘वनवास’ संपला! ३३ वर्षांनंतर विकास आराखड्याला …

मृत्यूची बातमी कळवताच वेळ नाही म्हणाला मुलगा

वृद्धाच्या मृत्यूची माहिती तुपे यांनी मुलाला दिली. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन जाण्याची विनंती केली. मात्र, वेळ नाही, आम्हाला जमणार नाही. तुम्हीच अंत्यसंस्कार उरकून घ्या, असे उत्तर त्याने दिल्याची माहिती आहे, वारंवार विनंती करूनही प्रतिसाद न मिळाल्याने तुपे यांनी पोलिसांत तक्रार करण्याची तंबी दिली.

छ. संभाजीनगरमधील २.८५ लाख गुंठेवारी धारकांना मोठा दिलासा! ७/१२ रद्द …

पोलिसांच्या तंबीनंतर मुलगा वृद्धाश्रमात हजर

कायदेशीर कारवाईचा इशारा मिळताच काही वेळातच मुलगा वृद्धाश्रमात पोहोचला आणि मृतदेह ताब्यात घेतला. ज्या वडिलांनी मुलाला लहानाचे मोठे केले, त्यांच्यासाठी आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात वृद्धाश्रमाचा आधार ठरला. मृत्यूनंतरही अंत्यसंस्कारासाठी मुलाची प्रतीक्षा करावी लागली, हे या घटनेचे दुर्दैवी वास्तव ठरले.

 

Web Title: Sambhajinagar crime son refuses to take father home old age home death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 05:26 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • Crime in Sambhajinagar

संबंधित बातम्या

Rector Recruitment 2026: पदवीधर महिलांसाठी नोकरीची संधी! देवगिरी कॉलेज मुलींच्या वसतिगृहासाठी ‘या’ पदांची भरती सुरू
1

Rector Recruitment 2026: पदवीधर महिलांसाठी नोकरीची संधी! देवगिरी कॉलेज मुलींच्या वसतिगृहासाठी ‘या’ पदांची भरती सुरू

‘आश्वासनांचं गाजर अन् पोलिसांची स्थानबद्धता!’ सारथी, बार्टी, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा सरकारवर घणाघात
2

‘आश्वासनांचं गाजर अन् पोलिसांची स्थानबद्धता!’ सारथी, बार्टी, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा सरकारवर घणाघात

Devendra Fadnavis : मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी फडणवीसांनी दिला शब्द! कृष्णाखोरे आणि कोकणातून आणणार पाणी
3

Devendra Fadnavis : मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी फडणवीसांनी दिला शब्द! कृष्णाखोरे आणि कोकणातून आणणार पाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.