Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Child Marriage Free India Campaign : महाराष्ट्रातील शाळांमध्ये बालविवाहविरोधी जनजागृती; शिक्षण विभागाचे निर्देश

Child Marriage Free India Campaign : केंद्र सरकारच्या 'बालविवाहमुक्त भारत' अभियानांतर्गत महाराष्ट्रातील शाळांमध्ये बालविवाहविरोधी जनजागृती केली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार विविध उपक्रम, प्रतिज्ञा, माहितीपूर्ण चित्रफिती आणि डिजिटल माध्यमांतून अभियानाचा प्रसार केला जाणार आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 09, 2026 | 03:24 PM
Child Marriage Prevention Campaign ( बाल विवाह रोकथाम अभियान ) फोटो सौजन्य AI

Child Marriage Prevention Campaign ( बाल विवाह रोकथाम अभियान ) फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • अभियानाशी संबंधित माहिती प्रसिद्ध करण्याच्या सूचना  
  • शाळांच्या माध्यमातून बालविवाहविरोधी विचारांची रुजवणूक 
  • २७ नोव्हेंबरला विशेष उपक्रम राबवण्याच्या सूचना 
Child Marriage Free India Campaign : छत्रपती संभाजीनगरात बालविवाह ही केवळ सामाजिक अनिष्ट प्रथा नसून बालकांचे शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता आणि उज्ज्वल भविष्य हिरावून घेणारी गंभीर समस्या आहे. ही प्रथा समाजातून समूळ नष्ट करण्यासाठी आता शाळा आणि शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या ‘बालविवाहमुक्त भारत’ अभियानांतर्गत राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. बालविवाह रोखण्याच्या लढ्यात विद्यार्थ्यांना सहभागी करून सामाजिक परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाने २७ नोव्हेंबर २०२४ रोजी ‘बालविवाहमुक्त भारत’ (बीव्हीएमबी) अभियान सुरू केले.

 

बालविवाहासारख्या हानिकारक प्रथेविरोधात समाजात जागरूकता निर्माण करणे, नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविणे आणि विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधून प्रभावी उपाययोजना करणे, ही या अभियानाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. या अभियानाला अधिक गती देण्यासाठी २१ डिसेंबरपर्यंत हे १०० दिवसांचे विशेष जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.

अभियानाशी संबंधित माहिती प्रसिद्ध करण्याच्या सूचना

या पार्श्वभूमीवर राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संचालनालयाने शैक्षणिक संस्थांसाठी विशेष सूचना जारी केल्या आहेत. अभियानाचा प्रसार केवळ शाळेतील कार्यक्रमांपुरता मर्यादित न ठेवता डिजिटल माध्यमांचाही वापर केला जाणार आहे. शाळांच्या अधिकृत संकेतस्थळांवर जनजागृतीपर साहित्य, माहितीपूर्ण चित्रफिती, प्रतिज्ञा आणि अभियानाशी संबंधित माहिती प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शाळांच्या माध्यमातून बालविवाहविरोधी विचारांची रुजवणूक

प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी राज्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक आणि महानगरपालिका प्रशासनाला या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. शाळांच्या माध्यमातून बालविवाहविरोधी विचारांची रुजवणूक करून भविष्यातील पिढी अधिक जागरूक करण्यावर या अभियानाचा भर राहणार आहे.

संगमवाडीतील पाण्याच्या टाकीचे काम दोन महिन्यात पूर्ण करा, अन्यथा…; मनसेचा प्रशासनाला इशारा 

२७ नोव्हेंबरला विशेष उपक्रम राबवण्याच्या सूचना

बालविवाहमुक्त भारत अभियानाच्या अनुषंगाने २७ नोव्हेंबरच्या आसपास राज्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्थांनी विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या वयानुसार बालविवाहाचे दुष्परिणाम, बालकांचे अधिकार, शिक्षणाचे महत्व आणि बालविवाह प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती दिली जाणार आहे, बालविवाह रोखण्यासाठ केवळ शासकीय यंत्रणेचे प्रयत्न पुरेसे नसू समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षक, क्षेत्रीय अधिकारी आणि नागरिकानी बीव्हीएमबी पोर्टलच्या माध्यमातू बालविवाहविरोधी प्रतिज्ञा घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Dharashiv: “पुण्याहून सणाला घरी आली अन्…” फटाक्यांच्या की शॉर्ट सर्किटच्या ठिणगीने घेतला ६ जणांचा बळी; गावकऱ्यांनी JCB ने…

Web Title: Child marriage free india campaign maharashtra schools awareness sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 03:24 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • Chhatrapati Sambhajinagar News
  • Child Marriage

संबंधित बातम्या

Sambhajinagar CCTV Rules : संभाजीनगरमध्ये खासगी आस्थापनांना CCTV  बंधनकारक ! ५० मीटर परिसरावर पोलिसांची नजर
1

Sambhajinagar CCTV Rules : संभाजीनगरमध्ये खासगी आस्थापनांना CCTV बंधनकारक ! ५० मीटर परिसरावर पोलिसांची नजर

Samruddhi Mahamarg Security : समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर ? भगदाडांतून गुन्हेगारांची एन्ट्री
2

Samruddhi Mahamarg Security : समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर ? भगदाडांतून गुन्हेगारांची एन्ट्री

Sambhajinagar News : घाटी मेडिकल कॉलेजचा विस्तार; पीजीच्या ७३ अतिरिक्त जागांना हिरवा कंदील
3

Sambhajinagar News : घाटी मेडिकल कॉलेजचा विस्तार; पीजीच्या ७३ अतिरिक्त जागांना हिरवा कंदील

Sambhajinagar Farmer Relief : दिवाळीपूर्वी २.३९ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत ५,००० रुपयांची आगाऊ मदत जमा
4

Sambhajinagar Farmer Relief : दिवाळीपूर्वी २.३९ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत ५,००० रुपयांची आगाऊ मदत जमा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.