Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठवाड्यात मोठं जलसंकट; 160 गावांना 277 टँकरने पाणी; 74 तालुके दुष्काळग्रस्त

यंदा मराठवाड्यात मान्सून कमजोर राहिला. राज्यात सरासरीपेक्षा १८ टक्के कमी पाऊस झाला असून, मराठवाड्यात पावसाची तूट ३८ टक्के आहे. लातूरमध्ये ४८ टक्के, तर परभणीत ४३ टक्के कमी पाऊस नोंदवला गेला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 01, 2026 | 07:56 AM
मराठवाड्यात १६० गावांना २७७ टँकरने पाणी; ७४ तालुके दुष्काळग्रस्त

मराठवाड्यात १६० गावांना २७७ टँकरने पाणी; ७४ तालुके दुष्काळग्रस्त

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : मान्सून अद्याप पूर्णपणे परतलेला नसतानाच दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील अनेक भागांत पाणीटंचाई तीव्र झाली आहे. विभागातील ७६ पैकी ७४ तहसील दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आल्या आहेत. या भागातील १६० गावांना २७७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. स्थानिक विहिरी आणि जलस्रोत आटल्याने आणखी गावांकडून टँकरची मागणी वाढत आहे.

प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, पैठणजवळील जायकवाडी धरणासह प्रमुख जलाशयांमध्ये पिण्यासह घरगुती वापरासाठी पुरेसा पाणीसाठा आहे. मात्र, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विहिरी आणि स्थानिक जलस्रोत आटल्याने पिके व जनावरे वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना दररोज हजारो रुपये खर्च करून पाणी विकत घ्यावे लागत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शाहापूर येथील ४० वर्षीय शेतकरी बद्रीनाथ भरत अद्रकाचे पीक वाचवण्यासाठी दररोज तीन हजार रुपये खर्च करून दोन टँकर पाणी मागवत आहेत. याच पाण्याचा वापर कुटुंबासह १० जनावरांसाठीही केला जात आहे.

कापूस आणि मक्याचे संपूर्ण पीक हातचे गेल्याचे त्यांनी सांगितले. विहीर असूनही ती आटल्याने गेल्या १५ दिवसांपासून टँकरच्या पाण्यावर अवलंबून असल्याचे भरत यांनी सांगितले.

टँकरसाठी मोजावे लागत आहेत हजार रुपये

सिद्धनाथ वडगाव येथील शेतकरी सचिन बिलवाल हेही महिन्याहून अधिक काळ टँकरने पाणी विकत घेत आहेत. कुटुंब आणि तीन जनावरांसाठी ते पाणी वापरतात. एका टँकरसाठी त्यांना एक हजार रुपये मोजावे लागतात. हे पाणी साधारण आठवडाभर पुरते. ग्रामसभेतून शासनाकडे टँकरची मागणी करण्यास सांगितल्याचे त्यांनी सांगितले. पावसाअभावी कापूस, मका आणि तुरीचे उत्पादन झाले नसल्याचेही बिलवाल यांनी सांगितले.

मराठवाड्यात 38 टक्के पावसाची तूट

यंदा मराठवाड्यात मान्सून कमजोर राहिला. राज्यात सरासरीपेक्षा १८ टक्के कमी पाऊस झाला असून, मराठवाड्यात पावसाची तूट ३८ टक्के आहे. लातूरमध्ये ४८ टक्के, तर परभणीत ४३ टक्के कमी पाऊस नोंदवला गेला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७७ गावांना १२० टँकरद्वारे, तर बीडमधील ६५ गावांना १२७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जालन्यातही २२ टँकर सुरू आहेत. राज्य सरकारने ३५८ पैकी २६५ तहसील दुष्काळग्रस्त घोषित करून विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत.

Nashik News : त्र्यंबकरोडचे दळणवळण की नरकयातना? आयटीआय सिग्नलवर किलोमीटरभर रांगा, तासनतास कोंडी अन् वाहतुकीचा बोजवारा

Web Title: Severe water crisis in marathwada 277 tankers supplying water to 160 villages

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 07:56 AM

Topics:  

  • Marathwada Water
  • Water supply

संबंधित बातम्या

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
1

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी
2

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी

Ulhas River: उल्हास नदीतील गढूळता वाढली; बदलापूर-अंबरनाथमध्ये पाणीपुरवठ्यावर संकट
3

Ulhas River: उल्हास नदीतील गढूळता वाढली; बदलापूर-अंबरनाथमध्ये पाणीपुरवठ्यावर संकट

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
4

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.