Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Water Issue: ‘पाणी द्या, अन्यथा…’ मराठवाड्याच्या हक्काचे पाणी अडवले कुणासाठी? नीरा–भीमा, जेऊर बोगद्यांची कामे ठप्प

Water Issue: मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नीरा–भीमा आणि जेऊर बोगद्यांची कामे ठप्प असल्याने पाणीपुरवठ्याच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या कामांना गती देऊन मराठवाड्याला हक्काचे पाणी द्यावे, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 14, 2026 | 02:18 PM
‘पाणी द्या, अन्यथा...' मराठवाड्याच्या हक्काचे पाणी अडवले कुणासाठी? नीरा–भीमा, जेऊर बोगद्यांची कामे ठप्प; कैलास पाटील आक्रमक

‘पाणी द्या, अन्यथा...' मराठवाड्याच्या हक्काचे पाणी अडवले कुणासाठी? नीरा–भीमा, जेऊर बोगद्यांची कामे ठप्प; कैलास पाटील आक्रमक

Follow Us
Follow Us:
  • ‘पाणी द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू!’
  • आमदार कैलास पाटील यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा
  • नीरा–भीमा आणि जेऊर बोगद्यांची कामे रखडली
धाराशिव: मराठवाड्याच्या दुष्काळी जनतेसाठी जीवनदायी ठरणाऱ्या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला शासनाच्या निधीअभावी आणि प्रशासकीय उदासीनतेचा फटका बसत आहे. कोट्यवधी रुपये खर्चूनही नीरा–भीमा जोड बोगदा आणि जेऊर बोगद्याची कामे अनेक महिन्यांपासून बंद आहेत. तर मिरगव्हाण पंपगृहाचे कामही कासवगतीने सुरू आहे. एकीकडे मराठवाड्याच्या जनतेला पाण्याची आश्वासने द्यायची आणि दुसरीकडे हक्काचे पाणी आणणारी कामेच ठप्प ठेवायची, हा सरकारचा दुटप्पीपणा असल्याचा आरोप करत आमदार कैलास पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ‘आम्हाला आमच्या हक्काचे पाणी द्या, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करू,’ असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला. (Water Issue)

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्कप्रमुख मकरंद राजे निंबाळकर यांच्यासह आमदार कैलास पाटील यांनी शुक्रवारी (दि. १३ नोव्हेंबर) नीरा–भीमा जोड बोगदा, जेऊर बोगदा आणि मिरगव्हाण पंपगृह या महत्त्वाच्या प्रकल्पस्थळांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी प्रकल्पांच्या कामांची वस्तुस्थिती समोर आणत त्यांनी शासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

जिल्हा बँक निवडणुकीत महेश शिंदे ठरले ‘बाजीगर’; राष्ट्रवादीला आत्मचिंतनाची गरज

सात टीएमसी पाण्याचे स्वप्न कागदावरच!

कृष्णा खोऱ्यातील सात टीएमसी हक्काचे पाणी धाराशिव आणि बीड जिल्ह्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी नीरा–भीमा बोगदा, जेऊर बोगदा आणि मिरगव्हाण पंपगृह ही तीनही कामे पूर्ण होणे अत्यावश्यक आहे. नियोजनानुसार नीरा नदीवरील उद्धट बंधाऱ्यातून सात टीएमसी पाणी उजनी जलाशयात आणले जाणार आहे. त्यानंतर ५.३२ टीएमसी पाणी जेऊर बोगद्याद्वारे मिरगव्हाण पंपगृहापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. तेथून ३.०८ टीएमसी पाणी सीना–कोळेगाव जलाशयात, तर २.२४ टीएमसी पाणी सीना नदीत सोडण्याचे नियोजन आहे. मात्र, या संपूर्ण साखळीतील महत्त्वाची कामेच रखडल्याने मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

नीरा–भीमा बोगद्याचे २.६९ किलोमीटर काम रखडले

नीरा–भीमा जोड बोगद्याची एकूण लांबी २३.६८ किलोमीटर असून त्यापैकी २०.९९ किलोमीटर काम पूर्ण झाले आहे. उर्वरित २.६९ किलोमीटर काम आर्थिक नियोजनाअभावी जून २०२३ पासून बंद आहे. म्हणजेच जवळपास ८९ टक्के काम पूर्ण होऊनही उर्वरित कामासाठी निधी उपलब्ध होत नसल्याने संपूर्ण प्रकल्प अडकून पडला आहे. आज काम सुरू झाले तरी ते पूर्ण होण्यासाठी किमान एक ते दोन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

जेऊर बोगद्याचे कामही दीड वर्षापासून बंद

जेऊर बोगद्याची एकूण लांबी २६.८५ किलोमीटर असून आतापर्यंत २३.९७ किलोमीटर खोदकाम पूर्ण झाले आहे. अद्याप २.८८ किलोमीटर काम बाकी आहे. विशेषतः दहिगाव ते जेऊरदरम्यान २.७१ किलोमीटर खोदकाम शिल्लक आहे. दहिगाव येथील पाणी घेणारी प्रवेश संरचनाही अपूर्ण आहे. २७ जुलै २०२४ पासून या बोगद्याचे काम बंद असल्याने पाणी वाहून नेण्याची संपूर्ण यंत्रणाच रखडली आहे.

१११ कोटींचे पंपगृह, तरीही ४० टक्के काम बाकी

मिरगव्हाण येथील पंपगृहासाठी १११.५८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या ठिकाणी १३ हजार ५८० अश्वशक्ती क्षमतेचे सात पंप बसविण्याचे नियोजन आहे. मात्र, आतापर्यंत केवळ ६० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित ४० टक्के काम अद्याप बाकी आहे. बोगद्यांची कामे बंद आणि पंपगृहाचे काम संथगतीने सुरू असल्याने संपूर्ण सिंचन प्रकल्पाच्या उद्दिष्टालाच खीळ बसली आहे.

सरकारने मराठवाड्याच्या पाण्याचा अंत पाहू नये!

यावेळी आमदार कैलास पाटील म्हणाले, नीरा–भीमा बोगदा पूर्ण झाल्याशिवाय पाणी उजनीत येणार नाही आणि जेऊर बोगदा व मिरगव्हाण पंपगृह पूर्ण झाल्याशिवाय हे पाणी सीना–कोळेगावपर्यंत पोहोचणार नाही. एका बाजूला मराठवाड्याला पाणी देण्याच्या घोषणा करायच्या आणि दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष कामे बंद ठेवायची, हा प्रकार संतापजनक आहे. एकाच साखळीतील महत्त्वाची कामे रखडवून सरकार मराठवाड्याच्या जनतेच्या हक्काच्या पाण्याला अडथळा निर्माण करत आहे. ही कामे तातडीने सुरू करून पूर्ण करण्यासाठी शासनाने ठोस आर्थिक तरतूद करावी. मराठवाड्याच्या जनतेला आश्वासनांची नव्हे, तर प्रत्यक्ष पाण्याची गरज आहे. अन्यथा जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

या पाहणी दौऱ्यावेळी मकरंद राजे निंबाळकर, शिवाजी दादा सरडे, जिल्हा परिषद सदस्य सातपुते, प्रवीण कोकाटे, रवी वाघमारे, पंकज पाटील, सौदागर जगताप, राणा बनसोडे, राहुल पाटील, शौकत शेख, सुनील गरड, दयानंद थोरात, राकेश सूर्यवंशी, अमोल मुळे, मनोज पडवळ, अर्जुन पाटील, अभिराज कदम, राज जाधव, अशोक साळुंके यांच्यासह जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता नाईक आणि घनवट उपस्थित होते.

E20 पेट्रोलच्या गुणवत्तेवर बीपीसीएलचे स्पष्टीकरण; 893 नमुन्यांमध्ये इथेनॉलचे प्रमाण योग्य

💡

Frequently Asked Questions

  • Que: मराठवाड्यात सध्या कोणता पाण्याचा प्रश्न चर्चेत आहे?

    Ans: मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याच्या वाटपाचा आणि नीरा–भीमा तसेच जेऊर बोगद्यांच्या रखडलेल्या कामांचा प्रश्न चर्चेत आहे.

  • Que: नीरा–भीमा आणि जेऊर बोगद्यांच्या कामांबाबत काय स्थिती आहे?

    Ans: दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही बोगद्यांची कामे ठप्प आहेत. त्यामुळे संबंधित पाणीपुरवठा आणि प्रकल्पाच्या कामांना गती देण्याची मागणी होत आहे.

  • Que: आमदार कैलास पाटील यांनी सरकारला काय इशारा दिला आहे?

    Ans: मराठवाड्याला हक्काचे पाणी द्यावे आणि रखडलेली कामे मार्गी लावावीत; अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा आमदार कैलास पाटील यांनी दिला आहे.

Web Title: Marathwada water rights nira bhima jeur tunnel work stalled kailas patil warning sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2026 | 02:18 PM

Topics:  

  • maharashtra
  • Marathwada
  • Water Issue
  • Water supply

संबंधित बातम्या

३५व्या किल्ले स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; महाबळेश्वरमध्ये बालचमूंच्या ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती
1

३५व्या किल्ले स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; महाबळेश्वरमध्ये बालचमूंच्या ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती

‘माझ्याशी लग्न कर, नाहीतर…’; तरुणाची तरुणीला धमकी; शिवीगाळ करत मारहाण
2

‘माझ्याशी लग्न कर, नाहीतर…’; तरुणाची तरुणीला धमकी; शिवीगाळ करत मारहाण

Farmers Protest: ऊसदराचा तिढा कायम; रविवारी कराड-चिपळूण महामार्गावर शेतकरी संघटनांचा चक्काजाम!
3

Farmers Protest: ऊसदराचा तिढा कायम; रविवारी कराड-चिपळूण महामार्गावर शेतकरी संघटनांचा चक्काजाम!

Pratap Sarnaik: नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांकडून पैसे उकळले? एसटी भरतीतील गैरप्रकारांची सखोल चौकशी होणार
4

Pratap Sarnaik: नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांकडून पैसे उकळले? एसटी भरतीतील गैरप्रकारांची सखोल चौकशी होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.