Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेचा मोठी कारवाई; १५ वर्षांपासूनची अवैध ‘शहानुरमिया दर्गा चौपाटी’ भुईसपाट

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर महापालिकेने शहानुरमिया दर्गा चौकातील १५ वर्षांचे जुने अतिक्रमण हटवले आहे. लाठीचार्ज आणि गुन्हे दाखल करत प्रशासनाने रस्ते मोकळे केले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 01, 2026 | 03:43 PM
छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेचा मोठी कारवाई

छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेचा मोठी कारवाई

Follow Us
Follow Us:

 

  • छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेचा मोठा अ‍ॅक्शन मोड
  • १५ वर्षांपासूनची अवैध ‘शहानुरमिया दर्गा चौपाटी’ भुईसपाट
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): संभाजीनगर शहरातील (Chhatrapati Sambhajinagar) अत्यंत वर्दळीच्या शहानुरमिया दर्गा चौकातील तब्बल १५ वर्षांपासून सुरू असलेली अवैध चौपाटी गुरुवारी महापालिकेने भुईसपाट केली. परवानगीशिवाय उभारण्यात आलेली चौपाटी, रस्त्यावर पसरलेली दुकाने आणि इतर अतिक्रमणांवर जेसीबी फिरवून संपूर्ण परिसर मोकळा करण्यात आला. कारवाईदरम्यान विरोध करणाऱ्या काही तरुणांना पोलिसांनी लाठीचार्ज करून पांगवले. त्यामुळे चौक मोकळा झाल्याचे दिसून आले.

शहानुरमिया दर्गा चौक हा शहरातील महत्त्वाचा वाहतूक मार्ग असून, गेल्या अनेक वर्षांपासून येथे अनधिकृत चौपाटी उभारण्यात आली होती. पत्र्याच्या शेडमध्ये चालणाऱ्या या चौपाटीत विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, लहान दुकाने आणि फळविक्रेते यांची गर्दी होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अतिक्रमण वाढत गेल्याने वाहनचालकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. अनेक वेळा तक्रारी होऊनही कारवाई लांबणीवर पडत होती.

महापालिका प्रशासनाने अलीकडे अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा सुरू करत या परिसरावर लक्ष केंद्रीत केले. संबंधित व्यावसायिकांना अतिक्रमण स्वखर्चाने काढून घेण्याची सूचना आधीच देण्यात आली होती. काहींनी आपले साहित्य काढून घेतले; मात्र मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण कायम असल्याने अखेर मनपाने थेट कारवाईचा निर्णय घेतला.

गुरुवारी अतिक्रमण हटाव पथक शहानुरमिया दर्गा चौकात दाखल झाले. पाच जेसीबी, एक पोकलेन, पाच टिप्पर आणि सुमारे शंभर कर्मचारी या मोहिमेत सहभागी होते. संबंधित झोन कार्यालयातील अधिकारी, इमारत निरीक्षक आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी पोलिस बंदोबस्तात कारवाईस सज्ज झाले. सुरुवातीला रस्त्यालगत असलेली हॉटेल्स, फळविक्रेते आणि लहान दुकाने हटवण्यात आली. त्यानंतर मुख्य लक्ष चौपाटीवर केंद्रित करण्यात आले. काही वेळातच जेसीबीच्या सहाय्याने संपूर्ण संरचना जमीनदोस्त करण्यात आली.

Jayakwadi Dam: जायकवाडी धरणावर तिहेरी ताण! बाष्पीभवनामुळे दररोज कोट्यवधी लिटर पाणी हवेत; मराठवाड्यावर पाणीसंकटाचे सावट

कारवाईचा विस्तार आनंद गाडे चौकापर्यंत

मनपाच्या पथकाने केवळ चौपाटीपुरती कारवाई न थांबवता, पुढे शहानुरमिया दर्गा चौक ते आनंद गाडे चौक या मार्गावरील लहान-मोठी अतिक्रमणेही हटवली. यामुळे संपूर्ण मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे.

चौकातील वाहतुकीला मिळाला मोकळा मार्ग

अतिक्रमण हटवल्यानंतर शहानुरमिया दर्गा चौकातील दोन्ही बाजूंनी रस्ते मोकळे झाले आहेत. यामुळे वाहनांची रहदारी सुरळीत होण्यास मदत झाली असून, परिसरातील दीर्घकालीन वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

विरोधाला पोलिसांनी दिले चोख प्रत्युत्तर

कारवाई सुरू असताना काही नागरिकांनी एकत्र येत विरोध करण्याचा प्रयत्न केला. हुल्लडबाजीची चिन्हे दिसू लागल्याने पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केला. विरोध करणाऱ्या तरुणांवर लाठीचार्ज करून जमाव पांगवण्यात आला. त्यामुळे पुढील कारवाई कोणत्याही डथळ्याविना पूर्ण झाली.

पथकास विरोध केल्याने पोलिस ठाण्यात गुन्हा

शहानूरमियाँ दर्गा चौकातील चाँद पाशा सय्यद यांनी अतिक्रमण पथकास शिवीगाळ करून अंगावर धावून गेले. याप्रकरणी त्यांच्याविरूद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुन्हा अतिक्रमण केल्यास आणखी गुन्हे होऊ शकतात.

पुन्हा अतिक्रमण केल्यास थेट गुन्हा नोंदवणार

अतिक्रमण हटवल्यानंतरही संबंधितांनी पुन्हा त्याच जागेवर अतिक्रमण केल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. अशा प्रकरणांमध्ये थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा अतिक्रमण नियंत्रण विभागाने दिला आहे. शहरातील प्रमुख रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी ही मोहीम पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

Heat Wave News: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला उष्णतेचा तडाखा; उष्माघात सदृश्य १२ रुग्ण दाखल, आरोग्य विभाग सतर्क

Web Title: Shahnoormiya dargah chowk encroachment removed mumbai municipal corporation action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 03:43 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल
1

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती
2

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!
3

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!

‘… तर राजीनामा देऊन जाऊ शकता’; महाराष्ट्राचे ‘सिंघम’ Tukaram Mundhe यांचा ‘त्या’ कर्मचाऱ्यांना थेट इशारा
4

‘… तर राजीनामा देऊन जाऊ शकता’; महाराष्ट्राचे ‘सिंघम’ Tukaram Mundhe यांचा ‘त्या’ कर्मचाऱ्यांना थेट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.