Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अवकाळीचा डबल फटका! एकीकडे पाऊस, दुसरीकडे मजुरांची टंचाई; शेतमाल वाया जाण्याची भीती

शेतकऱ्यांनी शेतात मका आणि सोयाबीनची सोंगणी करून ठेवलेली आहे. मात्र, पाऊस उघडत नसल्याने हा सर्व माल शेतातच पडून आहे. तसेच 'पांढरे सोने' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेचणीला आलेल्या कापसाचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 29, 2025 | 10:16 PM
अवकाळीचा डबल फटका! एकीकडे पाऊस, दुसरीकडे मजुरांची टंचाई (Photo Credit - X)

अवकाळीचा डबल फटका! एकीकडे पाऊस, दुसरीकडे मजुरांची टंचाई (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:
  • आठ-दहा दिवसांपासून सतत पाऊस
  • सोंगणी केलेला शेतमाल शेतात पडून
  • मजुरांअभावी शेतमाल वाया जाण्याची भीती

बनकिन्होळा (सिल्लोड): सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा, बाभूळगाव बु., भायगाव, चिंचखेडा, वरखेडी कायगाव, गेवराई सेमी, केन्हाळा, भवन, आदी परिसरांमध्ये गेल्या आठ ते दहा दिवसांपासून रात्रंदिवस अवकाळी पाऊस पडत आहे. मंगळवारी (दि. २८) देखील पाऊस झाला, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी शेतात मका आणि सोयाबीनची सोंगणी करून ठेवलेली आहे. मात्र, पाऊस उघडत नसल्याने हा सर्व माल शेतातच पडून आहे. तसेच ‘पांढरे सोने’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेचणीला आलेल्या कापसाचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

दिवाळीत शेतमाल वाया जाण्याची भीती

सध्या तालुक्यात अनेक ठिकाणी मका, सोयाबीन सोंगणी आणि कापूस वेचणीचे काम सुरू आहे. सततच्या पावसामुळे सोंगणी केलेली सोयाबीन आणि मका पूर्णपणे भिजून काळी पडू लागली आहे. काही शेतकऱ्यांनी जमा करून ठेवलेली सोयाबीनची सुडी आणि मकादेखील वाळत नसल्याने वाया जात आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ तयारी पूर्ण; २४ हजार परीक्षार्थींसाठी २३ नोव्हेंबरला ३७ केंद्रांवर व्यवस्था

उत्पन्न घटले, खर्च वाढला

सोयाबीन आणि मक्याला सध्या बाजारात कमी भाव मिळत असल्याने शेतकरी आधीच अडचणीत आहेत. त्यातच सतत पाऊस आणि सूर्यदर्शन मिळत नसल्यामुळे शेतमाल खराब होत आहे. अवकाळी पावसामुळे आधीच शेतीत खर्च वाढला आहे. त्यातच मका, सोयाबीन आणि कापसाचे मोठे नुकसान झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी यंदा दिवाळीचा सणही साजरा केला नाही.

कापसाचे मोठे नुकसान

पावसामुळे वेचणीला आलेला कापूस ओला होऊन त्याच्या वाती झाल्या असून, कापूस काळवंडला आहे. परिणामी, कापसाची गुणवत्ता घसरल्याने बाजारात त्याला योग्य दर मिळत नाहीये. व्यापारीही कमी भाव देत असल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत मजुरी, खत आणि औषधांचे दर वाढले, पण अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची सर्व मेहनत वाया गेली आहे, अशी खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.

छत्रपती संभाजीनगर हादरलं! वैयक्तिक वादातून एकाच कुटुंबाकडून तरुणावर चाकू-रॉडने जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी

Web Title: Soybean maize and cotton damaged by heavy rains in sillod taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 10:16 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ तयारी पूर्ण; २४ हजार परीक्षार्थींसाठी २३ नोव्हेंबरला ३७ केंद्रांवर व्यवस्था
1

छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ तयारी पूर्ण; २४ हजार परीक्षार्थींसाठी २३ नोव्हेंबरला ३७ केंद्रांवर व्यवस्था

Chhatrapati Sambhajinagar Water Crisis: छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी संकट गडद! महावितरणच्या ‘झटका’मुळे ५० तास पाणीपुरवठा बंद
2

Chhatrapati Sambhajinagar Water Crisis: छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी संकट गडद! महावितरणच्या ‘झटका’मुळे ५० तास पाणीपुरवठा बंद

Crime News: छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘टॅक्स घोटाळा’ कॉल सेंटरचा पर्दाफाश! अमेरिकन नागरिकांना लाखो डॉलरचा गंडा
3

Crime News: छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘टॅक्स घोटाळा’ कॉल सेंटरचा पर्दाफाश! अमेरिकन नागरिकांना लाखो डॉलरचा गंडा

नाशिकच्या तयारीमुळे छत्रपती संभाजीनगरच्या तीर्थक्षेत्रांकडे पर्यटकांचा ओघ! ८७१९ कोटींच्या विकास आराखड्याचे काम मात्र कागदावरच
4

नाशिकच्या तयारीमुळे छत्रपती संभाजीनगरच्या तीर्थक्षेत्रांकडे पर्यटकांचा ओघ! ८७१९ कोटींच्या विकास आराखड्याचे काम मात्र कागदावरच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.