छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये संतापजनक घटना समोर आली आहे. वैयक्तिक वादातून एकाच कुटुंबातील सदस्यांनी परिसरातीलच तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कदायक घटना घडल्याचे समोर आले आहे. यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. ही घटना नागसेननगर परिसरात शुक्रवारी मध्यरात्री सुमारे १२ वाजता घडली आहे. जखमी तरुणाचा नाव अक्षय शिरसाट (वय २८) असे आहे.
मुलगा की सैतान? दारुसाठी पैसे देत नाही म्हणून केला आईचा खून; तासगावातील घटना
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय शिरसाट हा नागसेननगरमध्ये राहतो. शुक्रवारी रात्री तो आपल्या मित्रांसोबत गाढे चौकात गप्पा मारून घरी परतत होता. त्याचवेळी वैयक्तिक वादातून एकाच कुटुंबातील सदस्यांनी त्याला रस्त्यावर अडवून शिवीगाळ करत प्राणघातक हल्ला केला. हल्ला दरम्यान आरोपींनी अक्षयला जमिनीवर आपटून, त्याच्यावर चाकू आणि लोखंडी रोडने वार केले. अक्षय रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध पडल्याने परिसरात एकाच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत अक्षयला घाटी रुग्णालयात दाखल केले, जिथे त्याच्यावर उशिरापर्यंत शस्त्रक्रिया सुरु होती. डॉक्टरांनी त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगितले. घटनेनंतर पोलीस निरीक्षक अतुल येरमे आणि संग्राम ताटे यांनी घटनास्थळी धाव घेत मोठा फौजफाटा तैनात केला. जमावाला पांगवून पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरु केला असून. नागसेननगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
संभाजीनगर हादरलं! किरकोळ वादातून तरुणाचा धारदार शस्त्राने खून
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक हत्येची घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून एका २५ वर्षीय तरुणावर धारदार शास्त्राने वार करत हत्या करण्यात आल्या आहे. शुभम रणवीर सिंह राजपुत असे मृत तरुणाचे नाव आहे. गल्लीत अपरात्री आलेल्या तरुणाला हटकल्याचा राग मनात धरून मुख्य आरोपीने पोरं गोळा करत तरुणाला धारधार शास्त्राने हल्ला करत संपवले. पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून दोन आरोपी फरार आहेत. ही घटना संभाजीनगरच्या कन्नडमध्ये नागद गावात मंगळवारी रात्री सडे आठच्या सुमारास घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमोल दशरथ निकम, सचिन दशरथ निकम, शंकर दशरथ निकम, ऋषी गोविंद निकम, अविनाश गोविंद निकम, बंडू शिवसिंह राजपूत आणि सतीश संतोष राजपूत असे सात आरोपींची नावे आहेत. मंगळवारी रात्री शुभम हा ग्रामपंचायतीकडेजाणाऱ्या रस्त्याने जात असतांना डीपीजवळ आरोपी तरुणांनी त्याच्यावर हल्ला चढवला. यात २५ वर्षीय तरुणाची मृत्यू झाली.