Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेला ई-केवायसीचा फटका! लाखो महिलांचे हप्ते रखडले; नेमकं कारण काय?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने लाखो महिलांचे हप्ते रखडले आहेत. प्रशासनाने अंगणवाडी सेविकांना प्रत्यक्ष पडताळणीचे आदेश दिले असून सेविकांनी याला तीव्र विरोध दर्शवला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 01, 2026 | 03:55 PM
'लाडकी बहीण' योजनेला ई-केवायसीचा फटका! लाखो महिलांचे हप्ते रखडले (photo Credit- X)

'लाडकी बहीण' योजनेला ई-केवायसीचा फटका! लाखो महिलांचे हप्ते रखडले (photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • ई-केवायसीच्या जाळ्यात ‘लाडकी बहीण’
  • अंगणवाडी सेविकांवर थोपवली जबाबदारी
  • काम करण्यासाठी संघटनेने केला तीव्र विरोध
Ladki Bahin Yojana: सरकारी योजनेचा लाभ देण्याऐवजी महिलांना अडचणीत आणणारी ई-केवायसी प्रक्रिया आता ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेसाठी मोठा अडसर ठरत आहे. ऑनलाईन पडताळणीतील गोंधळामुळे राज्यातील लाखो पात्र महिलांचे हप्ते थांबले असून, ही चूक दुरुस्त करण्यासाठी थेट अंगणवाडी सेविकांवर प्रत्यक्ष घरभेटींची जबाबदारी टाकण्यात आली आहे. मात्र, अतिरिक्त कामाचा भार, मानधनाचा प्रश्न आणि आधीच प्रलंबित असलेल्या जबाबदाऱ्यांमुळे सेविकांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला आहे.

ई-केवायसी प्रक्रियेत विचारण्यात आलेल्या एका तांत्रिक प्रश्नामुळे अनेक महिलांची माहिती चुकीच्या पद्धतीने नोंदवली गेली. परिणामी, त्या महिला शासकीय सेवेत असल्याचा किंवा अपात्र असल्याचा ठपका प्रणालीत लागला आणि थेट हप्ते बंद शासनाने झाले. अनेक लाभार्थी महिलांनी हेल्पलाईन, सेवा केंद्रे आणि पंचायत पातळीवर तक्रारी केल्या; मात्र, त्यातूनही तातडीने दिलासा मिळालेला नाही. या गोंधळानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देत अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक लाभार्थीच्या घरी जाऊन
कागदपत्रांची तपासणी करून पुन्हा नोंदणी करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, आधीच पोषण आहार, लसीकरण, पूर्वप्राथमिक शिक्षण, माता-बाल आरोग्य नोंदी आणि विविध सर्वेक्षणांची कामे सुरू असताना आणखी एक मोठे काम अंगावर पडल्याने सेविकांमध्ये तीव असंतोष पसरला आहे.

‘लाडक्या बहिणी’च्या अडचणी थांबता थांबेना ! हफ्त्यासाठी महिलांना करावी लागते पायपीट

योग्य तांत्रिक व्यवस्था उभी केली नाही

योजना तयार करताना आणि ई-केवायसी अनिवार्य करताना प्रशासनाने योग्य तांत्रिक व्यवस्था उभी केली नाही, त्याचा फटका आता सेविकांना बसत आहे. “लाभार्थ्यांची थेट जबाबदारी आमच्यावर टाकून शासन स्वतःच्या चुका झाकण्याचा प्रयत्न करत आहे,” अशी भावना सेविकांमध्ये आहे. प्रत्यक्ष पडताळणीदरम्यान कोणतीही चूक झाली, तर त्याची जबाबदारीही सेविकांवरच येणार, ही भीतीही अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केली जात आहे.

महिला म्हणतात… चूक आमची नाहीच !

अनेक महिलांचे मासिक उत्पन्न पूर्णपणे या योजनेवर अवलंबून आहे. हप्ता थांबल्यामुळे घरखर्च, औषधोपचार आणि शिक्षणाच्या गरजांवर परिणाम झाल्याचे लाभाध्यर्थ्यांकडून सांगण्यात येत आहे. “चूक आमची नाही, तरी शिक्षा आम्हालाच,” अशी भावना अनेक महिलांनी व्यक्त केली आहे.

मार्ग निघणार का ?

राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, शासनाने प्रत्यक्ष पडताळणीचा आदेश मागे न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालये व महिला-बालविकास कार्यालयांसमोर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, ई-केवायसीतील तांत्रिक त्रुटी तातडीने दुरुस्त करून थेट प्रणालीद्वारे पात्रता निश्चित करावी, अशी मागणी संघटनांकडून होत आहे.
एकीकडे ‘लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक आधार देण्याचा दावा केला जात असताना, दुसरीकडे प्रशासनातील त्रुटी आणि नियोजनाचा अभाव यामुळेच महिलावर मानसिक व आर्थिक ताण वाढत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता शासन या गोंधळातून मार्ग काढत लाभार्थीना थेट दिलासा देणार की पुन्हा एकदा जबाबदारी खालच्या पातळीवर ढकलली जाणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी पतीने केली फसवणूक, दुसऱ्या महिलेला बोलवलं अन्…

Web Title: Ladki bahin yojana ekyc issue anganwadi workers oppose verification

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 03:55 PM

Topics:  

  • Anganwadi Sevika
  • Chhatrapati Sambhajinagar
  • Ladki Bahin Yojana

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.