
छत्रपती संभाजीनगरमध्ये थंडीमुळे भाजीपाला कडाडला! (Photo Credit - X)
पालेभाज्या ९०% महागल्या
मागील महिन्यात परतीच्या पावसामुळे भाज्यांचे मोठे नुकसान झाले होते, त्यामुळे आता थंडी वाढताच कृषी उत्पन्न बाजार समितीत मालाची आवक घटली आहे. यामुळे औरंगपुरा, शहागंज, पिरबाजारसह शहरातील इतर मंड्यांतील विक्रीवर परिणाम झाला आहे.
प्रमुख भाज्यांचे दर (प्रति किलो)
जीवनावश्यक असलेल्या भाज्यांचे वाढलेले दर गृहिणींसाठी डोकेदुखी ठरत आहेत.
| भाजीचे नाव | दर (प्रति किलो) |
| मटार (वाटाणा) | ₹ २०० |
| गवाराच्या शेंगा | ₹ १२० |
| भेंडी | ₹ ८० |
| शिमला मिरची | ₹ ८० |
| फुलकोबी | ₹ ७० |
| हिरवी मिरची व अद्रक | ₹ ६० |
| दुधी भोपळा | ₹ ६० |
| लिंबू | ₹ ५० |
| बटाटे | ₹ ३५ |
| हायब्रीड लसूण | ₹ १८० |
मटार, फुलकोबी, भेंडी, मिरची आणि अद्रक या भाज्या या दरात खरेदी करणे म्हणजे कंबरडे मोडण्यासारखे असल्याची महिलांची भावना आहे.
अंडी आणि लसणाचे दरही तेजीत