Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vegetable price News : गृहिणींसाठी मोठा दिलासा; भाज्यांची किंमतीत मोठी घसरण ; मिरची टोमॅटोचे नवे दर काय ?

शेतकऱ्यांकडून फळभाज्या व पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने शहरातील भाजी बाजारपेठेत सध्या दर घसरल्याचे चित्र आहे. विशेषतः पालेभाज्यांची आवक लक्षणीयरीत्या वाढल्यामुळे दर कमी झाले असून ग्राहकांची गर्दी होत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 27, 2026 | 06:03 PM
Vegetable price News :  गृहिणींसाठी मोठा दिलासा; भाज्यांची किंमतीत मोठी घसरण ; मिरची टोमॅटोचे नवे दर काय ?
Follow Us
Close
Follow Us:
  • भाज्यांची किंमतीत मोठी घसरण ;
  • मिरची टोमॅटोचे नवे दर काय ?
कोल्हापूर : शेतकऱ्यांकडून फळभाज्या व पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने शहरातील भाजी बाजारपेठेत सध्या दर घसरल्याचे चित्र आहे. विशेषतः पालेभाज्यांची आवक लक्षणीयरीत्या वाढल्यामुळे दर कमी झाले असून ग्राहकांमध्ये खरेदीची चांगलीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. लक्ष्मीपुरी भाजी बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होत असून व्यवहारात वाढ झाली आहे. सध्या मेथी, पोकळा, चाकवत यांसारख्या पालेभाज्या दहा रुपयाला एक पेंडी या दराने बाजारात उपलब्ध आहेत. पालेभाज्यांचे दर स्वस्त झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी थेट बाजारात भाजी पाठवल्याने आवक वाढली असून त्याचा फायदा ग्राहकांना होत आहे. स्वस्त आणि ताजी भाजी मिळत असल्याने खरेदीत वाढ झाली आहे.

मिरचीचे दर उतरले
मिरचीचा दर सध्या 80 रुपये किलो असून गेल्या काही दिवसांच्या तुलनेत दरात घट झाली आहे. त्यामुळे ग्राहकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. हॉटेल व्यावसायिक व गृहिणींनी मिरचीची खरेदी वाढवली आहे.

लसूण व गवार दरवाढीने ग्राहक चिंतित
पालेभाज्या स्वस्त झाल्या असल्या तरी लसूण व गवारने मात्र ग्राहकांचे बजेट बिघडवले आहे. सध्या लसूण 180 रुपये किलो दराने विकला जात असून गेल्या आठवड्याच्या तुलनेत सुमारे 40 रुपयांची दरवाढ झाली आहे. तसेच गवार दीडशे रुपये किलो दराने विक्रीला असून गेल्या आठवड्यात गवारीच्या दरात सुमारे 30 रुपयांची वाढ झाल्याची माहिती आहे.

घरगुती वापरातील भाज्यांचे दर तुलनेने परवडणारे आहेत. कांदा 25 रुपये किलो, बटाटा 30 रुपये किलो, वाटाणा 60 रुपये किलो, वराणा 80 रुपये किलो, कोथिंबीर 15 रुपये पेंडी या दराने विक्री होत आहे. त्यामुळे सामान्य कुटुंबांचा भाजीपाला खर्च काही प्रमाणात आटोक्यात राहिला आहे.दर कमी असल्याने लक्ष्मीपुरी बाजारपेठेत सकाळीच मोठी गर्दी होत आहे. स्वस्त दरात भाजी मिळत असल्याने नागरिक खरेदीसाठी उत्साहाने बाजारात येत आहेत. यामुळे भाजी विक्रेत्यांनाही समाधानकारक विक्री होत आहे.

Kolhapur News : “केएमटी बसेसना चांगले दिवस नक्कीच आणू”; रोहन अतिग्रे यांचं आश्वासन

फळभाज्यांचे दर नियंत्रणात
फळभाज्यांच्या बाबतीत बहुतांश भाज्यांचे दर सध्या नियंत्रणात असल्याचे दिसून येत आहे. भेडी 80 रुपये किलो, दोडका 80 रुपये किलो, वांगी 60 रुपये किलो, कारली 60 रुपये किलो, गाजर 50 रुपये किलो, ढबू 80 रुपये किलो या दराने विक्री होत आहे, पलोंवर तीस रुपये एक नग, शेवगा दहा रुपयाला एक नग, कोबी वीस रुपये नग अशा दराने बाजारात उपलब्ध आहे.
लक्ष्मीपुरी भाजी बाजारपेठ :
दर (रु.)
भाजीचे नवे दर
मेथी- रु 10 प्रति पैडी
मिरची-रु 80प्रति किलो
पोकळा-रु 10 प्रति पेडी
फ्लॉवर-रु 30 प्रति नग
चाकवत- रु 10 प्रति पेडी
शेवगा-रु 10 प्रति नग
कोथिंबीर-रु 15 प्रति पेडी
कोबी-रु 20 प्रति नग
भेंडी- रु 80 प्रति किलो
वाटाणा- रु 60 प्रति किलो
दोडका-रु 80 प्रति किलो
वराणा-रु 80 प्रति किलो
वांगी-रु 60 प्रति किलो
कांदा-रु 25 प्रति किलो
कारली-रु 60 प्रति किलो
बटाटा-रु 30 प्रति किलो
गाजर-रु 50 प्रति किलो
लसूण-रु 180 प्रति किलो असे एकंदरीतच नवे दर लागू झाले आहेत.

Kolhapur News : पंचगंगा नदीप्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करणार का ? प्रदूषण मंडळाला नागरिकांचा संतप्त सवाल

Web Title: Big relief for housewives big drop in vegetable prices what are the new prices of chillies and tomatoes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 06:03 PM

Topics:  

  • Agriculrture News
  • kolhapur news
  • Rates of Vegitables

संबंधित बातम्या

Kolhapur News : शिवरायांच्या विचारांनी भारावला उत्तराखंडचा छोरा ; थेट सायकलवरुन 315 किल्ल्यांना भेट देण्याचा संकल्प
1

Kolhapur News : शिवरायांच्या विचारांनी भारावला उत्तराखंडचा छोरा ; थेट सायकलवरुन 315 किल्ल्यांना भेट देण्याचा संकल्प

Kolhapur News : कडाक्याच्या उन्हाळ्य़ात दरवाढीचा चटका ; आवक घटल्याने लिंबू महागला
2

Kolhapur News : कडाक्याच्या उन्हाळ्य़ात दरवाढीचा चटका ; आवक घटल्याने लिंबू महागला

Sangali News : लिंगायत समाजाचं प्रशासनाला निवेदन; मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाचा दिला इशारा
3

Sangali News : लिंगायत समाजाचं प्रशासनाला निवेदन; मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाचा दिला इशारा

Kolhapur News : आरोग्य यंत्रणेचे निघाले धिंडवडे;आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात डॉक्टरच मद्यधुंद
4

Kolhapur News : आरोग्य यंत्रणेचे निघाले धिंडवडे;आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात डॉक्टरच मद्यधुंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.