Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

होय, तुमची सावली सोडणार तुमची साथ; 19 मे ला ‘झिरो शॅडो डे’

अमरावती, मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या शहरांत, अक्षांशानुसार वेगवेगळ्या तारखांना हा दिवस अनुभवता येईल. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये यावर्षी १९ मे रोजी हा खगोलीय चमत्कार पाहायला मिळणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 07, 2026 | 01:47 PM
होय, तुमची सावली सोडणार तुमची साथ; 19 मे ला 'झिरो शॅडो डे'

होय, तुमची सावली सोडणार तुमची साथ; 19 मे ला 'झिरो शॅडो डे'

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : ‘शून्य सावली दिवस’ म्हणजेच ‘झिरो शॅडो डे’चा अनुभव छत्रपती संभाजीनगरकरांना अनुभवण्याची संधी मिळणार असून, यंदा १९ मे रोजी तुमची सावली तुमची साथ सोडणार आहे. असे म्हणतात की, आपली सावली आपली साथ कधीच सोडत नाही. हे शंभर टक्के सत्य आहे. दिवसाच्या उजेडात मोकळ्या जागेत उभे असताना, चालताना आपली सावली आपली सोबत देत असते. सुरूवातीला कमी उंची असलेली सावली सूर्योदयावेळी जास्त उंचीही होते.

सावलीचा हा छुपा खेळ चालू असतो. पण, वर्षातले दोन दिवस सावली तुमची साथ सोडते. या दोन दिवसांना ‘शून्य सावलीचा दिवस’ किंवा ‘शून्य सावली योग’ म्हणतात. या दिवशी आपल्या स्थळाचे अक्षांश आणि सूर्याची क्रांती एकसमान होते. हा योग केवळ उत्तर गोलार्धातील कर्क वृत्त आणि दक्षिण गोलार्धातील मकर वृत्त या प्रदेशमध्ये राहणाऱ्या लोकांच्याच नशिबी आहे. छत्रपती संभाजीनगर यामध्ये येते. शहरात यंदा १९ आणि २० मे रोजी हा खगोलीय खेळ पाहायला मिळणार आहे.

विभागीय आयुक्तांनी दखल न घेतल्यास उच्च न्यायालयात जाणार; दुष्काळी कामांच्या अनियमिततेवर झेडपी सदस्य देसाई आक्रमक

खगोलीय घटनाक्रमानुसार, जगभरात झिरो शेंडो डे चा कालावधी वेगवेगळा असतो. साधारणपणे मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात हा खगोलीय चमत्कार पाहता येतो. महाराष्ट्र राज्यात ३ ते ३१ मे दरम्यान, विविध शहरांत शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे. अमरावती, मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या शहरांत, अक्षांशानुसार वेगवेगळ्या तारखांना हा दिवस अनुभवता येईल. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये यावर्षी १९ मे रोजी हा खगोलीय चमत्कार पाहायला मिळणार आहे. जेव्हा सूर्य बरोबर डोक्यावर आल्याने दुपारी काही क्षण सावली नाहीशी होते. ही खगोलीय घटना कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या दरम्यान वर्षातून दोनदा घडते. स्थानिक दुपारी १२:१४ ते १२:२४ च्या दरम्यान हा अनुभव घेता येईल.

१ ते २ मिनिटांचा चमत्कार

सूर्य किरण जमिनीवर लंब पडून वस्तूंची सावली त्यांच्या पायाखाली झाकली जाते, असे या मागील वैज्ञानिक कारण सांगितले जाते. हा खगोलीय चमत्कार फक्त काही सेकंद किंवा १ ते २ मिनिटे टिकतो.

असा करा प्रयोग…

उन्हात उभे राहून किंवा एखादी काठी सरळ जमिनीवर ठेवून तुम्ही तुमची सावली गायब होताना पाहू शकता. पृथ्वीची फिरण्याची गती आणि सूर्याची स्थिती समजून घेण्यासाठी ही एक चांगली संधी आहे. हवामान ढगाळ असेल, तर सावली न दिसण्याचा अनुभव घेता येणार नाही.

कार्यशाळेतून माहिती

शहरातील एमजीएम विज्ञान केंद्रात वैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर यांची पुण्यतिथी आहे. तसेच १९ मे रोजी झिरो शेंडो डे आहे. हे दोन्ही औचित्य साधून खगोलशास्त्राविषयी विज्ञान केंद्रात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. लवकरच याबाबत अधिक माहिती देणार आहोत.

– श्रीनिवास औंधकर, संचालक, एमजीएम विज्ञान केंद्र.

Web Title: Your shadow will leave your side may 19th is zero shadow day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 01:47 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar News

संबंधित बातम्या

छ. संभाजीनगर महापालिकेचा मास्टर प्लॅन! शहरातील ‘या’ १२ प्रमुख मार्गांवर आता दिवस-रात्र फिरणार अतिक्रमणविरोधी गस्ती पथके
1

छ. संभाजीनगर महापालिकेचा मास्टर प्लॅन! शहरातील ‘या’ १२ प्रमुख मार्गांवर आता दिवस-रात्र फिरणार अतिक्रमणविरोधी गस्ती पथके

Chhatrapati Sambhajinagar: कायम नियुक्तीचा प्रस्ताव धूळखात सुरक्षा यंत्रणेवर ताण, ६१ माजी सैनिक कायम नियुक्तीच्या प्रतीक्षेत
2

Chhatrapati Sambhajinagar: कायम नियुक्तीचा प्रस्ताव धूळखात सुरक्षा यंत्रणेवर ताण, ६१ माजी सैनिक कायम नियुक्तीच्या प्रतीक्षेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.