Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘या’ गडकिल्ल्यांना नामांकन; जागतिक वारसा यादीत स्थान मिळणार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गडकिल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडून जागतिक वारसाचा दर्ज मिळावा यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारचे  शिष्टमंडळ पॅरिसला दाखल झाले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 24, 2025 | 03:56 PM
Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘या’ गडकिल्ल्यांना नामांकन; जागतिक वारसा यादीत स्थान मिळणार
Follow Us
Close
Follow Us:

Unesco World Heritage List: छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे दैवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी रयतेचे राज्य निर्माण केले. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि त्याचे जतन केले जावे अशी मागणी नेहमीच होत असते. आता राज्य सरकारने या बाबत पुढाकार घेतला आहे. स्वराज्यातील 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारसाचा दर्जा मिळवून देण्यासाठी राज्य सरकार आता वेगाने हालचाल करत असल्याचे दिसून येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गडकिल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडून जागतिक वारसाचा दर्ज मिळावा यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारचे  शिष्टमंडळ पॅरिसला दाखल झाले आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी यूनेस्कोमधील भारतीय राजदूत विशाल शर्मा यांची भेट घेतली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ पॅरिसला दाखल झाले आहे.

सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार काय म्हणाले?

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 गड किल्यांना वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडून जागतिक वारसा दर्जा मिळावा म्हणून आम्ही पॅरिसला दाखल झालो आहोत. आज वर्ल्ड हेरिटेज कमिटीचे सदस्य आणि युनेस्कोमधील भारताचे राजदूत विशालजी शर्मा यांना आम्ही भेटलो. महाराष्ट्र आणि मुंबईचे सुपुत्र असलेल्या विशालजी यांच्यासह, केंद्र सरकारच्या प्रयत्नाने आणि महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नाने आपल्या राजे शिव छत्रपतींच्या १२ गड किल्ल्यांचे जागतिक वारसामध्ये नामांकन झाले आहे.

 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 गड किल्यांना वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडून जागतिक वारसा दर्जा मिळावा म्हणून आम्ही पॅरिसला दाखल झालो आहोत. आज वर्ल्ड हेरिटेज कमिटीचे सदस्य आणि युनेस्कोमधील भारताचे राजदूत विशालजी शर्मा यांना आम्ही भेटलो. महाराष्ट्र आणि मुंबईचे सुपुत्र असलेल्या विशालजी… pic.twitter.com/14QhwAJHjT — Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 23, 2025

 

त्यावर पूर्णपणे निर्णय होणे बाकी आहे, त्याबद्दलचे सादरीकरण व यासंबंधित पुढील टप्प्यातील तयारीसाठी आज शिष्टमंडळासोबत आम्ही येऊन चर्चा केली. यावेळी शिष्टमंडळ सदस्य म्हणून अपर मुख्य सचिव विकास खारगे, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उप संचालक हेमंत दळवी आणि वास्तुविशारद श्रीमती शिखा जैन उपस्थित होत्या.

महाराष्ट्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 गडकिल्ले यूनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी लष्करी भूप्रदेश या अंतर्गत प्रस्ताव सादर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हे शिष्टमंडळ पॅरिसमध्ये गेले आहे. हे शिष्टमंडळ पॅरिसमध्ये या किल्ल्यांना जागतिक वारसा हा दर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे,

या किल्ल्यांमध्ये राजधानी रायगड, उपराजधानी पन्हाळा राजगड, प्रतापगड, शिवनेरी , लोहगड, साल्हेर, लोहगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि जिंजी किल्ला अशा 12 किल्ल्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र सरकारचे शिष्टमंडळचे नेतृत्व सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार करत आहेत. तसेच या शिष्टमंडळात अपर मुख्य सचिव विकास खारगे, वास्तुविशारद शिखा जैन यांचा समावेश आहे.

Web Title: Chhatrapati shivaji maharaj 12 forts place on unesco world heritage list said maharashtra government minister ashish shelar marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2025 | 03:09 PM

Topics:  

  • Ashish Shelar
  • chatrapati Shivaji Maharaj
  • fort
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

अभिमानास्पद! हिंदवी स्वराज्यातील ‘या’ किल्याचा राज्य शासनाच्या संरक्षित यादीत समावेश
1

अभिमानास्पद! हिंदवी स्वराज्यातील ‘या’ किल्याचा राज्य शासनाच्या संरक्षित यादीत समावेश

“तुती बीजकोष, टसर रेशीम खरेदीसाठी…”; शेतकऱ्यांना रेशीम संचालनालयाचे प्रोत्साहन
2

“तुती बीजकोष, टसर रेशीम खरेदीसाठी…”; शेतकऱ्यांना रेशीम संचालनालयाचे प्रोत्साहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.