Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वरुड येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर’ उत्साहात; शेकडो ग्रामस्थांना घरबसल्या मिळाले दाखले!

शासनाच्या वतीने प्रांत अधिकारी उज्वला गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व बाई माने यांच्या अध्यक्षतेखाली खटाव तालुक्यातील वरुड येथे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर अभियानचं आयोजन करण्यात आले होते.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 21, 2026 | 09:42 PM
वरुड येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर’ उत्साहात; शेकडो ग्रामस्थांना घरबसल्या मिळाले दाखले!
Follow Us
Close
Follow Us:

खटाव तालुक्यातील वरुड येथे राज्य शासनाच्या वतीने आणि महसूल विभागाच्या पुढाकाराने ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर’ अत्यंत उत्साहात पार पडले. या शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय दाखले, जमिनीचे उतारे आणि प्रलंबित महसूल कामांचा लाभ घरबसल्या मिळाला.

प्रांत अधिकारी उज्वला गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बाई माने यांच्या अध्यक्षतेखाली भैरवनाथ मंदिर परिसरात या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रशासकीय यंत्रणा उतरली गावात

नागरिकांची कामे जलद गतीने व्हावीत यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा या शिबिरात सक्रिय होती. निवासी नायब तहसीलदार महेश गायकवाड, कृषी अधिकारी वैभव सोळंके, भोसरे मंडल अधिकारी दिलशाद मुल्ला यांच्यासह महसूल, पुरवठा आणि कृषी विभागाचे क्षेत्रीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.

साधा गवंडी ते कोट्यवधींचा मालक! भोंदू गडगे महाराजची संगमनेरमध्ये जोरदार चर्चा

याप्रसंगी वरुड, लोणी, कुमठे, अंभेरी, कोकराळे, गोसाव्याची वाडी आणि गादेवाडी येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महसूल कामांचा धडाका: ४८२ ७/१२ उताऱ्यांचे वाटप

या शिबिरात केवळ अर्ज स्वीकारले गेले नाहीत, तर प्रत्यक्ष कामांचा निपटाराही करण्यात आला. ७/१२ वरील चुका दुरुस्त करणे (कलम १५५), लक्ष्मी मुक्ती योजना, वारस नोंदी आणि विविध शेरे कमी करण्याच्या कामांना प्राधान्य देण्यात आले. विशेष म्हणजे, मोकळ्या केलेल्या पांदण रस्त्यांची नोंद सातबाराच्या इतर हक्कात घेऊन त्याचे तातडीने वाटप करण्यात आले.

Nerul Slab Collapsed: नवी मुंबई हादरली! नेरूळमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून मोठा अपघात; रहिवाशांमध्ये घबराट

शिबिरातील प्रमुख आकडेवारी:

  • ऑनलाईन ७/१२ वाटप: ४८२
  • रहिवासी दाखले: २०३
  • उत्पन्नाचे दाखले: १००
  • जातीचे चौकशी अहवाल: ८२
  • ॲग्रीस्टॅक शेतकरी नोंदणी: ६०
  • मयत वारस नोंद अर्ज: २५
  • संजय गांधी योजना मंजुरी: ११

विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा

शालेय प्रवेशासाठी लागणारे विविध दाखले विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने पालकांचा वेळ आणि पैसा वाचला. तसेच शेतकऱ्यांसाठी ‘ॲग्रीस्टॅक’ ओळखपत्र नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब सूर्यवंशी यांनी केले, प्रास्ताविक दत्तात्रय घाडगे यांनी मांडले, तर पोलीस पाटील फडतरे (कुमठे) यांनी उपस्थितांचे आभार मानले. भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी या शिबिराच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: Chhatrapati shivaji maharaj samadhan shibir varud khatav

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 09:42 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Marathi News

संबंधित बातम्या

साधा गवंडी ते कोट्यवधींचा मालक! भोंदू गडगे महाराजची संगमनेरमध्ये जोरदार चर्चा
1

साधा गवंडी ते कोट्यवधींचा मालक! भोंदू गडगे महाराजची संगमनेरमध्ये जोरदार चर्चा

भारतीय फार्मा क्षेत्रात Raay Neo Pharmaचे पदार्पण, 90+ फॉर्म्युलेशन्ससह दमदार एंट्री
2

भारतीय फार्मा क्षेत्रात Raay Neo Pharmaचे पदार्पण, 90+ फॉर्म्युलेशन्ससह दमदार एंट्री

Navi Mumbai :  नवी मुंबईत भाजप युवा अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे जंगी स्वागत
3

Navi Mumbai : नवी मुंबईत भाजप युवा अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे जंगी स्वागत

Gas Shortage in Pune : 15 दिवसांपासून पुणे शहरात मोफत जेवणाचा उपक्रम
4

Gas Shortage in Pune : 15 दिवसांपासून पुणे शहरात मोफत जेवणाचा उपक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.