Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय फार्मा क्षेत्रात Raay Neo Pharmaचे पदार्पण, 90+ फॉर्म्युलेशन्ससह दमदार एंट्री

रे निओ फार्मा या नेक्‍स्‍ट-जनेरशन फार्मास्‍युटिकल कंपनीने भारतातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अधिकृतपणे आपल्या कार्याचा शुभारंभ केला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 21, 2026 | 08:22 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • भारतीय फार्मा क्षेत्रात Raay Neo Pharmaचे पदार्पण
  • ९०+ फॉर्म्युलेशन्ससह फार्मा क्षेत्रात दमदार एंट्री
  • अनेक नाविन्यपूर्ण औषधे सध्या संशोधनाच्या टप्प्यात
Raay Neo Pharma : रे निओ फार्मा या नेक्‍स्‍ट-जनेरशन फार्मास्‍युटिकल कंपनीने भारतातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अधिकृतपणे आपल्या कार्याचा शुभारंभ केला आहे. स्थिर व विस्तारक्षम कार्यप्रणालीवर आधारित आणि पाच दशकांहून अधिक काळ विविध क्षेत्रांतील यशस्वी उद्योजकतेचा वारसा लाभलेली रे निओ फार्मा अॅक्युट आणि स्पेशलाइज्ड थेरपी विभागांमध्ये ९० पेक्षा जास्त औषध प्रकार सादर करणार आहे. तसेच, अनेक नाविन्यपूर्ण औषधे सध्या संशोधनाच्या टप्प्यात आहेत.

रात्रीस खेळ चाले… भारतात Crypto Trading चा सर्वाधिक व्यवहार रात्रीच्या ‘याच’ विशिष्ट वेळी, Bitcoin आजही ‘किंग’

प्रसिद्ध उद्योजक अमित पटनी यांनी रे निओ फार्माची स्थापना केली आहे. पटनी कॉम्प्युटर्सच्या निर्मितीमागे असलेला समृद्ध कौटुंबिक वारसा आणि उत्पादन, आरोग्य पायाभूत सुविधा, ऊर्जा व आर्थिक क्षेत्रातील दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. अमित पटनी यांच्या नेतृत्वाखाली ही कंपनी विज्ञान, नैतिक मूल्ये आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन यांचाचे अद्वितीय संयोजन भारतातील उदयोन्मुख औषध निर्मिती क्षेत्रात घेऊन येत आहे.

रे निओ फार्मा अँटीबायोटिक्स, मधुमेहविरोधी औषधे, गॅस्‍ट्रो-इंटेस्टिनल उत्पादने, वेदना व ऑर्थोपेडिक व्यवस्थापन, एलर्जी व श्वसन विकार, हृदयविकार, त्वचाविकार, प्रोटॉन पंप इनहिबिटर्स यांसह इतर अनेक व्यापक उपचार क्षेत्रांमध्ये सेवा प्रदान करते. कंपनी सामान्य आणि विशिष्ट गरजा पूर्ण करणाऱ्या अचूक फॉर्म्युलेशन्ससह ब्रँडेड जेनेरिक औषधे उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे, तसेच या औषधांची कार्यक्षमता आणि सुरक्षितता यावर विशेष भर आहे.

भारतातील जवळपास ५५-६० टक्‍के व्‍यक्तींपर्यंत पोहोचते

बिहार, झारखंड, ओडिशा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्‍ली-एनसीआर, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा, तेलंगणा व आंध्रप्रदेश यांसारख्या दाट लोकवस्तीच्या व प्रभावशाली राज्यांमध्ये रे निओ फार्माचे प्रबळ जाळे पसरलेले आहे. या राज्यांच्या माध्यमातून कंपनी भारतातील जवळपास ५५-६० टक्‍के व्‍यक्तींपर्यंत पोहोचत आहे, तसेच समुदायांना आवश्यक औषधे उपलब्ध करून देत आहे. ९९६७०५३९४५

पारंपारिक औषधनिर्माण क्षेत्राबाहेरील दांडगा अनुभव

रे निओ फार्माचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्‍यांच्‍या नेतृत्वाला पारंपारिक औषधनिर्माण क्षेत्राबाहेरील लाभलेला दांडगा अनुभव. कंपनीच्या प्रवर्तकांना व संचालकांना आर्थिक, मीडिया, माहिती तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर, खासगी इक्विटी, उत्पादन आणि ऊर्जा यांसारख्या विविध क्षेत्रांतील ५० वर्षांहून अधिक काळाचा यशस्वी वारसा लाभला आहे. या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग आरोग्य सेवा क्षेत्रात प्रभावी अंमलबजावणी, प्रशासन आणि नवनिर्मितीसाठी केला जात आहे.

आरोग्य सेवेच्या माध्यमातून शाश्वत विकास

“आम्ही औषधनिर्माण क्षेत्राकडे केवळ एक व्यवसाय म्हणून पाहत नाही; तर आरोग्य सेवेच्या माध्यमातून शाश्वत विकास आणि राष्ट्र उभारणीच्या दिशेने केलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. रे निओ फार्मामध्ये आम्हाला माहित आहे की, आरोग्यसेवेचे भविष्य शास्त्रीय आणि कार्यात्मक स्वरूपाचे असण्‍यासह मानवी मूल्यांशी खोलवर जोडलेले आहे. औषधे पोहोचवण्यापलीकडे जाऊन विश्वास निर्माण करणे, पारदर्शकता जपणे आणि आरोग्यसेवा परिसंस्थेतील प्रत्येक घटकाशी अर्थपूर्ण नाते निर्माण करणे, याप्रती आम्‍ही कटिबद्ध आहोत,” असे रे निओ फार्माचे संस्थापक अमित पटनी म्हणाले.

रे निओ फार्मा गतीमान व्यावसायिक मॉडेलवर आधारित आहे, ज्यामध्ये कंपनीचे स्वतःचे ब्रँडेड फॉर्म्युलेशन्स आणि आघाडीच्या उत्पादकांशी धोरणात्मक सहकार्य यांचा समावेश आहे. यामुळे गुणवत्तेची आणि सुरक्षिततेची कठोर मानके राखत नाविन्यपूर्ण उपचार पद्धती सहज उपलब्ध करून देणे शक्य होते. कंपनीची चपळ कार्यप्रणाली आरोग्याच्या बदलत्या गरजांना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी आणि गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता शाश्वत वाढ सुनिश्चित करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. जागतिक सर्वोत्तम पद्धतींचा वापर, स्वदेशी संशोधन व विकासमधील गुंतवणूक आणि कुशल व्यावसायिक टीमच्या बळावर रे निओ फार्मा भारतातील डॉक्टर्स, आरोग्यसेवा प्रदाता आणि रुग्णांसाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून स्वतःला प्रस्थापित करत आहे.

आरोग्य क्षेत्रातील परिवर्तनामध्ये निर्णायक शक्ती

आपल्या क्षेत्रात सर्वात वेगाने विस्तारणारा फार्मास्‍युटिकल पोर्टफोलिओ आणि नैतिक व रुग्ण-हित प्रथम या तत्त्वांवर आधारित पाया यामुळे रे निओ फार्मा भारताच्या आरोग्य क्षेत्रातील परिवर्तनामध्ये निर्णायक शक्ती बनण्यास सज्ज आहे.

लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठा दिलासा, Gold – Silver च्या दरात तब्बल ‘इतकी’ घट, पाहा नेमका दर काय?

Web Title: Raay neo pharma launches to transform indias healthcare landscap marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 08:22 PM

Topics:  

  • Business News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Mira Road News: 16 व्या मजल्यावरून टॉवर क्रेन कोसळली; 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू, अनेक वाहनांचा चक्काचूर
1

Mira Road News: 16 व्या मजल्यावरून टॉवर क्रेन कोसळली; 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू, अनेक वाहनांचा चक्काचूर

PhonePe, Paytm की Google Pay? कोणत्या ॲपवरून भारतीय करतायत सर्वात जास्त UPI पेमेंट? पाहा ताजी आकडेवारी
2

PhonePe, Paytm की Google Pay? कोणत्या ॲपवरून भारतीय करतायत सर्वात जास्त UPI पेमेंट? पाहा ताजी आकडेवारी

EPFO ने 34 कोटी सबस्क्रायबर्सच्या खात्यात जमा केले 8.25% व्याज? तुमच्या खात्यात आले का? कसे तपासाल
3

EPFO ने 34 कोटी सबस्क्रायबर्सच्या खात्यात जमा केले 8.25% व्याज? तुमच्या खात्यात आले का? कसे तपासाल

कारखाने बंद, ग्राहक गायब…चीनमध्ये ऐतिहासिक मंदी! 3 वर्षांतील सर्वात वाईट काळ, GDP ग्रोथ रेटमध्ये भारतानेही टाकलं मागे
4

कारखाने बंद, ग्राहक गायब…चीनमध्ये ऐतिहासिक मंदी! 3 वर्षांतील सर्वात वाईट काळ, GDP ग्रोथ रेटमध्ये भारतानेही टाकलं मागे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.