एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात राहणार का? अजित पवारांनी केलं मोठं विधान; म्हणाले, 'एकनाथ शिंदे...'
विधानसभेच्या निकालानंतर आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? याची जोरदार चर्चा होत आहे. 14 व्या विधानसभेची आज (26 नोव्हेंबर) अंतिम मुदत आहे. त्यामुळे आज सरकार स्थापन होणे आवश्यक असल्याची बाब राजकीय जाणकर व्यक्त करतात. दरम्यान, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद द्यावे यासाठी शिवसेना (शिंदे) पक्षाकडून दबाव आणला जात आहे. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद द्यावे, अशी मागणी भाजपकडून होत आहे. आज महायुतीचे नेते राजभवनात जाऊन सत्तास्थापनेचा दावा करणार असून नवे सरकार अस्तित्वात येईपर्यंत राज्यात काळजीवाहू सरकार असेल. याचदरम्यान आता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देण्यासाठी राजभवनावर ते दाखल झाले आहेत.
सत्तास्थापनेसाठी भाजपचा नवा मास्टरप्लॅन; एकनाथ शिंदे केंद्रात, श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील राजभवनावर दाखल झाले असून त्यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 14 व्या विधानसभेची मुदत आज 26 तारखेला संपत असल्यामुळे आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे हे नवीन सरकार स्थापन होईपर्यंत राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री असणार आहेत. महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाआघाडीतील भाजपला सर्वाधिक १३२ जागा मिळाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सलग तिसऱ्यांदा 100 जागांचा टप्पा ओलांडला आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 57 तर शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार 4 आणि 61 जागा मिळाल्या. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला 41 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री या पदावर दावा सांगितलेला नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर आमची काही हरकत नाही असं अजित पवारांच्या राष्ट्रवादीने म्हटलं आहे. तर संघानेही देवेंद्र फडणवीस यांच्या नावालच अनुमोदन दर्शवलं आहे. दुसरीकडे शिवसेनेची मागणी वेगळी आहे.
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढली आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करावे, अशी मागणी शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी केली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाचं काय होणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर 14वी विधानसभा बरखास्त करण्यात आली आहे. 15वी विधानसभेची स्थापना होणार असून राज्यपाल महायुतीला नेत्याची निवड आणि सरकार स्थापनेचे निमंत्रण याबाबत माहिती देणार आहेत. या सगळ्या घडामोडी घडेपर्यंत जो कालावधी जाईल त्या कालावधीत एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील.
सत्तास्थापनेसाठी भाजपचा नवा मास्टरप्लॅन; एकनाथ शिंदे केंद्रात, श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री