Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बदलापूरचे आंदोलन राजकारणाने प्रेरित,लाडकी बहीण योजनेचा पोटशूळ दिसला; मुख्यमंत्री शिंदेंचा घणाघात

राज्यामध्ये सध्या सर्वत्र बदलापूर शाळेतील अत्याचार प्रकरणाची चर्चा सुरु आहे. अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करण्यात आले असल्यामुळे कार्यक्षमता व कायदा सुव्यवस्था यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापूरचे आंदोलन राजकीय असल्याचे म्हणत विरोधकांवर निशाणा साधला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 21, 2024 | 12:26 PM
Eknath shinde on badlapur case

Eknath shinde on badlapur case

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : बदलापूर अत्याचार प्रकरणावरुन राज्याचे वातावरण तापले आहे. चिमुकल्या मुलींवर शाळेतील शिपाईने केलेल्या अत्याचारामुळे नागरिक रोष व्यक्त करत आहे. या संदर्भात बदलापूरमध्ये सध्या तणावपूर्ण शांतात असून बदलापूरमधील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. त्याचबरोबर सर्व शाळांना देखील सुट्ट्या जाहीर करण्यात आली आहे. काल बदलापूरमध्ये अतिशय तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली. बदलापूरच्या रेल्वे रुळावर तब्बल 12 तास आंदोलक होते. अनेकदा समजवण्याचा प्रयत्न केल्यानंतर आंदोलक माघार घेत नसल्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज देखील केला. या प्रकरणावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भविष्यात असे प्रकार घडू नयेत म्हणून

बदलापूरच्या घटनेवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले आहे. बदलापूर प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “बदलापूरमधील घटना अतिशय दुर्दैवी आहे. आरोपींनी कठोर शिक्षा देण्यासाठी कारवाई करावी असे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. ही केस फास्ट ट्रॅकवर घेण्यात येईल, त्यासाठी एसआयटी नेमण्यात आली आहे. ज्या पोलिसांनी दिरंगाई केली त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. या परिवाराच्या मागे शासन असून सर्व सहकार्य करण्यात येईल. भविष्यात असे प्रकार घडू नयेत म्हणून पाऊलं उचलण्यात आली आहेत,” असे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

लाडकी बहीण योजनेचा पोटशूळ विरोधकांना उठला

बदलापूर प्रकरणावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनामाच्या मागणी केली आहे. यावरुन विरोधकांना उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “यामध्ये लहान बच्चू आहेत. त्यामुळे यावरुन राजकारण करु नये. कालच्या आंदोलनामुळे दुर्दैवाने लाखो रेल्वे प्रवाशांना त्रास झाला. हे व्हायला नको होतं. परंतु कालचं आंदोलन हे राजकीय प्रेरित होतं. इतक्या जलदगतीने गाड्या भरून बाहेरून लोक आले. आंदोलकांना मंत्र्यांनी समजावलं, सगळ्या मागण्या मान्य केल्या. तरीही ते माघार घेत नव्हते. त्यांना  सरकारला बदनाम करायचं होतं. राजकारण करायला अनेक मुद्दे आहेत. लहान मुलीचे राजकारण करणाऱ्याला लाज वाटली पाहिजे. राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा पोटशूळ विरोधकांना उठला आहे. विरोधकांना सांगणं आहे की यावरून राजकारण करू नका. लाडकी बहीण योजना  त्यांच्या जिव्हारी लागली असल्याचं हे कालच्या आंदोलनातून स्पष्ट झालंय,” अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

Web Title: Chief minister eknath shinde slams the opposition saying yesterdays protest was politically motivated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2024 | 12:26 PM

Topics:  

  • Badlapur case
  • Badlapur News
  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

शिवनेरी किल्ल्यावर रंगणार शिवजन्म सोहळा; देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार अन् एकनाथ शिंदे राहणार उपस्थित
1

शिवनेरी किल्ल्यावर रंगणार शिवजन्म सोहळा; देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार अन् एकनाथ शिंदे राहणार उपस्थित

Sillod ZP Election Result 2026: भाजप-शिवसेनेला मिळाली समान मते; भविष्यात राजकीय संघर्ष तीव्र होणार
2

Sillod ZP Election Result 2026: भाजप-शिवसेनेला मिळाली समान मते; भविष्यात राजकीय संघर्ष तीव्र होणार

“तुमच्या सारख्या गद्दारांपेक्षा ते निष्ठावंत…; मुस्लीम महापौरवरुन टीका करणाऱ्या शिदेंवर संजय राऊतांचा घणाघात
3

“तुमच्या सारख्या गद्दारांपेक्षा ते निष्ठावंत…; मुस्लीम महापौरवरुन टीका करणाऱ्या शिदेंवर संजय राऊतांचा घणाघात

खेडमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या भगवा लाटेचा धडाका; सत्तासमीकरणे बदलली, ठाकरे गटाला धक्का
4

खेडमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या भगवा लाटेचा धडाका; सत्तासमीकरणे बदलली, ठाकरे गटाला धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.