दिव्यांग बांधवांसाठी विकासात्मक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात आले. जिल्हा परिषद ठाण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पाडला.
ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये गुरुवारी संध्याकाळी गोळीबाराची घटना घडली. भाजप आमदार किसन कथोरे यांच्या निवासस्थानासमोरच मुख्य रस्त्यावर दोन गटांमध्ये वादातून हा गोळीबार झाल्य़ाची माहिती आहे.
बदलापुरातील माजी नगरसेवक मोहन राऊत यांच्या हत्या प्रकरणातील ४ आरोपींना ठाणे विशेष मोक्का न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ११ वर्षांनंतर मोहन राऊत यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला आहे.
काही दिवस उसंत घेतलेल्या पावसाने शनीवारपासून जोरदार बॅटींगला सुरुवात केली आहे. मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्याचबरोबर या पावसाचा फटका रेल्वेवाहतूकीला ही मोठ्या प्रमाणात बसला आहे.
कुळगाव बदलापूर नगर परिषदेकडून शहरात वाहतूक नियमनासाठी सिग्नल यंत्रणा बसवली जाते आहे. त्यासाठी शहरातील चौकांची स्वच्छता आणि जागा उपलब्ध करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून मोहिम सुरू आहे.
बदलापुरातील उल्हास नदीत बुडून चार मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. धुळवड खेळल्यानंतर रंग काढायला गेलेल्या चौघांचा पाण्याचा अंदाज न आल्याने चौघंही बुडाल्याचं सांगिंतलं जात आहे.
या कारवाईनंतर प्रेस क्लब ऑफ बदलापुरच्या सदस्यांनी गुरूवारी सकाळी मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांची भेट घेतली. यावेळी वृत्तपत्र विक्रेत्यांवरच्या कारवाईबाबत चर्चा झाली आहे.
कोलकाता ट्रेनी डॉक्टरवर अत्याचार करुन हत्या केल्यानंतर बदलापूरमधूनही दोन अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची धक्कादायक बातमी समोर आली होती. या दोन्ही घटनेनंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट पसरली आहे. असे असताना देखील त्याच…
बदलापूरमध्ये झालेल्या या घटनेमुळे फक्त ठाणे जिल्ह्याचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. झालेल्या घटनेमुळे मिरा भाईदर शहरात बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षा तर्फे…
एका शाळेत शिपाई म्हणून कामावर असलेल्या अक्षय शिंदेने दोन मुलींवर अत्याचार केला. याप्रकरणी सध्या तो अटकेत आहे. आता त्याच्या घराची अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. तसेच अक्षयची तीन लग्ने झाली…
बदलापूरमध्ये झालेल्या चिमुकल्या मुलींवरील अत्याचारामुळे राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात येत आहे. आंदोलकांनी बदलापूरमध्ये मोठे आंदोलन केल्यानंतर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.तसेच पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज देखील केला. यानंतर आता उपनेत्या सुषमा…
राज्यामध्ये सध्या सर्वत्र बदलापूर शाळेतील अत्याचार प्रकरणाची चर्चा सुरु आहे. अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करण्यात आले असल्यामुळे कार्यक्षमता व कायदा सुव्यवस्था यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
बदलापूरमध्ये शालेय विद्यार्थीनीवर अत्याचार झाल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. पोलिसांनी लवकर कारवाई न केल्याने देखील रोष वाढला आहे. यामुळे आंदोलकांनी बदलापूर रेल्वे मार्ग जाम केला आहे. याचे वार्तांकन करणाऱ्या महिला…
राज्यामध्ये बदलापूर अत्याचार घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. बदलापूर रेल्वे स्थानकावर लाखो आंदोलक जमा झाले असून पोलीस समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर गिरीश महाजन देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. या…