Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशीलतेचा पुन्हा प्रत्यय, ४०,००० हून अधिक गंभीर रुग्णांचे वाचले प्राण

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता मदत मिळवण्यासाठी मुंबईत मंत्रालयात जाण्याची देखील गरज नाही. ऑनलाइन अर्जावर रुग्णांना मदत मिळतेय. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मध्ये रुग्णालय अंगीकृत (empanel) करण्याची आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मधून रुग्णांनी अर्थसहाय्य मिळविण्याची प्रक्रिया संपूर्णतः निःशुल्क करण्यात आली आहे. रुग्णांनी किंवा रुग्णांच्या नातेवाईकांनी स्वतः थेट अर्ज करून मदत मिळवावी. यासाठी 8650567567 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून थेट आपल्या मोबाईलवर अर्ज मिळवा आणि स्वतः अर्ज करा

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 07, 2024 | 07:51 PM
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता मदत मिळवण्यासाठी मंत्रालयात जाण्याची ही गरज नाही

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता मदत मिळवण्यासाठी मंत्रालयात जाण्याची ही गरज नाही

Follow Us
Close
Follow Us:

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरायम आरोग्याचा प्रकाश आणला आहे. या योजनेमुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान मिळत असल्याने ही योजना आता महाराष्ट्र राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना ठरत असल्याचे प्रतिपादन राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. गोरगरीब – गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे. 

या योजनेमुळे रुग्णांचे प्राण वाचत असल्याने मुख्यमंत्री कार्यालयात आलेला एकही रुग्ण हा मदतीविना वंचित राहता कामा नये याची दक्षता घेण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. यानुसार आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने गेल्या 2 वर्षं 2 महिन्यामध्ये 40,000 हून अधिक गोरगरीब – गरजू रुग्णांना एकूण 321 कोटी रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे.

काय आहे फायदा

एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्विकारताच महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद पडलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष तात्काळ सुरू केला. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची मूळ संकल्पना मांडणाऱ्या मंगेश नरसिंह चिवटे यांची विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती करून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी या कक्षाची जबाबदारी दिली होती.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता मदत मिळवण्यासाठी मंत्रालयात जाण्याची ही गरज नाही पूर्णपणे ऑनलाईन प्रोसेस करून वैद्यकीय मदत मिळणार असल्याचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितले. यासाठी 8650567567 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून थेट आपल्या मोबाईलवर अर्ज मिळविता येईल.

संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मध्ये अनेक-विविध आजारांचा समावेश देखील करण्यात आला असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांनी दिली आहे. यामध्ये अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी,  कर्करोगावरील शस्त्रक्रिया, केमोथेरपी,  डायलिसिस, जन्मतः मूकबधिर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर  इनप्लांट शस्त्रक्रिया , सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, रस्ते अपघात , विद्युत अपघात , भाजलेले रुग्ण , जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे.

अवघ्या 1 वर्षाची दुवा बनली ब्रँड अँबेसडर

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या ब्रॅण्ड ॲम्बेसडर पदी अवघ्या एक वर्षाच्या दुवा नावाच्या चिमुकलीची निवड करण्यात आलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील फहरीण मकुबाई आणि सादिक मकूबाई या मुस्लिम दांपत्याच्या पोटी जन्माला आलेल्या अवघ्या १३ दिवसांच्या बाळाचे प्राण मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या लाखमोलाच्या मदतीमुळे वाचले होते. 

दरम्यान सहा महिन्यानंतर कोल्हापूर येथे झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात सदर मुस्लिम दांपत्याने संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हातात बाळाला सुपूर्द करत मुख्यमंत्री महोदय यांच्या दुवामुळे बाळाचे प्राण वाचले असल्याने या चिमुकलीचे नाव दुवा ठेवणार असल्याची इच्छा प्रकट केली. तब्बल एक लाख लोकांच्या साक्षीने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी या बाळाला हातात घेऊन सदरच चिमुकलीचे नाव दुवा ठेवत असल्याचे जाहीर केले.

Web Title: Chief minister eknath shindes sensitivity reiterated with mukhyamantri vaidyakiy sahayata nidhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2024 | 07:51 PM

Topics:  

  • maharashtra news

संबंधित बातम्या

रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेने वाचला प्रवाशाचा जीव; सुरक्षितपणे बाहेर काढलं अन्…
1

रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेने वाचला प्रवाशाचा जीव; सुरक्षितपणे बाहेर काढलं अन्…

तब्बल 259 धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवले; उच्च न्यायालयाच्या ‘त्या’ आदेशाचे केलं गेलं पालन
2

तब्बल 259 धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवले; उच्च न्यायालयाच्या ‘त्या’ आदेशाचे केलं गेलं पालन

Palghar Gas Leak: तारापूर एमआयडीसीमध्ये गॅस गळती; एकाच कंपनीतील 4 कामगारांचा मृत्यू, 2 गंभीर
3

Palghar Gas Leak: तारापूर एमआयडीसीमध्ये गॅस गळती; एकाच कंपनीतील 4 कामगारांचा मृत्यू, 2 गंभीर

Buldhana : खामगावच्या प्रसिद्ध गणपतीची कलशयात्रा;  गणपतीची नवीन वास्तूमध्ये प्राणप्रतिष्ठा
4

Buldhana : खामगावच्या प्रसिद्ध गणपतीची कलशयात्रा; गणपतीची नवीन वास्तूमध्ये प्राणप्रतिष्ठा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.