Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

HIV in Maharashtra: केंद्रातील NACOकडून मानाचा पुरस्कार; HIV बाधितांची काळजी घेण्यात महाराष्ट्र अव्वल

राज्यातील या केंद्रांनी एचआयव्ही बाधित व्यक्तींना व्यापक उपचार, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रभावी सहाय्य उपलब्ध करून देताना उल्लेखनीय कामगिरी केली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 24, 2025 | 04:06 PM
HIV in Maharashtra केंद्रातील NACOकडून मानाचा पुरस्कार

HIV in Maharashtra केंद्रातील NACOकडून मानाचा पुरस्कार

Follow Us
Close
Follow Us:
  • महाराष्ट्रला राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम राज्याचा सन्मान
  • अँटी रेट्रोव्हायरल उपचार केंद्रांची उत्कृष्ट कामगिरी
  • एचआयव्हीग्रस्तांसाठी प्रभावी सेवा आणि सरकारी मार्गदर्शन
Delhi News: केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेद्वारे (नाको) घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील आढाव्यात काळजी आधार आणि उपचार सेवा प्रदान करण्यासाठी देशातील सर्वोत्तम राज्य म्हणून महाराष्ट्र राज्यास सन्मान मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेला (एमसेंक) विजयवाडा येथे आयोजित केलेल्या केंद्रीय समारंभात हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला.

राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या काळजी आधार आणि उपचार विभागाच्या प्रमुख डॉ. चिन्मयी दास यांच्या हस्ते तो महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे प्रतिनिधी, काळजी आधार आणि उपचार विभागाच्या उपसंचालक डॉ. प्रियांका वाघेला आणि सहायक संचालक प्रदीप सोनवणे यांना प्रदान करण्यात आला. नाकोच्या कामगिरी निर्देशांकानुसार ‘ग्रीन झोन’मध्ये सर्वाधिक अँटी रेट्रोव्हायरल उपचार केंद्रे असल्यामुळे महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेने आपले अव्वल स्थान मिळविले आहे.

KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत शिवसेना-भाजप युतीत तुटणार; रवींद्र चव्हाणांचे सूचक संकेत

अँटी रेट्रोव्हायरलवर भर

हा सन्मान एचआयव्हीसह जगणाऱ्यासाठी अँटी रेट्रोव्हायरल थेरपी उपचार सेवा पुरवण्यात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीला अधोरेखित करतो. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक यांच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले. राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे प्रकल्प संचालक सुनील भोकरे, अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. विजय कंदेवाड आणि डॉ. भवानी मुरुगेसन यांनी सांगितले, हा पुरस्कार एचआयव्हीसह जगणाऱ्यांसाठी विनामूल्य आधार पुरवण्याच्या राज्याच्या कटिबद्धता अधोरेखित करतो.

पाच एआरटी सेंटर सर्वोत्कृष्ट

सप्टेंबर २०२५ च्या अंतिम गुणपत्रिकेत ७५ हुन अधिक गुण मिळवलेल्या ‘ग्रीन झोन मधील १६ केंद्रांपैकी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड, एएफएमसी पुणे, उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर आणि ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय धाराशिव या सर्वोत्कृष्ट ५ एआरटी केंद्रांचा सत्कार करण्यात आला.

राज्यातील या केंद्रांनी एचआयव्ही बाधित व्यक्तींना व्यापक उपचार, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रभावी सहाय्य उपलब्ध करून देताना उल्लेखनीय कामगिरी केली. सप्टेंबर 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या अंतिम गुणपत्रिकेत 75 पेक्षा अधिक गुण मिळवून ‘ग्रीन झोन’मध्ये 16 केंद्रांचा समावेश झाला होता, त्यापैकी पाच ART केंद्रांनी सर्वोत्तम कामगिरी दाखवली.

Mumbai: गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात पंकजा मुंडे यांच्या पीएला अटक; अनंत गर्जेनी जरी केले निवेदन

ग्रीन झोनमधील शीर्ष पाच ART केंद्रे:

  • सरकारी वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड
  • एएफएमसी, पुणे
  • उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर
  • डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर
  • ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, धाराशिव

याशिवाय, खाजगी वैद्यकीय संस्थांनीही उत्कृष्ट कामगिरी नोंदवली.

  • काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय, पुणे
  • लोटस मेडिकल फाउंडेशन, कोल्हापूर

या दोन खाजगी ART केंद्रांनाही ‘ग्रीन झोन’मध्ये सातत्याने राहिल्याबद्दल विशेष मान्यता देण्यात आली.

Web Title: Hiv in maharashtra center receives prestigious award from naco maharashtra tops in taking care of hiv affected people

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 04:06 PM

Topics:  

  • Health News
  • HIV
  • maharashtra
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : मुंबईची वाहतूक कोंडी फुटणार! शिवडी–वरळी दरम्यान नव्या उड्डाणपुलाची घोषणा
1

Devendra Fadnavis : मुंबईची वाहतूक कोंडी फुटणार! शिवडी–वरळी दरम्यान नव्या उड्डाणपुलाची घोषणा

Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांची प्रकृती पुन्हा बिघडली, ताबडतोब आली रुग्णवाहिका; घराबाहेर वाढवली सुरक्षा
2

Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांची प्रकृती पुन्हा बिघडली, ताबडतोब आली रुग्णवाहिका; घराबाहेर वाढवली सुरक्षा

MahaRERA Strict Action: घरखरेदीदारांना मोठा दिलासा! नुकसानभरपाई रोखणाऱ्या विकासकांवर ‘३ महिन्यांच्या कारावासाची’ टांगती तलवार
3

MahaRERA Strict Action: घरखरेदीदारांना मोठा दिलासा! नुकसानभरपाई रोखणाऱ्या विकासकांवर ‘३ महिन्यांच्या कारावासाची’ टांगती तलवार

BMC land lease: मुंबई पालिका भूखंड भाडे तत्वावर देणार! उत्पन्नवाढीसाठी पालिकेने कसली कंबर; करारातून किमान २०० कोटींची होणार कमाई
4

BMC land lease: मुंबई पालिका भूखंड भाडे तत्वावर देणार! उत्पन्नवाढीसाठी पालिकेने कसली कंबर; करारातून किमान २०० कोटींची होणार कमाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.