
लातूर जिल्ह्यातील निलंगामध्ये शेवटच्या क्षणी गोंधळ (फोटो सौजन्य - iStock)
अनेक घडामोडी घडल्यानंतर ९४ उमेदवार आता रिंगणात राहिले आहेत. काही प्रभागांमध्ये पक्षांतर्गत बंडाळी थांबवण्यासाठी वरिष्ठांनी थेट फोनवरून आदेश देऊन उमेदवारांना नामनिर्देशन माघार घ्यायला भाग पाडल्याचे समजते. तर काही ठिकाणी गैरसमज, अंतर्गत नाराजी आणि पॅनेलचे तडजोडीचे राजकारण ठळकपणे दिसून आले, डमी उमेदवारांनी शांतपणे माघार घेतल्याने मुख्य स्पर्धकांना दिलासा मिळाला. माघारीनंतर अनेक प्रभागांत दोन उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे.
बारामतीमध्ये अजित पवारच बॉस; नगर परिषद निवडणुकीत भाकरी फिरवली अन् 8 उमेदवार थेट…
भाजपासमोर कडवे आव्हान उभे राहिले
अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी तीननंतर नगरअध्यक्षपदासाठी एकूण सात उमेदवार रिंगणात आहेत. त्यात प्रामुख्याने काँग्रेसाचे शेख हमीद इब्राहिम, भाजपाचे संजयराज प्रमोद हलगरकर, शिवसेना उद्भव बळासाहेब ठाकरे गटाकडून लिंबण, अया विश्वनाथ रेशमे, वंचित बहुजन आघाडी मुजीब रसिदसाथ सौदागर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून अखिल जालील देशमुख, तर अपक्ष म्हणून काँग्रेसचे बंडखोर महमदखान हुसेनखान पठाण, अपक्ष विजयकुमार दतू सूर्यवंशी असे एकूण सात उमेदवार रिंगणात आहेत.
नगरपक्षाध्यक्षांच्या रिंगणातील हे आहेत उमेदवार
सदस्यपदाच्या २३ जागांसाठी ८७ उमेदवार रिंगणात आहेत. या ८७ उमेदवारापैकी २३ काँग्रेस पक्ष, २३ उमेदवार भाजपा, ९ उमेदवार वंचित बहुजन आघाडी, ७राष्ट्रवादी अजित पवार गट, १२ राष्ट्रवादी शरद पवार गट, तर १३ उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. यामुळे आता महाविकास आगाडीमध्ये सरळसरळ दोन पैनल दिसून येत आहेत. तर महायुतीमधील अजित पवार गटाने ७उमेदवार व १ नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उभे केल्याने भारतीय जनता पक्षासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
माजी नगराध्यक्ष निटुरेंनी अखेर मागे घेतला अर्ज
दरम्यान, भारतीय जनता पक्षाकडे आपण उदगीर नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी मागितली होती. मात्र ती उमेदवारी आपल्याला मिळाली नाही. मतदारांच्या आग्रहाखातर भारतीय जनता पार्टीच्यावतीने व एक अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. महायुतीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री बावनकुळे आणि लातूर जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील-मुरुमकर, जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी आ. संभाजी पाटील-निलंगेकर, आ. अभिमन्यू पवार आ. रमेशआप्पा कराड व आ. संजय बनसोडे यांनी विनंती केल्यावर आपण अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज परत घेत असल्याचे माध्यमाशी बोलतांना सांगितले.
आपण भारतीय जनता पक्षाचाच घटक असल्याने महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार स्वातीताई सचिन हुडे यांना बहुमताने विजयी करण्यासाठी सर्व ताकतीनिशी प्रयत्न करणार असून उदगीर नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला पाहिजे. या विचाराने पक्ष संघटन चांधणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे सांगून महायुतीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार स्वातीताई सचिन हुडे व २० प्रभागातील महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांनी सांगितले.