sanjay shirsat take side of neelam gorhe and target thackeray group
मुंबई : महाराष्ट्रातील संभाजीनगर आणि धाराशिव शहरांच्या नामांतराने या भागातील ऐतिहासिक वारशाच्या सन्मानासोबतच राष्ट्रीयतेचाही सन्मान झाल्याची भावना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे. या निर्णयाने शिवसेनेच्या ‘प्राण जाये पर वचन न जाये’ या वाक्याला मुख्यमंत्री जागले आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.
नीलम गोऱ्हे नेमकं काय म्हणाल्या ?
याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आणि महाविकास आघाडी सरकारचे आभार मानून अभिनंदन केले आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम आणि मराठवाडा विभागातील जुलमी राजवट असलेला इतिहास लक्षात घेता या भागातील राष्ट्रप्रेमी नागरिकांची जुलमी इतिहासाची आठवण करून देणारी नावे बदलण्याची मनोमन असलेली इच्छा महविकास आघाडीच्या सरकारने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मराठवाड्यातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही शहरांचे अनुक्रमे संभाजीनगर आणि धाराशिव असे नामांतर करण्याचा निर्णय घेऊन पूर्ण केली आहे.
[read_also content=”अग्निवीरांच्या महत्वाकांक्षेला कॉंग्रेसचा राजकीय खोडा : आमदार महेश लांडगे https://www.navarashtra.com/maharashtra/congresss-political-undermining-agniveers-ambitions-mla-mahesh-landage-nrdm-298963.html”]
महाराष्ट्राच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या मराठवाड्यातील राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या अनेक वर्षांच्या मनोकामना पूर्ण झाल्याने डॉ. गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त केले आहे. राज्य सरकारने झालेल्या कॅबिनेट बैठकीत दोन्ही शहरांच्या नामांतराचा क्रांतिकारी निर्णय घेतल्याबद्दल राज्य सरकारचे डॉ. गोऱ्हे यांनी अभिनंदन केले आहे.