Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Child Health : कुपोषित बालकांमधील टीबी तपासणीला मिळणार गती ;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशांनुसार पोषण पुनर्वसन केंद्

Child Health : कुपोषित बालकांमधील टीबीचे वेळेत निदान आणि उपचार सुनिश्चित करण्यासाठी तपासणी प्रक्रियेला गती देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक बालकांची टीबी तपासणी करण्यावर भर दिला जात आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 07, 2026 | 07:24 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • जुलै २०२६ पर्यंत २,८३५ बालकांची टीबी तपासणी
  • बाल टीबी प्रतिबंधासाठी नवीन उपक्रम
  • पोषण पुनर्वसन केंद्रांजवळ ट्रूनॅट यंत्रणा
Child Health : कुपोषित बालकांमध्ये क्षयरोगाचे (टीबी) वेळीच निदान होऊन त्यांना योग्य उपचार मिळावेत, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशांनुसार सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये (NRC) टीबी तपासणीची कार्यपद्धती अधिक बळकट करण्यात आली आहे. कुपोषणामागील एक महत्त्वाचा घटक असलेल्या बाल टीबीचे निदान, उपचार आणि प्रतिबंध यासाठी राज्यात विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

मुख्यमंत्री सचिवालयाच्या २ नोव्हेंबर, २०१५ रोजीच्या निर्देशांनुसार आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनात आरोग्य विभाग महिला आणि बालकांच्या आरोग्याची विविध उपक्रमाद्वारे काळजी घेत आहे. पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये दाखल होणाऱ्या बालकांची टीबी तपासणी, निदान व उपचारासाठी मानक कार्यपद्धती, प्रशिक्षण, निदान सुविधा आणि औषधांचा पुरवठा सुनिश्चित करण्यात आला आहे.

या कार्यपद्धतीनुसार बालकांची लक्षणे व टीबी रुग्णाच्या संपर्काचा इतिहास तपासला जातो. आवश्यकतेनुसार नमुना संकलन, सीबी-नॅट/ट्रूनॅट तपासणी आणि छातीचा एक्स-रे यांसारख्या निदान सुविधांशी बालकांना जोडण्यात आले आहे.

जुलै २०२६ पर्यंत २,८३५ बालकांची टीबी तपासणी

२०२१ ते जुलै २०२६ या कालावधीत पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये दाखल २९,८७५ बालकांपैकी २६,८५७ बालकांची टीबी तपासणी करण्यात आली आहे. म्हणजेच एकूण तपासणीचे प्रमाण ८९.९ टक्के आहे. २०२६ मध्ये जुलैपर्यंत दाखल ३,०१७ बालकांपैकी २,८३५ बालकांची तपासणी करण्यात आली असून, हे प्रमाण ९४ टक्के आहे.

तपासणीचे प्रमाण सातत्याने उच्च राहिले असून, २०२२ मधील २३ रुग्णांवरून २०२५ मध्ये ७ आणि जुलै २०२६ पर्यंत ३ बालकांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. तपासणीचे प्रमाण उच्च राहतानाही निदान झालेल्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येते. संपर्क तपासणी व निक्षय नोंदींच्या आधारे त्याचे सातत्याने परीक्षण करण्यात येत आहे.

Buldhana News: खरीप पिकांवर किडींचा प्रादुर्भाव, महिनाभरापासून पावसाची दडी; तुषार सिंचनावर पीक जगवण्याची धडपड

बाल टीबी प्रतिबंधासाठी नवीन उपक्रम

टीबीच्या संपर्कात आलेल्या मात्र लक्षणे नसलेल्या बालकांना टीबी प्रतिबंधात्मक उपचार (TPT) देण्यासाठी घरगुती व एनआरसी संपर्क तपासणी बळकट करण्यात आली आहे. तसेच, जटिल, औषध-प्रतिरोधक आणि निदानास आव्हानात्मक बालरुग्णांसाठी बाल टीबी उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याची कार्यवाही सुरू आहे. पोषण पुनर्वसन केंद्रांमधील टीबी तपासणी व निदानाची माहिती निक्षय पोर्टलशी जोडण्याचे काम सुरू असून, रुग्णांची नोंदणी, उपचारांचा मागोवा आणि परिणामांचे परीक्षण अधिक प्रभावी होणार आहे. टीबी निदान झालेल्या बालकांना निक्षय पोषण योजना व निक्षय मित्र उपक्रमांतर्गत पोषण सहाय्याशी जोडण्यात येत आहे.

SIR Form Controversy: SIR फॉर्म प्रकरणावरून खळबळ! मतदारांचे SIR फॉर्म सफाई कर्मचाऱ्याकडे कसे? तेजस्वी पाटील यांचा गंभीर सवाल

पोषण पुनर्वसन केंद्रांजवळ ट्रूनॅट यंत्रणा

जास्त रुग्ण असलेल्या पोषण पुनर्वसन केंद्रांजवळ ट्रूनॅट/सीबी-नॅट यंत्रणा उपलब्ध करून देण्याचा विस्तार, संपर्क तपासणी, क्षयरोगावरील प्रशिक्षण आणि पालकांचे समुपदेशन यावरही भर देण्यात येत आहे. यामुळे निदानासाठी लागणारा वेळ कमी होऊन उपचारांमध्ये खंड पडण्याचे प्रमाण कमी करण्यास मदत होणार आहे.

राज्यातील सर्व पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये (NRC) टीबी तपासणीचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा अधिक राखणे, उर्वरित बालकांची तपासणी पूर्ण करणे, पात्र बालसंपर्कांना प्रतिबंधात्मक उपचार देणे आणि आरोग्य विभाग, महिला व बाल विकास विभाग तसेच राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम यांच्यातील समन्वय अधिक बळकट करणे, या उपाययोजनांवर भर देण्यात येणार आहे.

Web Title: Child health tb screening in malnourished children will get a boost nutrition rehabilitation center as per the instructions of chief minister devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 07:24 PM

Topics:  

  • Child Health
  • Maharshtra news
  • TB

संबंधित बातम्या

Pune Ganeshotsav DJ Ban Row: गणपतीत DJ वाजणार की बंद होणार? पुणे पोलिसांचं मोठं वक्तव्य
1

Pune Ganeshotsav DJ Ban Row: गणपतीत DJ वाजणार की बंद होणार? पुणे पोलिसांचं मोठं वक्तव्य

Jalgaon Highway Accidents: ‘दुर्घटनेतील बळींना न्याय द्या!’ नगरसेवक अरविंद देशमुख यांची प्रशासनाकडे जोरदार मागणी
2

Jalgaon Highway Accidents: ‘दुर्घटनेतील बळींना न्याय द्या!’ नगरसेवक अरविंद देशमुख यांची प्रशासनाकडे जोरदार मागणी

Western Railway Update: विरारकरांसाठी महत्त्वाची बातमी! दोन लोकलचा बोरीवलीला ‘नो हॉल्ट’
3

Western Railway Update: विरारकरांसाठी महत्त्वाची बातमी! दोन लोकलचा बोरीवलीला ‘नो हॉल्ट’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.