Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News: वाहतूक पोलिसाने रोखताच व्यक्तीचा पारा चढला; थेट कॉलर पकडून घातली हुज्जत

Jalgaon News: धुळे शहरातील संतोषी माता चौकात दुचाकी चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या मोहन घाडगे याला वाहतूक पोलिसांनी अडवल्यानंतर वाद झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सुमारे 10:45 वाजता सहायक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र ठाकरे आणि पोलीस कॉन्स्टेबल राहुल चौधरी वाहतूक नियंत्रणासाठी तैनात होते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 20, 2026 | 04:33 PM
Jalgaon News: ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Jalgaon News: ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • धुळे शहरातील संतोषी माता चौक.
  • सोमवारी सकाळी सुमारे 10:45 वाजता.
  • दुचाकी चालवताना मोबाईलवर बोलत असल्याने वाहतूक पोलिसांनी मोहन घाडगे याला अडवले.
मोबाईलवर बोलत दुचाकी चालवणाऱ्या तरुणाला वाहतूक पोलिसांनी अडविल्याने संतप्त झालेल्या तरुणाने पोलिसाच्या वर्दीची कॉलर पकडून धक्काबुक्की केल्याची घटना सोमवारी सकाळी संतोषी माता चौकात घडली. मोहन संजय घाडगे (२१, रा. वाखारकर नगर, कॉटन मार्केटमागे, धुळे) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Jalgaon News:

पोलीस कॉन्स्टेबल राहुल चौधरी वाहतुक नियंत्रणासाठी तैनात

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी संतोषी माता चौकात वाहतूक शाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र ठाकरे आणि पोलीस कॉन्स्टेबल राहुल चौधरी वाहतुक नियंत्रणासाठी तैनात होते. सकाळी सुमारे १०.४५ वाजता मोहन घाडगे हा एमएच १८ बीवाय ३४४५ क्रमांकाच्या दुचाकीवरून मोबाईलवर बोलत जात होता.

Jalgaon Dal Price Hike: सणासुदीत खिशाला मोठी कात्री! डाळी महागल्या, मठानेही गाठले १८० रुपये

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने ठाकरे यांनी त्याला अडविले. याचा राग आल्याने घाडगेने मोबाईल काढून चित्रीकरण सुरू केले. तसेच आरडाओरड करीत, ‘माझ्या गाडीवर पाच हजार रुपयांचा दंड टाका, तुम्हाला वाटेल तो गुन्हा दाखल करा,’ असे आव्हान दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

Jalgaon News: महिलांच्या हाताला बळ, स्वप्नांना नवी भरारी; ‘उमेद’कडून १.८ कोटींचे कर्ज

घाडगेविरुद्ध गुन्हा केलाय दाखल

वाद वाढल्यानंतर घाडगेने ठाकरे यांच्या वर्दीची कॉलर पकडून त्यांना धक्का दिल्याचा आरोप आहे. हा प्रकार पाहून अन्य पोलीस कर्मचारी मदतीसाठी धावले. त्यांनी घाडगे याला ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात नेले. या प्रकरणी एएसआय रवींद्र ठाकरे यांच्या फिर्यादीवरून मोहन घाडगेविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर थेट पोलिसाशी हुज्जत घालण्यापर्यंत गेल्याने संतोषी माता चौक परिसरात काही काळ खळबळ उडाली.

Web Title: Dhule man allegedly grabs traffic police collar mobile phone riding rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 04:33 PM

Topics:  

  • Jalgaon News
  • Maharshtra news
  • Marathi News

संबंधित बातम्या

World News : दहशतवादावर दुटप्पी भूमिका खपवून घेणार नाही! एससीओ बैठकीत राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा
1

World News : दहशतवादावर दुटप्पी भूमिका खपवून घेणार नाही! एससीओ बैठकीत राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा

Alto ला टक्कर देण्यासाठी नवी कार सज्ज! लुक जबरदस्त, फीचर्स स्मार्ट अन् किंमत बजेटमध्ये
2

Alto ला टक्कर देण्यासाठी नवी कार सज्ज! लुक जबरदस्त, फीचर्स स्मार्ट अन् किंमत बजेटमध्ये

Chandrapur News: चंद्रपुरात पावसाची मोठी तूट; रब्बी पिकांचे नियोजन कसे कराल? कृषी विभागाने सांगितला पर्याय
3

Chandrapur News: चंद्रपुरात पावसाची मोठी तूट; रब्बी पिकांचे नियोजन कसे कराल? कृषी विभागाने सांगितला पर्याय

Raigad News: रायगडच्या विकासासाठी ५९४ कोटींचा निधी; मार्चअखेर १०० टक्के खर्चाचे पालकमंत्र्यांचे निर्देश
4

Raigad News: रायगडच्या विकासासाठी ५९४ कोटींचा निधी; मार्चअखेर १०० टक्के खर्चाचे पालकमंत्र्यांचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.