Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बालविवाह केल्यास आता होणार कैद; महाबळेश्वर प्रशासनाचा कडक इशारा

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार मुलीचे वय १८ आणि मुलाचे वय २१ वर्षांपेक्षा कमी असल्यास तो विवाह बेकायदेशीर ठरतो. अशा विवाहात सामील होणाऱ्या प्रत्येक घटकावर कायद्याचा बडगा उगारला जाईल.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 18, 2026 | 12:53 PM
लग्नाच्या केवळ 24 तासांतच नवरी गेली पळून; सुखी जीवनाचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाला गंडा

लग्नाच्या केवळ 24 तासांतच नवरी गेली पळून; सुखी जीवनाचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाला गंडा

Follow Us
Follow Us:

​महाबळेश्वर : अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळे पार पडतात. मात्र, या मुहूर्ताचा गैरफायदा घेऊन कायद्याने प्रतिबंधित असलेले ‘बालविवाह‘ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही सामाजिक अनिष्ट प्रथा मुळापासून उपटून टाकण्यासाठी महाबळेश्वर तालुका प्रशासन आता पूर्णपणे ‘ॲक्शन मोड’मध्ये आले असून, बालविवाह रोखण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
​
महाबळेश्वरचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी सचिन मस्के यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार मुलीचे वय १८ आणि मुलाचे वय २१ वर्षांपेक्षा कमी असल्यास तो विवाह बेकायदेशीर ठरतो. अशा विवाहात सामील होणाऱ्या प्रत्येक घटकावर कायद्याचा बडगा उगारला जाईल. यामध्ये केवळ वधू-वरांचे आई-वडील आणि नातेवाईकच नाही, तर लग्न लावणारे भटजी (पुरोहित), मंडप डेकोरेटर्स, मंगल कार्यालय मालक, वाजंत्री आणि अगदी लग्नाची पत्रिका छापणारे मुद्रक या सर्वांवर गुन्हे दाखल केले जातील. दोषी आढळल्यास २ वर्षांपर्यंत सक्त मजुरी आणि १ लाख रुपयांपर्यंत दंड अशी कठोर शिक्षा होऊ शकते.

Satara ZP : विषय समितींच्या सर्व सदस्यांच्या निवडी बिनविरोध; सत्ताधारी-विरोधकांत रंगला कलगीतुरा

​तालुका प्रशासन आणि महिला व बालविकास विभागाच्या समन्वयाने संपूर्ण महाबळेश्वर तालुक्यात विशेष मोहीम राबवली जात आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी गावोगावी ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका आणि पोलीस पाटील यांचे विशेष पथक बारकाईने लक्ष ठेवून असेल. शहरी भागात बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना सक्रिय राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सरपंच आणि पोलीस पाटील यांना लग्नापूर्वी वधू-वरांच्या वयाची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत.

वधू-वराच्या वयाचे अधिकृत पुरावे तपासणार
​
सर्व मंगल कार्यालये आणि लॉन्स मालकांना त्यांच्याकडे होणाऱ्या विवाहात वधू-वरांचे वयाचे अधिकृत पुरावे (उदा. जन्म दाखला, बोनाफाईड सर्टिफिकेट) तपासणे प्रशासनाने बंधनकारक केले आहे.
​
बालविवाह ही मुलांच्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी अत्यंत घातक प्रथा आहे, असे तालुका संरक्षण अधिकारी चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, जर तुमच्या परिसरात कुठेही बालविवाह होत असल्याची कुणकुण लागली, तर तात्काळ खालील क्रमांकावर संपर्क साधावा :

१. चाईल्ड हेल्पलाईन: १०९८ (टोल फ्री)
२. नजीकचे पोलीस स्टेशन: ११२

बालविवाहाबाबत माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल, त्यामुळे निर्भयपणे पुढे येऊन सामाजिक जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन तहसीलदार सचिन मस्के यांनी केले आहे.

Web Title: Child marriage to now result in imprisonment mahabaleshwar administration issues stern warning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 12:53 PM

Topics:  

  • Child Marriage
  • Satara News

संबंधित बातम्या

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
1

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन
2

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन

साताऱ्यात DJ-लेझरविरोधात ‘मूक’ मोर्चा;  शहरातील २१ संस्थांचा सहभाग, निर्णायक लढ्याची तयारी
3

साताऱ्यात DJ-लेझरविरोधात ‘मूक’ मोर्चा; शहरातील २१ संस्थांचा सहभाग, निर्णायक लढ्याची तयारी

सातारा शहरातील ५८ मंडळांच्या गणरायांचे विसर्जन; जिल्ह्यात ५३३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला निरोप
4

सातारा शहरातील ५८ मंडळांच्या गणरायांचे विसर्जन; जिल्ह्यात ५३३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला निरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.