
चिपळ्णात १३ अर्ज अवैध, कॉग्रेस कचाट्यात
भाजपाने केले योग्य नियोजन
चिपळूणमध्ये निवडणूक होणार रंगतदार
चिपळूण: नगरपरिषद निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जाच्या छाननीत काँग्रेस जबरदस्त कचाट्यात सापडली. काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार लियाकत शहा यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला. तर त्याठिकाणी काँग्रेसचे सुधीर शिंदे यांचा अर्ज वैध ठरला. विशेष म्हणजे लियाकत शहा अपक्ष म्हणून रिंगणात राहिले आहेत. तर उबाठाचे चिपळूण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजू देवळकर यांचा एक अर्ज अवैध ठरवण्यात आला. परंतु त्यांचा एक अर्ज वैध ठरला. त्यामुळे शिवसेना उबाठाला मोठा दिलासा मिळाला. मंगळवारी झालेल्या निवडणूक छाननी प्रक्रियेत एकूण १३ उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आले.
छाननी प्रक्रियेत पहिला धक्का शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला बसला. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजुशेठ देवळेकर यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला. परंतु त्यांनी आणखी एक उमेदवारी अर्ज दाखल करून ठेवला होता, व त्याला पक्षाचा एबी फॉर्म जोडला होता. त्यामुळे उबाठाला मोठा दिलासा मिळाला आहे.
भाजपाचे सर्व अर्ज परफेक्ट
उमेदवार अर्ज छाननीत अनेक राजकीय पक्षाचे व अपक्षांचे उमेदवारी अर्ज देखील अवैद्य ठरले. परंतु भाजप पक्षाकडून दाखल करण्यात आलेले सर्व उमेदवारी अर्ज परफेक्ट ठरले. भाजप नेते प्रशांत यादव यांनी सुरुवाती पासूनच शिस्तबद्ध अशी यंत्रणा भाजप कार्यालयात कार्यरत ठेवली होती. स्वतः प्रशांत यादव व स्वप्ना यादव लक्ष ठेवून होते.
नगराध्यक्षचे ३ अर्ज अवैध
नगराध्यक्ष पदासाठी एकूण १३ अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ३ उमेदवारी अर्ज अवैद्य ठरवण्यात आले. तर १० अर्ज वैध ठरले आहेत, त्यामध्ये अपक्ष म्हणून निशिकांत भोजने, शिवसेनेचे उमेश सकपाळ, राष्ट्रवादी अजित दादा पक्षाचे मिलिद कापडी, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे रमेशभाई कदम, उबाठाचे राजू देवळेकर, काँग्रेसचे सुधीर शिंदे, अपक्ष लियाकत शहा, समाजवादी पक्षाचे मोईन पेचकर, यांचा प्रामुख्याने समावेश आहे. हे उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात कायम राहिले आहेत. तर नगरसेवक पदासाठी एकूण १३१ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.
चिपळूणमध्ये महायुतीची घोषणा
रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण नगरपालिका निवडणूक (Chiplun Municipal Election) कडे सर्वांचे लक्ष वेधले आहे त्यातच काल महाराष्ट्र मध्ये प्रथमच चिपळूणमध्ये महायुती एकत्रित निवडणूक लढवणार असे पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले मात्र नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नेमका कोण याबाबत प्रश्नचिन्ह अद्याप कायम आहे त्यामुळे युती अभेद राहणार की तुटणार अशीच चर्चा सुरू आहे.