Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावंतवाडीत विजेचा खेळखंडोबा; माजी नगराध्यक्ष बबन साळगावकरांच्या नेतृत्वाखाली महावितरणला ‘घेराव’

दिवसातून १० ते १२ वेळा वीज खंडित होत असल्याने संतप्त झालेल्या सत्ताधारी नगरसेवकांनी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर धडक दिली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 31, 2026 | 12:22 PM
सावंतवाडीत विजेचा खेळखंडोबा; माजी नगराध्यक्ष बबन साळगावकरांच्या नेतृत्वाखाली महावितरणला ‘घेराव’

सावंतवाडीत विजेचा खेळखंडोबा; माजी नगराध्यक्ष बबन साळगावकरांच्या नेतृत्वाखाली महावितरणला ‘घेराव’

Follow Us
Close
Follow Us:

सावंतवाडी : पावसाळा उंबरठ्यावर असतानाही सावंतवाडी शहरात सुरू असलेल्या महावितरणच्या संथ कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दिवसातून १० ते १२ वेळा वीज खंडित होत असल्याने संतप्त झालेल्या सत्ताधारी नगरसेवकांनी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर धडक दिली. यावेळी लोकप्रतिनिधींनी उपकार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांना चांगलेच धारेवर धरत जाब विचारला.

 

यापूर्वी वीज वाहिनी पडून दोघांचा मृत्यू झाला असतानाही प्रशासन ढिम्म का? असा सवाल आनंद नेवगी यांनी उपस्थित केला. उपअभियंता शैलेश राक्षे यांनी कर्मचाऱ्यांची टंचाई आणि खासगी कामगार मिळत नसल्याची अडचण मांडली. मात्र, बबन साळगावकर यांनी थेट वरिष्ठ कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क साधण्यास भाग पाडले. अखेर वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्यानंतर प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन महावितरणने दिले. येत्या काही दिवसांत परिस्थिती न सुधारल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा लोकप्रतिनिधींनी दिला आहे.

पावसाच्या तोंडावरच कामे आठवतात का?

शहरातील वीज प्रश्नावरून आक्रमक झालेल्या लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. ‘ऐन पावसाळ्याच्या तोंडावर दुरुस्तीची कामे काढून जनतेला वेठीस का धरता? इतके दिवस प्रशासन काय करत होते? असा तिखट सवाल यावेळी करण्यात आला. यावेळी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, आनंद नेवगी, नीलम नाईक, सुकन्या टोपले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाघोबा खिंडीत एसटी बसचा अपघात; सहा प्रवासी जखमी

महावितरणचे अजब समर्थन आणि अपघात

शहरात दोन फिडर असून, एका कामासाठी संपूर्ण शहराचा पुरवठा बंद ठेवावा लागतो, असे अजब समर्थन अधिकाऱ्यांनी दिले. त्यावर नगरसेवकांनी तीव्र संताप व्यक्त केला. जीर्ण खांबांचा धोका: शहरात अनेक ठिकाणी खांब जीर्ण झाले आहेत. मिलाग्रीस हायस्कूलसमोर एक खांब गटारात पडल्याने विद्यार्थिनीला दुखापत झाल्याची घटना नगरसेविका सुकन्या टोपले यांनी समोर आणली.

आम्ही सत्तेत असलो तरी नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरू. पावसाळ्यात वीज पुरवठा सुरळीत राहिला नाही, तर गाठ आमच्याशी आहे. — बबन साळगावकर, माजी नगराध्यक्ष.

Web Title: Citizens are troubled by the slow functioning of mahavitaran in sawantwadi city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 12:22 PM

Topics:  

  • Mahavitaran Department
  • Sawantwadi
  • Sindhudurg

संबंधित बातम्या

Petrol Diesel Price Hike : ११ दिवसांत इंधन 8 रुपयांनी महाग! सिंधुदुर्ग काँग्रेसचे निवेदन, दरवाढ मागे घेण्याची मागणी
1

Petrol Diesel Price Hike : ११ दिवसांत इंधन 8 रुपयांनी महाग! सिंधुदुर्ग काँग्रेसचे निवेदन, दरवाढ मागे घेण्याची मागणी

आता घरांवर सोलर लावणं झालं सोपं; महावितरणने आणली नवी योजना, वीज बिलात होणार फायदा…
2

आता घरांवर सोलर लावणं झालं सोपं; महावितरणने आणली नवी योजना, वीज बिलात होणार फायदा…

Sindhudurg : सिंधुदुर्गच्या पर्यटकांना मांद्रेत मारहाण, पोलिसांनी दखल न घेतल्याने रोष
3

Sindhudurg : सिंधुदुर्गच्या पर्यटकांना मांद्रेत मारहाण, पोलिसांनी दखल न घेतल्याने रोष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.