Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य; नागरिकांच्या हाडांच्या आजारात वाढ

कल्याण डोंबिवली शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमधून मार्गक्रमण करताना नागरिकांना मणक्याचे ,गुडघ्याचे आजार जडले आहेत. खड्ड्यांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागत आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची मागणी आता कल्याण डोंबिवली शहरातील नागरिक आणि राजकीय नेत्यांकडून केली जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 31, 2024 | 11:19 AM
कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य; नागरिकांच्या हाडांच्या आजारात वाढ (फोटो सौजन्य - pinterest)

कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य; नागरिकांच्या हाडांच्या आजारात वाढ (फोटो सौजन्य - pinterest)

Follow Us
Close
Follow Us:

कल्याण डोंबिवली शहरातील रस्त्यांवर खड्ड्याचं साम्राज्य निर्माण झालं आहे. नागरिकांना या रस्त्यांवरून प्रवास करताना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. तसेच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग देखील मंदावत आहे, त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना सतत एक्सलेटर आणि ब्रेक दाबावे लागत आहेत. त्यामुळे नागरिकांना मणक्याच्या आजारांचा सामना करावा लागत आहे.

हेदेखील वाचा- ऊंट किती दिवस जिवंत राहू शकतो? जाणून घ्या तुमच्या प्रश्नांचं उत्तर

कल्याण डोंबिवली शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांमधून प्रवास करताना येथील नागरिक मोठ्या प्रमाणात हाल सहन करत आहेत. खड्ड्यांमधील प्रवासामुळे नागरिकांना मणक्याचे, गुडघ्याचे आजार जडले आहेत. तर महिला विशेषतः गरोदर महिलांना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मानसिक तणावाला सामोरं जावं लागत आहे. कल्याण डोंबिवली शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची मागणी नागरिकांकडून आणि राजकीय नेत्यांकडून सतत केली जात आहे. मात्र नागरिकांच्या या मागणीकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

कल्याण डोंबिवलीतील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोडींची समस्या देखील वारंवार निर्माण होत आहे. या सर्व समस्येवर तात्काळ उपाययोजना करावी आणि या रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. वाहतूक कोंडीसोबतच खड्ड्यांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर देखील परिणाम होत असल्याचं पाहायला मिळत आहे. याबाबत डॉ. प्रशांत पाटील यांनी माहिती दिली आहे.

हेदेखील वाचा- Breaking: मानखुर्द ते वाशी लोकल विस्कळीत ; सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांचे हाल

डॉ. प्रशांत पाटील यांनी सांगितलं आहे की, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांसह नागरीकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यातून दुचाकी आणि चार चाकी वाहने चालविल्याने सतत गाडीला गचके बसतात. या गचक्यांमुळे नागरीकांना मणक्याच्या आजारां सामोरं जावं लागत आहे. तसेच खड्ड्यांमधून वाहन चालवताना वाहन चालकांना सतत एक्सलेटर आणि ब्रेक दाबावे लागतात. त्यामुळे त्यांना गुडघे दुखीच्या समस्याना समोरे जावे लागत आहे. या आजाराचे रुग्ण उपचारासाठी रुग्णलयात येत आहे. त्याची संख्या वाढल्याचं दिसून येत आहे.

वाहतूक कोंडीचा सगळ्यात जास्त त्रास हा महिलांना होत आहे. महिला घरातून निघताना कमी पाणी पिऊन निघतात. त्यामुळे त्यांना स्टोनचा आजाराची लक्षणे दिसून येत आहे. स्टोनच्या तक्रारी असलेल्या महिला उपचारासाठी रुग्णालयात येत आहेत. विशेषतः गरोदर महिलांना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय सतत वाहन कोंडीत अडकून पडल्याने दुचाकी आणि चार चाकी वाहन चालकांचे मानसिक संतुलन बिघडते. त्यांना बीपीचा त्रास होतो. त्यातून त्यांचा स्वभाव चिडचीडा होताना दिसून येत आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ते चांगले केल्यास या आजारांना आळा बसण्यास मदत होईल अशी माहिती डॉ पाटील यांनी दिली आहे.

Web Title: Citizens in kalyan and dombivali are suffering from bones diseases due to bad conditions of roads

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2024 | 11:19 AM

Topics:  

  • kalyan

संबंधित बातम्या

Kalyan : डोंबिवलीत भाजपा आणि ओम गणपती मित्र मंडळातर्फे भव्य दहीहंडी उत्सव
1

Kalyan : डोंबिवलीत भाजपा आणि ओम गणपती मित्र मंडळातर्फे भव्य दहीहंडी उत्सव

KDMC News: कल्याणकरांचा पाणी प्रश्न लवकरच सुटणार! उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट
2

KDMC News: कल्याणकरांचा पाणी प्रश्न लवकरच सुटणार! उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट

Kalyan Crime news: शिष्टाचार आणि वागणुकीचे मूलभूत येत नसल्याने चार वर्षीय मुलीची हत्या; त्यानंतर गादीत गुंडाळून…
3

Kalyan Crime news: शिष्टाचार आणि वागणुकीचे मूलभूत येत नसल्याने चार वर्षीय मुलीची हत्या; त्यानंतर गादीत गुंडाळून…

Ajit Pawar on Meat ban: १५ ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी…! अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले श्रद्धेचा प्रश्न असल्यास..
4

Ajit Pawar on Meat ban: १५ ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी…! अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले श्रद्धेचा प्रश्न असल्यास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.