मानखुर्द ते वाशी लोकल विस्कळीत ; सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड आल्याने प्रवाशांचे हाल (फोटो सौजन्य - सोशल मिडीया)
लोकल ट्रेन प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. हार्बर मार्गावरील मानखुर्द ते वाशी लोकल गेल्या 30 मिनिटांपासून रखडली आहे. सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून वाशीला येणारी रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. मानखुर्द रेल्वे स्थानकावर गेल्या 30 मिनिटांपासून रेल्वे थांबली आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.
हेदेखील वाचा-हिंगोलीतील तलाठी संतोष पवार यांच्या हत्येच्या निषेधार्थ सिंधुदुर्गात आज काम बंद आंदोलन
मानखुर्द ते वाशी रेल्वेसेवा गेल्या 30 मिनिटांपासून स्थगित आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून वाशीला येणारी रेल्वे गेल्या 30 मिनिटांपासून मानखुर्द रेल्वे स्थानकावर थांबली आहे. वाशीवरून पनवेलच्या दिशेने जाणारी रेल्वे सुरु असली तरी मानखुर्द ते वाशी रेल्वेसेवा काही काळासाठी स्थगित झाली आहे. सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळच्या वेळी कामावर जाणाऱ्या नागरिकांची घाई असते, अशातच रेल्वे विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
हेदेखील वाचा- टेलिग्रामवर पाकिस्तानी दहशतवाद्याचा व्हिडीओ व्हायरल, ट्रेनवर हल्ला करण्याची धमकी; NIAची चिंता वाढली
सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल उशिराने धावत आहे. वाशी रेल्वेस्थानकासमोर ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील लोकल सुमारे 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. कामावर जाणाऱ्या नागरिकांची घाई असतानाचा रेल्वेचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे प्रवासी ट्रेनमधून उतरून प्रवासी रुळावरून चालत आहेत.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या ट्रेन वाशीपर्यंत सोडल्या जात आहेत आणि त्यानंतर त्या लोकल तिथूनच पनवेलच्या दिशेने रवाना केल्या जात आहेत. अशी परस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत असून त्यांना ठाण्यावरून प्रवास सीएसएमटीला जाण्यासाठी ठाण्यावरून प्रवाल करावा लागत आहे. त्यामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांची गर्दी वाढताना दिसत आहे.
सकाळच्या वेळी कामावर जाणाऱ्या नागरिकांची घाई असते, अशातच रेल्वे विस्कळीत झाली आहे. हार्बर मार्गावरील लोकल सुमारे 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. काही रेल्वे स्थानकात तर काही ट्रेन रेल्वे ट्रॅकमध्येच थांबल्या आहेत. त्यामुळे रेल्वे सेवेवर याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. सिग्नल यंत्रणेतील बिघाड कधी दुरुस्त केला जाईल आणि रेल्वेसेवा पुन्हा पूर्वपदावर कधी येणार याबाबत अद्याप रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
सकाळी कामावर जाण्याच्या वेळीच हा तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रवासी ट्रेनमधून उतरून प्रवासी रुळावरून चालत जात असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्थीचे काम सुरू आहे. प्रवाशांनी संयम बाळगावा, असे आवाहन करण्यात आले आहे.