Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जावळीतील 62% मतदानाचा आज होणार ‘फैसला’; ‘या’ गटात झालेल्या चुरशीच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील मतदानाचा आज सोमवारी फैसला होणार आहे. निवडणुकीच्या निकालाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 09, 2026 | 12:30 AM
जावळीतील 62% मतदानाचा आज होणार 'फैसला'; 'या' गटात झालेल्या चुरशीच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष

जावळीतील 62% मतदानाचा आज होणार 'फैसला'; 'या' गटात झालेल्या चुरशीच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष

Follow Us
Close
Follow Us:

मेढा/दत्तात्रय पवार : बहुप्रतीक्षेनंतर लागलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये शनिवारी झालेल्या मतदानामध्ये जावळीतील तीन जिल्हा परिषद गट व सहा पंचायत समिती गणांसाठी एकूण ६२ टक्के मतदान शांततेत पार पडले. या मतदानाचा आज सोमवारी फैसला होणार आहे. कुसुंबी व म्हसवे जिल्हा परिषद गटात चुरशीची लढत झाली त्यामुळे या दोन गटातील व त्या अंतर्गत येणाऱ्या चार गणातील निवडणुकीच्या निकालाकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 

कुसुंबी, म्हसवे कुडाळ जिल्हा परिषद गट व त्या अंतर्गत सहा गणांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये कुडाळ गट भाजपच्या दृष्टीने सुरक्षित ठरला. या ठिकाणी राष्ट्रवादीने तुल्यबळ उमेदवार न दिल्याने भाजपला येथील लढत सोपी झाली. भाजपचे कुडाळ गणाचे उमेदवार सौरभबाबा शिंदे सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याची चिन्हे आहेत. मात्र म्हसवे गटात राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी लक्ष घातल्याने भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शिवसेना असा चुरशीचा दुरंगी सामना येथे पाहायला मिळाला.

म्हसवे गटात क्रॉस वोटिंगचा फटका देखील भाजप पक्षाला बसू शकतो असे राजकीय चित्र आहे. यामध्ये म्हसवे गणातील भाजप उमेदवार रेश्मा पोफळे व राष्ट्रवादीच्या शिल्पा शिंदे यांच्यात दुरंगी सामना झाला. तर खर्शी-बारामुरे गणात भाजपचे गोरख महाडिक विरुद्ध राष्ट्रवादीचे विठ्ठल गोळे यांच्यात देखील चुरशीची लढत होऊन नेमके कोणाच्या पारड्यात मतदारांनी मतदान टाकले हे आज ठरणार आहे. मात्र या ठिकाणी अधिकच लीड न घेता उमेदवार विजयी होतील, अशी शक्यता आहे. तर म्हसवे जिल्हा परिषद गटासाठी भाजपचे नेते वसंतराव मानकुमरे विरुद्ध शिवसेनेचे संदीप पवार यांच्यात लढत झाली आहे.

कुसुंबी जिल्हा परिषद गट हा भाजपचे रांजणे यांना सुरुवातीपासून सुरक्षित राहील अशी परिस्थिती होती मात्र या ठिकाणी देखील शिवसेना एकनाथ शिंदे गटाने ताकद लावल्याने या ठिकाणी देखील चुरशीचा सामना झाला. जिल्हा परिषदेसाठी भाजपकडून अर्चना रांजणे विरुद्ध सेनेच्या कविता ओंबळे यांच्यात लढत झाली तर पंचायत समिती आंबेघर तर्फ मेढा गणात भाजपचे विजय सपकाळ विरुद्ध शिवसेनेचे आतिश कदम यांच्यात अटीतटीची लढत झालेली पहायला मिळत आहे.

कुसुंबी गणात सेनेचे नवी मुंबई संपर्कप्रमुख अंकुश कदम यांचे गाव येत असल्याने या गणातून त्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. या ठिकाणी शिवसेनच्या सुनीता दुंदळे विरुद्ध भाजपच्या पुष्पा चिकणे यांच्यात चुरशीची लढत झालेली पाहायला मिळाली आहे. या दोन्ही गणात क्रॉस वोटिंग झाल्याने या गणातील निकालाकडे देखील तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

उपमुख्यमंत्री, बांधकाम मंत्री प्रदेशाध्यक्षांनी सभा गाजल्या

जावळी तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकांसाठी हाय प्रोफाईल राजकीय मंडळींच्या सभा तालुक्यात झाल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुसुंबी गटाच्या उमेदवार कविता ओंबळेंसाठी केळघर येथे सभा घेतली. बांधकाम मंत्र्यांनी पहिल्या दिवसापासून भाजपच्या उमेदवारांसाठी प्रचारादरम्यान संपूर्ण तालुका पिंजून काढला होता. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी देखील म्हसवे गटात आपले संपूर्ण कुटुंब राष्ट्रवादी-सेनेच्या उमेदवारांच्या पाठीशी उतरवल्याने तालुक्यातील ही निवडणूक एक वेगळ्या टप्प्यावर गेली होती. त्यामुळे आज लागणाऱ्या निकालाकडे जिल्ह्यातील सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. एकनाथ शिंदे यांच्या सभेचा कुसुंबी गटावर काय परिणाम होतो? प्रदेशाध्यक्षांनी संपूर्ण कुटुंब प्रचारात उतरवूनही म्हसवे गटात नेमके काय चित्र निकालाचे राहते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा : मतदान झाले, धाकधूक सुरू! पुणे जिल्ह्यातील 827 उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद

तिन्ही पक्षांकडून पैश्यांचा बेसुमार वापर

जावळी तालुक्यातील निवडणूकांचे निकाल हे अलीकडच्या काळात आर्थिक गणितांवर अवलंबून रहात आहेत. हे ओळखून शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी येथील निवडणुकांत पैश्यांचा वापर बेसुमार केला आहे. त्यामुळे निश्चित निकाल काय लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Web Title: Citizens of jawali taluka focus on zilla parishad and panchayat samiti election results

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Election News
  • Election Result
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

Karjat Election 2026: कर्जतमध्ये 12 टेबलावर होणार मतमोजणी! कोणाचे नशीब उघडणार? प्रशासकीय भवनात जय्यत तयारी
1

Karjat Election 2026: कर्जतमध्ये 12 टेबलावर होणार मतमोजणी! कोणाचे नशीब उघडणार? प्रशासकीय भवनात जय्यत तयारी

Pune Zp Election : जिल्ह्याचे कारभारी उद्या ठरणार; राष्ट्रवादी सत्ता राखणार की नव्या समीकरणांचा उदय होणार
2

Pune Zp Election : जिल्ह्याचे कारभारी उद्या ठरणार; राष्ट्रवादी सत्ता राखणार की नव्या समीकरणांचा उदय होणार

मावळ तालुक्यात मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; टपाली मतपत्रिकांसाठी 5 पथके, तर EVM साठी…
3

मावळ तालुक्यात मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; टपाली मतपत्रिकांसाठी 5 पथके, तर EVM साठी…

ZP Election 2026: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी ६५% मतदान, भावी कारभाऱ्यांचे भाग्य ईव्हीएम यंत्रात झाले कैद
4

ZP Election 2026: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी ६५% मतदान, भावी कारभाऱ्यांचे भाग्य ईव्हीएम यंत्रात झाले कैद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.