राज्यात स्वच्छता अभियान राबवले जाणार
750 गावांमध्ये एकत्र येणार हजारो विद्यार्थी
कौशल्य विकास विभागाचा उपक्रम
मुंबई: आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रात कौशल्य विकास विभागाच्यावतीने “स्वच्छता अभियान” राबविण्यात येणार आहे. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे राज्यातील ४१९ शासकीय औद्योगिक संस्थांमधून हजारो विद्यार्थी एकत्र येणार असून, तब्बल ७५० गावांमध्ये स्वच्छता अभियान राबवणार आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ बुधवार, १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायत कार्यालयासमोर होणार आहे. या अभियानाचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असून, उद्घाटन कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते होणार आहे.
या अभियानाबाबत बोलताना मंत्री लोढा म्हणाले, “विकसित भारताचा संकल्प साकार करण्यातील एक महत्वाचा टप्पा म्हणजेच स्वच्छ भारत अभियान. भारत स्वच्छ करण्याचा निर्धार आदरणीय पंतप्रधानांनी केला असून, त्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा केले आहे. त्यामुळे आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य विकास विभागामार्फत आम्ही हा उपक्रम सुरु करत आहोत. स्वच्छता, आरोग्य या विषयांबाबत आजही जागृतीची गरज आहे आणि ती गरज या अभियानाच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करू.”
दादर नाही तर ‘या’ ठिकाणी असेल नवा कबुतरखाना, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते उद्घाटन
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारताच्या निर्धाराला पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राच्या कौशल्य विकास विभागाद्वारे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. भारतातील पहिली संत गाडगे बाबा स्वच्छ भारत अकादमी महाराष्ट्रात सुरु करण्यात आली असून, याद्वारे हजारो तरुणांना प्रशिक्षण आणि रोजगार मिळत आहे. स्वच्छता आरोग्यासाठी अतिशय महत्वाची आहे हे आपण जाणतोच, पण भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशाला स्वच्छ ठेवण्यासाठी गरज आहे ती जनजागृतीची आणि कुशल मनुष्यबळाची. या दोन्ही गोष्टींसाठी महाराष्ट्राचा कौशल्य विकास विभाग तत्परतेने पुढाकार घेत राहील असे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्पष्ट केले आहे.
दादर नाही तर ‘या’ ठिकाणी असेल नवा कबुतरखाना, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते उद्घाटन
दादर नाही तर ‘या’ ठिकाणी असेल नवा कबुतरखाना
मुंबईतील नॅशनल पार्क येथे नव्या कबुतरखान्याचे उद्घाटन मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्याहस्ते करण्यात आले. नॅशनल पार्क येथील जागेत हा कबुतरखाना बांधण्यात आला असून या कबुतरखान्याचा त्रास कोणाला होणार नाही, असा आश्वासन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी व्यक्त केला. मुख्य म्हणजे, स्थानिक रहिवाशांचे हित जपून प्रत्येक वॉर्डात नवे कबुतरखाने सुरु करण्याचा मानस असल्याचे लोढा यांनी यावेळी व्यक्त केला.